Horror Stories In Marathi -आजची Marathi Bhaykatha no. 7 – हा सागरी किनारा हि भयकथा Erangel Beach वर Goa Trip ला गेलेल्या ४ मित्रांसोबत घडलेली प्रवासात्मक कथा आहे.

Marathi Bhaykatha no. 7 – हा सागरी किनारा (Horror Stories In Marathi)

४ मित्र – अर्जुन, विकास, अमेय आणि सुजय.
आपली अविस्मरणीय अशी Goa ट्रिप करून परतीच्या मार्गाला लागलेले…
Goa म्हटलं, की डोळ्यासमोर उभं राहतं ते अथांग सागर, लांबच लांब समुद्रकिनारे, आणि डोळे दिपवणारा निसर्ग…
अश्याच मधुर आठवणींचा महासागर मनात, तसेच Camera मध्ये साठवून तब्बल २ आठवड्यांच्या ट्रिप नंतर हे चौघे घरी चाललेले…

प्रत्येकाने सोबत थोड्या फार प्रमाणात Drinks आणि काही खायचे सामान घेतले होते…

रात्रीची वेळ होती, अर्जुन सोडून बाकी सर्वांनी थोडी फार प्रमाणात Drink केलेली, त्याची गुंगी त्या तिघांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होती…
अर्जुनवर गाडी चालवण्याची जबाबदारी होती, म्हणून तो ह्या पिण्याच्या भानगडीत काय पडला नाही…

घड्याळात २ चे ठोके पडलेले, गाडी आरामात ७०-८० स्पीड पकडत होती, हायवे पूर्णपणे मोकळा होता…

Drinks मुळे तिघांनाही गुंगी होती, पण झोपलेलं कोणीच नव्हतं…

सर्व आपापल्या धुंदीत होते,,,

पुढच्याच स्टॉपला गाडी एका कोपर्यावरून वळण घेत होती, की तेच रस्त्याच्या कडेला एक रेडीयमचे Boarding लागलेले त्यांना दिसले…

“अरे अर्जुन जरा स्लो कर गाडी” विकासने अर्जुनला हलवत सांगितले…
अर्जुनने जशी गाडी स्लो केली, तसं Board वरची अक्षरे दिसू लागली…

                   ”Erangel Beach – 2 Km”

‘काय रे सुज्या, का कोणता Beach आहे, आपण तर बहुतांश Goa Beaches वर जाऊन आलोय’- विकास

“काय माहीत, मीच पहिल्यांदा बघतोय, आपल्या टुरिस्ट गाईडने पण ह्या Beach बद्दल काहीच माहिती दिली नव्हती”- सुजय

‘मग जाऊन बघायचं का Beach?, आता घरी चाललोच आहे, हे लास्टचं एकदा चक्कर मारून येऊ’ -विकास सगळ्यांना आग्रह करायला लागला…

ह्यावर अर्जुन जरासा चिडत पण समजावणीच्या स्वरात म्हणाला, “अरे ऑलरेडी आपण खूप Beach फिरलो ते कमी नाही का? आणि आताची वेळ बघ किती वाजले, हे काय मधेच तुमचं चालु झालं?”

Horror Stories In Marathi – नदीच्या पलीकडे 1| Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – नदीच्या पलीकडे 2 | Storyteller Rushi

अर्जुनचे वाक्य तोडत विकास म्हणाला, ‘अरे आपण रोज येणार आहोत का गोव्याला, एक शेवटचा Beach यार, आणि नुसतं बघून येण्यात काय जातंय?’

“हो विकास बरोबर बोलतोय, तसंही आपण एवढी जास्तीची Beer  घेतलेलीच आहे, थोडीशी इकडे रिकामी करू” – अमेय विकासच्या बोलण्याला सहमती दर्शवत म्हणाला…

‘बरं ठीक आहे, तुम्ही सगळे म्हणता तर जाऊ, पण हे शेवटचं, ह्या नंतर गाडी डायरेक्ट मुंबईलाच थांबेल’ – अर्जुन…

गाडीने बघता बघता २ किमी पार केले, रस्त्याच्या कडेला अजून एक Board दिसले, बहुतेक Beach चे बोर्ड असावे…
गाडी व्यवस्थित पार्क करून चौघे उतरले, सोबत Drinks आणि फरसाण तेवढे घेतले…
सगळीकडे अंधार होता, वरच्या लाईटच्या पोलाचा तेवढा उजेड…

गाडी पार्क केलेल्याच्या जागेवरून Beach फारसा लांब नव्हता,
Beach च्या एन्ट्रीला परत एक मोठा Board लावलेला दिसला,
त्यावर लिहलेलं,
         ” Erangel Beach- समुद्रकिनाऱ्या पासूनचा पुढचा भाग सखोल होत गेला आहे त्यामुळे येथे पाण्यात पोहण्यास सक्त मनाई आहे,
Beach वर फिरायची वेळ – सकाळी १० ते संध्याकाळी ७,
संध्याकाळी ७ नंतर कोणी Beach वर आढळून आल्यास, त्यावर कडक कारवाई केली जाईल”
                                           — हुकूमावरून

पण काय करणार, काही लोकांसाठी नियम हे तोडण्यासाठीच असतात…
आपण एखाद्या प्रॉडक्ट वरचे Terms & Conditions जसे दुर्लक्ष करतो, तसे त्यांनी त्या फलकाकडे दुर्लक्ष केले आणि Beach वर गेले…

Beach वर थोड्या फार प्रमाणात पोल च्या लाईट चा फिकटसा प्रकाश पडत होता,
दिवसा माणसांनी गजबजलेलं Beach रात्रीच्या वेळी एखाद्या स्मशाना सारखं भासत होतं…

पूर्ण Beach वर साधं चिटपाखरूही नव्हतं, फक्त समुद्राच्या संथ लाटांचा आवाज, भयाण शांतता, आणि हे चौघे…

चौघांनी बाजूलाच ठाण मांडला, थोडी फार लाकडं जमा करून शेकोटी पेटवून तिकडेच प्रोग्रॅम करायचं ठरवलं…

रात्रीच्या शांततेमुळे पंगत रंगात आलेली… अर्जुन सोडून बाकी सर्वांना आता हळूहळू चढायला लागलेली…

थोडं वेळ जातं न जातंय, तेच विकासला लघुशंका आली…

तो लघुशंकेला गेला, इकडे हे दोघे आपापल्या दुनियेत तल्लीन झालेले…
५ मिनिटे झाली, १० मिनिटे झाली, पण विकास अजून आला नव्हता…

त्या दोघांमध्ये अर्जुन भानावर होता, तो सगळ्यांना ओरडत म्हणाला,
“अरे हा विकास कुठे राहिला, त्याला बोललेलो जास्त लांब नको जाऊस, जागा चांगली नाहीय…
१० मिनिटे होऊन गेली तरी त्याचा पत्ता नाही, चला कुठे पडला वैगेरे असेल.. माझ्या सोबत चला, त्याला घेऊन येऊ, बेवडा कुठचा”

तिघेही उठले आणि विकासच्या शोधावर निघाले…
लाईटच्या पोलचा मंद प्रकाश होताच, शिवाय तिघांच्या मोबाईलचे टॉर्चही होते…

Horror Stories In Marathi – शेवटची रात्र | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – हौंटेड हायवे | Storyteller Rushi

खूप शोधाशोध केली,
जिकडून Beach सुरू होतो तिकडून ते शेवटच्या टोका पर्यंत पूर्ण शोधून काढलं, पण विकासचा काहीच मागमूस लागला नाही…

“अरे यार ऽऽऽऽ,
मी ओरडून बोलत होतो तरी, नको थांबयला इकडे, पण माझं ऐकेल तो कोण, काय झालं आता बघा”
अर्जुन सगळ्यांवर ओरडत म्हणाला…

‘आम्ही मान्य करतो आमची चुकी झाली, पण Beach वर थांबायची आयडिया पण तर विकासचीच होती’

“आता भांडत बसण्यात काही अर्थ नाहीय, आपण पोलिसांना फोन करू” – अर्जुन

लागलीच अर्जुनने पोलिसांचा नंबर डायल केला,
पण पलीकडून पोलिसांनीच त्यांना चौकीत बोलावले…

तिघेही पोलीसांनी दिलेल्या पत्त्यावर पोहोचले, आणि त्यांना सर्व हकीगत सांगितली…

इन्स्पेक्टर देशमाने त्यांची हकीगत ऐकून तिघांवर ही चिडले…

‘अरे मूर्खांनो, तुम्हाला तो Board लागलेला दिसला नाही का? त्या Beach वर रात्री जायला साधं चिटपाखरू सुद्धा घाबरतं…
आम्ही नाही मानत असल्या गोष्टींना, पण आम्हालाही तिकडच्या स्थानिकांकडूनच कळलंय की ते Beach हौन्टेड आहे…
खूप जणांना त्या Beach ने आपल्या पोटात गिळंकृत केलय, खूप जणांचे तिकडून रहस्यमय रीत्या गायब होण्याच्या तक्रारी आमच्याकडे अजून सुद्धा आहेत,
त्या साठीच तिकडे तो बोर्ड लावलंय आम्ही…
आणि एवढं लिहून पण तुम्ही त्या Beach वर गेलातच कशाला, एवढाच जवानीचा जोश आहे तर सैन्यामध्ये भरती व्हा, तिकडे तुमची कर्तबगारी दाखवा’

तिघांनी पोलिसांची माफी मागून त्यांना सोबत येण्याची विनवणी केली,

इन्स्पेक्टर २-३ सोबती घेऊन त्यांच्या सोबत यायला तयार झाले…

त्या सगळ्यांनी विकासची खूप शोधाशोध केली, एकतर रात्र, आणि त्यात अंधार,
खूप वेळ शोधाशोध केल्या नंतर सुद्धा त्यांना विकास कुठेच सापडला नाही…

शेवटी कंटाळून सगळे Beach च्या बाहेर आले
बाहेर आल्यावर देशमाने सगळ्यांना म्हणाले,

“हे बघा, हे पर्यटन स्थळ आहे मान्य आहे, पण या जगात अशीही काही ठिकाणं आहेत, जी आपल्या समजण्या पलीकडे असतात,
आपल्याला त्याबाबतीत स्वतः निसर्ग चेतावणी देत असतो, पण आपण निसर्गाच्या विरुद्ध जाऊन जेव्हा चुकीचं पाऊल घेतो, तेव्हा दुर्घटना घडल्या खेरीज राहत नाही…
तुमच्या मित्राचं काय झालं, हे आपल्याला माहीत नाही, कदाचित कधी कळणार ही नाही…
आपण आता तरी काही करु शकत नाही,
म्हणून आम्ही आता जातो आणि तुम्ही पण इकडे नका थांबू, कोणत्या तरी हॉटेल मध्ये आजची रात्र काढा, उद्या सकाळी येऊन त्याला परत एकदा शोधू,
भेटला तर ठीक, नाहीतर”….

पोलिसांनी त्यांच्याकडून नियमभंगाचा दंड घेत तिकडून काढता पाय घेतला…

पोलिसांची गाडी गेल्यावर अर्जुनने उरला सुरला राग पण दोघांवर काढला…
पण आता मात्र तिघेही घाबरलेले…

हॉटेल मध्ये थांबण्यापलीकडे त्यांच्याजवळ गत्यंतर नव्हते…
तिघेही हॉटेलला थांबले…

                       ——————

इकडे विकास लघुशंका करून परत आला, खूप थकलेलं शरीर वाटत होतं, एवढ्या वेळपर्यंत तो कुठे होता, त्याचे त्याला माहित नव्हतं,
मगाशी त्यांची मैफिल रंगलेली तिथपर्यंत तो पोहोचला, पण तिकडे तिघेही नव्हते, शेकोटी सुद्धा विझलेली…

‘अमेय’ ऽऽ , ‘अर्जुन’ऽऽ , ‘सुज्या’ऽऽ
कुठे आहात तुम्ही सगळे?
तिघांनाही हाक मारून बघितली, पण पूर्ण Beach वर तिघांचाही पत्ता नव्हता,

कुठे गेले असतील सगळे?…

लागलीच त्याने खिशातून मोबाईल काढला,
मोबाईलची बॅटरी कधीच उतरून फोन बंद झालेला…
‘अरे यार, याला पण आताच बंद व्हायचं होतं, दुष्काळात तेरावा महिना’

विकास गोंधळात होता, की तितक्यातच

‘ए विकास’ऽऽऽ

त्याला मागून कोणीतरी हाक मारली,
आवाज तर सुज्याचा होता…
त्याने लगेच मागे वळून पाहिले, पण मागे सुज्या तर काय, दुसऱ्या कोणाचाच दूर दूर पर्यंत मागमूसही नव्हता…

Horror Stories In Marathi – झपाटलेलं रेल्वे स्टेशन | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – फोटो स्टुडिओ | Storyteller Rushi

मनाचा भ्रम समजून तो परत सगळ्यांना शोधायला लागला, Beach मघापेक्षा जरा जास्तच भयानक भासत होता,
एव्हाना विकासची होती नव्हती ती पण उतरलेली,

तसंच परत एकदा सगळ्यांना शोधायला लागला,
की पुन्हा एकदा त्याला हाक आली, हा आवाज अमेयचा होता,
ह्या वेळी ती हाक समुद्राच्या दिशेने होती,
त्याने झटकन आवाजाच्या दिशेने बघितलं, तर अमेय विकासला हाका मारत समुद्राच्या आत धावत जात होता…

विकासची बोबडीच वळली, एका क्षणासाठी तर हे काय होतंय त्याला काहीच कळेना…

त्याने अमेयला थांबवण्याच्या सुरात जोरात हाक मारली आणि त्याच्या मागे मागे धावू लागला,
त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा फायदा झाला नाही,
पाहता पाहता अमेय खोल समुद्रात जाऊन नाहीसा झाला…

विकास तर एका क्षणासाठी स्तब्ध झाला…

आधीच ह्या सामसूम Beach वर त्या तिघांना तो हरवून बसलेला, आणि तेच समोरचं हे दृश्य,

त्याचे पूर्ण अवसानच गळायला लागले…
हातापायातले होते नव्हते त्राण सुद्धा निघून गेले,
ते दृश्य त्याच्या मनातून जातंय न जातंय, तेच परत त्याला मागून हाक आली,
ही हाक अर्जुनची होती…

त्याने सर्वांग एकवटून मागे पाहिले,
तर अर्जुन एका झाडाच्या फांदीवर बसून विकासकडे बघत क्रुरपणे हसत होता…

अर्जुनला बघून विकासला जरा हायसं वाटलं, पण हा झाडावर इतक्या उंचावर काय करतोय…
विकास त्या झाडावर पोहोचणारच की बघता बघता अर्जुन सुद्धा तिकडून नाहीस झालेला…

आता मात्र विकासला ह्या Beach वर एक क्षणसुद्धा थांबणे धोक्याचे होते,

त्याने तातडीने परतीचा रस्ता पकडला, धावत धावत जिकडून त्यांनी Beach मध्ये प्रवेश केलेला तिकडे आला, पण तिकडे उंचच उंच भिंत होती, पूर्णपणे पॅक…

विकास अजून थोडा पुढे गेला, नक्कीच अजून एखादा मार्ग असेल इकडून बाहेर पडण्याचा,
तो शोधण्यामध्ये पूर्ण गुंग झालेला, की तितक्यात त्याला त्या तिघांचे एकदाच आवाज आले…

त्याने मागे वळून पाहिले, पाठीमागे अर्जुन, सुजय आणि अमेय तर होते, पण तिघांचेही शरीर आगीने जळत होते,
तिघांच्याही अंगातून जणू तप्त लावा निघत होता,
पण तिघांपैकी कोणीच ओरडत नव्हते, उलट ते विकास कडे बागून छद्मी हास्य करत होते…

इतकं भयानक दृश्य विकास स्वप्नात सुद्धा विसरला नसता,
विकास ने ना आव बघितला ना ताव आणि जोरात किंचाळी मारत उलट्या दिशेने धावत सुटला…

थोडं पुढे जाताच, त्याच्या पाठीवर सुद्धा काहीतरी ऊब आल्यासारखी जाणवली, पाठीमागे बघायची हिम्मत नसताना सुद्धा त्याने धावत धावतच मागे बघितले, आणि जे बघितले, ते बघून कोणीही मनुष्य जागीच कोसळला असता…

ते तिघेही जळत्या शरीरांनी विकास च्या मागे धावत होते,
त्यांचे चेहरे जळून त्यातील त्वचा एखाद्या वितळत्या तप्त मेणा सारखी खाली गळत होती,
त्याचीच ऊब विकासच्या पाठीवर जाणवत होती…
आता पर्यंत विकास रडायचाच बाकी होता…
पण ह्या घटनेमुळे ते सुद्धा झालेलं,

पाठीमागे वाघ लागल्यावर हरणाची जी अवस्था होते तशी अवस्था आता विकासची झालेली
किंचाळत ओरडत विकास धावत होता, आणि त्याच्या मागे ते तिघे हफाफलेल्या पाऊलानी विकसाच्या मागावर लागलेले, त्यांच्या तोंडातून भयानक घोगरे स्वर निघत होते…
त्याला त्याच्या आयुष्यातले सगळे पाप एकाच क्षणी आठवले…

Beach वरून बाहेर पडण्याचा मार्ग त्याला कुठेच सापडत नव्हता…
आता ह्या तिघांपासून वाचण्याचा एकच उपाय त्याला माहीत होता…

धावता धावता त्याने त्याचा मार्ग बदलला आणि जाऊन जोरात समुद्रात उडी मारली…

पाण्यात डुबकी मारण्याचा जोरात आवाज आला, आणि परत पाहिले सारखं झालं…

विकासने काही वेळ जाऊन दिले,
परत एकदा चाहुबाजूला स्मशान शांतता पसरली…

त्याने डोकं वर केलं…
आता Beach वर ते तिघे नव्हते, परत एकदा सर्व पूर्ववत झालेलं…

क्षणभरासाठी उसंत घेत विकास तिकडेच बसून राहिला,
आणि सगळं काही ठीक वाटल्यावर पुन्हा परत जाण्यासाठी उठला,

पण जास्त वेळ उठू नाही शकला, कारण जसा तो परत जाण्यासाठी वळला, तसा त्याला पाण्यातून कोणीतरी पायाला पकडून परत खाली पाडला…

विकास उठायचा प्रयत्न करत होता, पण त्याचा पाय कोणितरी पकडूनच ठेवलेला, त्याच्या हाताची पकड पाण्यात सुद्धा इतकी मजबूत होती, की अथक प्रयत्न करून सुद्धा विकास त्या पकडीतून बाहेर येऊ शकला नाही…

उलट विकासचा पाय पकडून तो त्याला अजून समुद्रात खेचून घेऊन जाऊ लागला…

आता मात्र विकासाची होती नव्हती ती ताकत सुद्धा त्याला उत्तर देत होती,
त्याला समजून चुकलं आपली किती मोठी चुकी केली इकडे येऊन,
त्याने हात जोडत रडलेल्या स्वरात विनवणी केली…

” मला जाऊ दे, मी काय बिघडवलंय तुझं, प्लिज मला जाऊदे, मी परत कधीच इकडे येणार नाही, माफ कर मला जाऊदे”

पण विकासचे त्याने काहीच ऐकले नाही, उलट अजून त्याला समुद्रात घेऊन जाऊ लागला,

विकासच्या शेवटच्या घडीला त्याच्या एका वर एक किंचाळी निघत होत्या…
पण ऐकणारं त्या अथांग समुद्राशिवाय कोणीच नव्हते…

दुसऱ्या दिवशी सकाळी काही कोळ्यांना एक मृत शरीर तरंगताना दिसले…
तातडीने त्यांनी पोलीसांना बोलावले…

पोस्टमॉर्टेम ने समजलं की विकासचा मृत्यु मुद्दाम बुडवून करण्यात आला आहे, त्याच्या जागे जागे वर नखांचे व्रण सापडले…
संशयाच्या रुपात पोलीसांनी अर्जुन, अमेय आणि सुजय, तिघांनाही ताब्यात घेतले…

आजही तो Beach रात्री ७ नंतर बंद असतो…
काही लोकांचं म्हणणं आहे की रात्रीच्या वेळी त्या Beach वरून जोरात किंचाळण्याचा आवाज येतो,
दिसत मात्र कोणीच नाही…..

Horror Stories In Marathi – शौर्यकथा – वाडा | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – तो..| Storyteller Rushi

तुम्हाला ही Marathi Bhaykatha no. 7 – हा सागरी किनारा 

कशी वाटली हे comments करून आम्हाला सांगा. आशा आहे की तुम्हाला Horror Stories In Marathi- हा सागरी किनारा ही भयकथा आवडली असेल.

जर तुम्हाला हि भयकथा – हा सागरी किनारा आवडली असेल तर तुम्ही तुमच्या friends सोबत social networks जसे की Facebook, google, twitter इत्यादी वर share करा.

तसेच Like करा आणि ह्या आणि अश्या बऱ्याच कथा Audible स्वरूपात ऐकायच्या असतील तर आपल्या Storyteller Rushi च्या YouTube Channel ला भेट द्या.तुम्हाला सुद्धा तुमच्या Horror Stories किंवा तुमचे horror experience आमच्या पर्यंत पोहचवायचे असतील तर Email : Storytellerrushi@gmail.com यावर mail करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply