Horror Stories In Marathi – आजची हि Marathi Bhaykatha no. 13 – फोटो स्टुडिओ. जरुरी नाही दर वेळी भूत, प्रेत, आत्मा हेच घातक ठरतील, कधी कधी काही वास्तू वा वस्तू सुद्धा जीवघेणे ठरू शकतात.

Marathi Bhaykatha no. 13 – फोटो स्टुडिओ (Horror Stories In Marathi)

“हे घ्या! तुमचे ८ फोटोज्”

‘थँक्स, खूपच अप्रतिम फोटोज् आलेत’

“अरे सर, मेंशन नॉट. परत कधी गरज लागली तर कधीपण या, हा माझा कार्ड घेऊन जा”

‘हो, हो नक्कीच’

अमनचा छोटासा फोटोस्टुडिओ होता, येणाऱ्या गिऱ्हाईकांचे फोटोज् काढण्याचा त्याचा लहानसा व्यवसाय होता,

आणि त्यामधुनच अमन त्याचा घर उत्तमरीत्या चालवत होता.

फोटो काढायची आवड आणि कौशल्य, ह्यांमुळे त्याच्या फोटोजचे सर्वजण नेहमी स्तुती करायचे.

आजचे शेवटचे ग्राहक उरकून अमन घरी चालला, तसा रोज ८-८:३० च्या सुमाराला घरी असतो, पण आज काम जास्त असल्यामुळे पहिल्यांदा ९:३० झाले.

घरी जेवण वैगेरे करून अमन सोफ्यावर पडून विचार करायला लागला, की आपण ह्या पेशाची सुरुवात तर केली आहे, लोकांचा प्रतिसाद सुद्धा उत्तम आहे, पण आता ह्याला अजून कसे उत्तमोत्तम बनवता येईल?.

अमन ह्या व्यवसायात नवखा जरूर होता, पण तेवढाच मेहनती सुद्धा. त्याला रोज नवनवीन शिकण्याची आणि करण्याची खूप आवड होती.

एकदा तो त्याच्या स्टुडिओ मध्ये नेहमीसारखाच फोटो काढत होता, की तितक्यातच त्याच्या कॅमेरा मध्ये काहीतरी खराबी आली.

“अरे यार! काय झालं आता ह्याला. अजुनपर्यंत तर कधी याने प्रॉब्लेम नाही दिला, आताच कसं नेमकं.

अहो सॉरी सर, हे काय झालं मध्येच कॅमेराला काही कळेना”

‘अरे राहू दे अमन, मी बघतो. नंतर येतो वाटल्यास’

आजच ह्याला सर्व्हिसिंगला टाकतो. आणि थोडे पैसे आल्यावर अजून २ कॅमेरे घेतो, पटकन आजसारखी वेळ आल्यावर ग्राहकांसमोर फजिती होण्यापासून तरी वाचू.

अमन स्टुडिओ बंद करून आधी कॅमेरा सर्व्हिसिंग करायला गेला.

Horror Stories In Marathi – शौर्यकथा – वाडा | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – तो..| Storyteller Rushi

तिकडे गेल्यावर माहिती पडलं, कॅमेरा ठीक व्हायला उशीर लागेल, कारण आधीपासूनच त्यांच्याकडे खूप रिपेयर्स चे काम पडलेले.

तोपर्यन्त त्यांनी त्यांच्याच शॉप मधला एक जुना पण ठीकठाक अवस्थेमध्ये असलेला कॅमेरा अमनला दिला आणि बोलले, जोपर्यत हा कॅमेरा ठीक होत नाही, तोपर्यंत तुम्ही ह्या कॅमेराने काम करा.

अमनला गत्यंतर नव्हता, त्याने मानेनेच होकार कळवत कॅमेरा घेतला.

संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर अमनने सहजच कॅमेरा बघायला घेतला.

कोणत्या तरी जुन्या प्रकारचा कॅमेरा होता, जुन्या जमान्यात प्रसिद्ध असलेला रोल वाला कॅमेरा.

त्यात फोटो काढल्या नंतर त्याचे प्रिंट दुसऱ्या दिवशी बनवायला लागत होतं.

त्या कॅमेराला बघून अमन जरा चिडलाच.

“अरे यार, डिजिटल कॅमेरा च्या जमान्यात हा रोल वाला कॅमेरा कोण ठेवतो आजकालच्या काळात.

जाऊदे, तोपर्यंत आपला धंदा तरी चालू राहील”

दुसऱ्या दिवशी अमन नेहमीप्रमाणे स्टुडिओमध्ये जाऊन त्याचं काम करत बसला होता, की तितक्यातच एक कस्टमर आला.

नमस्कार, माझे नाव आयुष चौधरी मला काही पासपोर्ट साईज फोटोज् हवे होते.

अमनने त्याला आतमधल्या खोलीत बसायला सांगितले आणि तो सर्व लाईट्स कॅमेरा सेट करायला लागला.

सर्व सेट करून झाल्यानंतर अमनने त्याचे काही फोटोग्राफ्स घेतले.

“झालं..! तुम्ही उद्या सकाळपर्यंत या. मी तुमचे कॉपीज् तयार ठेवतो”

कस्टमर निघून गेल्यावर अमन त्याच्या कामाला लागला.

जसा त्याने कॅमेरा कॉम्पुटरला कनेक्ट करायला घेतला, तसं त्याच्या एक गोष्ट लक्षात आली, कॅमेरा तर आपण त्या रिपेअर वाल्याकडून घेतलेला, पण त्याची कॉम्पुटर ला कनेक्ट करणारी वायरच घ्यायचा विसरलो.

एवढा हलगर्जीपणा कसा होऊ शकतो आपल्याकडून,,,

कॅमेरा विंटेज होता, त्यामुळे त्याची वायर अमन कडे नव्हती.

स्वतःच्याच नशिबाला दोष देत अमनने गाडी काढली आणि त्या रिपेअर वाल्याकडे जायला निघाला.

रिपेअर वाल्याकडून वायर घेऊन अमन परत त्याच्या कामाला लागला.

पहिले तर कॅमेराने कनेक्ट व्हायला थोडंस त्रास दिलं. पण नंतर आपोआप कनेक्ट झाला.

ज्यावेळी अमन फोल्डर मध्ये फोटो शोधायला लागला, तेव्हा त्यावेळी त्याने जे बघितले ते बघून त्याच्यामधली सहनशीलता आता संपत चाललेली.

Horror Stories In Marathi – हौंटेड हायवे | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – झपाटलेलं रेल्वे स्टेशन | Storyteller Rushi

त्याने उघडलेल्या त्या फोल्डर मध्ये एकही फोटोज् किंवा डॉक्यूमेंट्स नव्हते.

फोल्डर पूर्णपणे रिकामा होता.

आता मात्र अमनचा संयम तुटलेला. त्याने दात-ओठ खात कॅमेऱ्याची वायर जोरात डिस्कनेक्ट करून परत कनेक्ट केली.

पण याचा काहीच फायदा झाला नाही, फोल्डर पुन्हा एकदा पूर्णपणे रिकामाच दिसला.

अमनचा राग आता शिगेला पोहोचलेला, स्वतःशीच पुटपुटत तो परत रिपेअर वाल्याकडे जायला निघाला.

‘आधी त्याच्याकडून वायर आणायला विसरलो, आणि आता हा कॅमेरा इकडे नाटकी करतोय’

रागाच्या भरात अमनने गाडीची किक मारली आणि तडक रिपेअर वाल्याकडे येऊन पोहोचला.

दुकानात पोहोचेपर्यंत अमनचा राग थोडा फार ओसरलेला.

“अरे भय्याजी, ये कैसा कॅमेरा दिया है. एक तो डिजिटल कॅमेरा के जमाने मे आपने मुझे ये पुराना रोल वाला कॅमेरा दिया, और तो और इसके फोटोज् भी कॉम्पुटर पे सपोर्ट नही करती”

रिपेअर वाल्या भय्याने अमन वर एक बारीक कटाक्ष टाकला, आणि त्याच्या हातातून कॅमेरा घेऊन त्याच्या कॉम्पुटर वर चेक केला.

जसा त्याने कनेक्ट करून फोल्डर उघडला, तसा अमनला आश्चर्याचा धक्काच बसला.

कारण त्या रिपेअर वाल्याच्या कॉम्पुटर वर ते फोटोज् अगदी व्यवस्थित रित्या ओपन होत होते.

अमनला काय बोलावे काहीच सुचत नव्हते,,, तो कॅमेरा घेऊन परत स्टुडिओ मध्ये आला. स्टुडिओ मध्ये येताच कॅमेरा आपल्या कॉम्पुटरला कनेक्ट करून फोटोज् बघायला लागला.

यावेळी त्याला आश्चर्याचा कमी पण सुखद धक्का जास्त बसला. कारण ह्यावेळी ते फोटोज् जश्या त्या तश्या सुस्थितीत होते.

त्याने पटकन त्याच्या कॉपीज् काढल्या.

नाही म्हटलं तरी त्याची त्या फोटो कॉपीज् वरून नजर हटत नव्हती.

त्याने आजवर त्याच्या कॅमेरा मधून इतके फोटोज् काढलेत, पण इतके सुंदर आणि अप्रतिम फोटोज् अमन पहिल्यांदा बघत होता.

मनातल्या मनात त्याला थोडी गिल्ट पण वाटत होती, आपण ह्या कॅमेराला किती नाही नाही ते उलटं-सुलटं बोललो.

पण आपल्या नॉर्मल कॅमेरा पेक्षा हा विंटेज कॅमेरा असून सुद्धा एवढे भारी फोटोज्,

आता हाच कॅमेरा जर सजीव आणि बोलका असता, तर कदाचीत त्याची माफी सुदधा मागितली असती.

फोटोज् नीट पॅक करून अमन घरी जायला निघाला.

आज धावपळ करून दमल्यामुळे घरी आराम करण्या व्यतिरिक्त त्याच्याकडे पर्यायच नव्हता. त्याने सर्व लाईट्स वैगेरे बंद करून घरी गेला.

दुसऱ्याच दिवशी सकाळी अमनने वर्तमानपत्र वाचायला घेतले.

वर्तमानपत्राच्या उजव्या कोपऱ्यात त्याच्याच शहारामधली एक बातमी दिसली.

 ”’हायवे वरून जाताना एका दुचाकीस्वाराला बसने उडविले”’

त्याच्याच शहारामधली बातमी होती म्हणून अमन अजून उत्सुकतेने ती बातमी वाचू लागला

”’काल दिनांक 15 जानेवारी रोजी संध्याकाळी ४ च्या सुमारास एका दुचाकीस्वाराचा रस्त्यावरून जात असताना बस ला जोरदार टक्कर लागून दुर्दैवी मृत्यू. मृताचे नाव त्याच्या लायसेन्स वर सापडले आहे, आयुष चौधरी. जर कोणी ह्याच्या घरातून ही बातमी वाचत असेल, त्याने ताबडतोब सिटी हॉस्पिटलमध्ये यावे”’

अमनने पूर्ण बातमी वाचली, पण सारखं सारखं त्याच लक्ष त्या नावकडेच जात होतं. आयुष चौधरी.

त्याचे डोळे मोठे झाले, तोंडातले शब्द तोंडातच राहून गेले.

‘अरे,,, हा तर कालच. म्हणजे आपल्या स्टुडिओमधून घरी जातानाच त्याचा अपघात झाला, आणि आज त्याचे कॉपीज् पण आपण रेडी ठेवलेले,

आपल्याला भेटला ती त्याची शेवटची भेट असावी,,, अरेरे किती हे दुर्दैव.

देव त्याच्या आत्म्यास शांती देवो’

आज सुद्धा अमन तयारी करून लवकरच स्टुडिओमध्ये पोहोचला. तिकडे पोहोचताच क्षणी एक गिर्हाईक त्याच्याकडे आला, सोबत त्याची बायको सुद्धा होती.

“नमस्कार सर, बोला तुमची काय मदत करू” अमन त्यांना विचाराता झाला

तितक्यात समोरचा माणूस बोलला

‘आम्हाला एक छोटा फोटोशूट करायचा आहे, कपल चा:

“हो या ना, आतमधे चला, तोपर्यंत मी सगळं सेट करून येतो”

अमनने सर्व सेट करून त्यांचे अप्रतिम असे फोटोज् क्लिक केले आणि त्यांना उद्या यायला सांगितले.

त्या जोड्याने सुद्धा अमनचे आभार मानले आणि परत जायला निघाले.

थोडाच क्षण गेला असेल की तितक्यातच स्टुडिओच्या बाहेरून लोकांच्या गोंगाटाचा आवाज आला,

काय झाले हे पाहण्यासाठी अमन स्टुडिओ बाहेर गेला,

बाहेर खूप लोकांनी गर्दी केलेली.

अमन कशीबशी वाट काढून त्या गर्दीच्या आतपर्यंत पोहोचला.

जसे त्याने समोर पाहिले, तशी त्याची पायाखालची जमीनच सरकली.

समोर रक्ताच्या थारोळ्यात तेच जोडपे होते, जे आताच त्याच्या स्टुडिओमधून फोटोज् काढून गेलेले.

आसपासच्या लोकांना विचारणा केल्यावर त्याला समजलं की रस्ता ओलांडताना त्यांना एका गाडीने उडवलं.

अमन ह्याआधी एवढा त्रस्त नव्हता झाला, जेवढा हे बघून झाला.

कालचेच प्रसंग अजून त्याच्या मनात एखाद्या घरट्या सारखे दडून बसलेले, की आज हे प्रसंग.

कोणीही दुबळ्या मनाचा व्यक्ती अमनच्या जागी असता तर नक्कीच त्याने ह्या घटनांचा ध्यास घेतला असता.

पण अमन त्यांपैकी तर नक्कीच नव्हता, ही गोष्ट सुद्धा निव्वळ योगायोग समजून त्याने सोडून दिली.

पण हे एवढ्यावरच थांबले नाही, ह्यानंतर सुद्धा एक नव्हे, दोन नव्हे,,, तब्बल ५ घटना अश्याच त्याच्या डोळ्या देखत घडत गेल्या.

जो कोणी त्याच्या स्टुडिओतून फोटो काढून जायचा त्याचा अकाली दुर्दैवी असा मृत्यू व्हायचा.

तो मृत्यू एकतर अपघाताने किंवा नैसर्गिक असायचा.

ह्याआधी कधीच अमनच्या बाबतीत एवढे भेडसावणारे प्रसंग घडलेच नव्हते.

जेव्हापासून हा जुना कॅमेरा घेतला तेव्हापासून त्याच्या व्यवसायाला अमावास्या लागलेली.

आता अमन सुद्धा पुरता गांगुरुन गेलेला, त्याची हिंमत आता त्याला उत्तर देत होती.

त्याने क्षणाचाही विलंब न लावता आधी रिपेअर वाल्याकडे धाव घेतली, तिकडे पोहोचला, पण ते दुकानच बंद होतं, त्याने आसपास विचारणा केल्यावर समजले की तो दुकानदार त्याच्या गावाला गेला आहे.

हताश होऊन अमन परत त्याच्या घरी जायला निघाला.

तो गाडी वरून घरी जातंच होता की,

‘अरे अमन’

अमन ते आवाजाच्या दिशेने बघितले, 

सुजय, त्याचा जुना मित्र लांबून त्याला हातवारे करून हाक मारत होता.

अमन त्याच्या जवळ गेला.

Horror Stories In Marathi – नदीच्या पलीकडे 2 | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – शेवटची रात्र | Storyteller Rushi

‘काय रे अमन, विसरलास पण आम्हाला, आता काय भाव पण देत नाहीस’

“अरे सुजय तसं नाही, थोडा डिस्टर्ब होतो, बाकी काही नाही, तू बोल आज अचानक कसा काय” ‘अरे जरा काम होतं मला म्हणून आलो, पण तुझं सांग, तू डिस्टर्ब कशामुळे’ “अरे तुला सांगितलं तर उगाच हसशील, बोलशील मलाच की एवढ्या शुल्लक कारणाला एवढा पॅनिक होतोय” ‘अरे, मित्रा! असं काहीच नाही, आपण काय काल परवा ओळखत नाही एकमेकांना, सांग तू बिनदास्त’

“ठीक आहे, पण कशी आणि कुठून सुरुवात करू कळतच नाही, अरे माझा फोटो स्टुडिओ आहे, तोच माझा व्यवसाय. थोड्या दिवसांपूर्वी माझा कॅमेरा खराब  झाला, म्हणून त्याला रिपेअरला दिला, पण रिपेयर्स व्हयला वेळ लागेल, माझी गैरसोय नको म्हणून त्या दुकानदारानेच मला त्याच्या जवळचा एक विंटेज कॅमेरा दिला, आणि त्यानंतर ज्या ज्या लोकांचे मी फोटोज् घेतले, त्या त्या जणांनी आपले प्राण गमावले आहेत रे.

आणि अश्या ७ घटना माझ्या डोळ्यासमोर घडल्यात.

आता ह्यातून सावरणे माझ्यासाठी तरी कठीण आहे”

सुजयने त्याचे वाक्य नीट ऐकून घेतले आणि मग बोलला-

‘तसं तू बोलतोय त्यात सत्यता असली, तर याचं गंभीर्य खूप मोठं आहे, तू त्या रिपेअर वाल्याकडे गेलेलास का?, काय बोलला तो?’

“अरे मी गेलेलो, पण तिकडे गेल्यावर समजलं की तो दुकान बंद करून गावाला गेलाय, बाकी कोणाला त्याच्या बद्दल इतकी माहिती सुद्धा नाही”

‘बरं एक काम करू, मी संध्याकाळचं जेवण झाल्यावर तुझ्याकडे येतो, आपण यावर विचार करू, 

आणि हो, ह्यावर काही तोडगा भेटत नाही, तोपर्यंत तो कॅमेरा बंद करून ठेव’

ठरल्याप्रमाणे सुजय आला, ते विचार करतच बसलेले, की सुजयला आठवलं,

‘अरे त्या कॅमेराचा काही बॉक्स वैगेरे असेल तो घेऊन ये’

बॉक्स आणल्यावर त्याच्यावर मॅनूफ़ॅक्चुअरिंग डेट, आणि कंपनी आणि त्याचा पत्ता दिलेला.

पत्ता जास्त लांबचा नव्हता. २ शहरं सोडूनच ते शहर लागत होते.

दोघांनी उद्याच तिकडे जायचे ठरवले.

दोघेही दिलेल्या पत्त्यावर पोहोचले, पण तिकडे पोहोचताच दोघांच्याही हाती निराशाच लागली. कारण ते स्टोअर सुद्धा बंदच होते.

आता मात्र त्यांच्याकडे काहीच उपाय नव्हता, हा त्यांचा शेवटचा प्रयत्न होता..

‘हे बघ अमन! तू टेन्शन नको घेऊस, तो रिपेअर वाला जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत थांब, आणि तू सुद्धा घरीच आराम कर. ज्यावेळी आपला कॅमेरा आपल्याला भेटेल तेव्हाच स्टुडिओमध्ये जा’

अमनला सुद्धा सुजयचे बोलणे पटले.

दोघे आपापल्या घरी गेले.

अमनला काही केल्या झोप लागत नव्हती.

येऊन जाऊन सारखे तेच विचार मनाला कुरतडत चाललेले..

कुठे ना कुठे तो ह्या सगळ्या घटनांचा भागीदार स्वतःला सुद्धा मानत असेल.

कमीत कमी असं काय आहे त्या कॅमेरा मध्ये, 

त्या कॅमेऱ्यातून जेवढ्या जणांचे फोटोग्राफ्स काढले आहेत, त्या सगळ्यांना त्यांचे प्राण गमवायला लागले,

पण इतकं वेळ ते कॅमेरा माझ्याकडे आहे, मला कसे काय झाले नाही अजून,,,

अमनच्या प्रश्नांना पूर्णविरामच नव्हता.

अखेर त्याने उद्या परत त्या स्टोअर मध्ये जायचे ठरवले त्या दिलेल्या पत्त्यावर.

ह्यावेळी सुजयला न घेता त्याने एकट्यानेच जायचे ठरवले.

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून तो लगेच जायला निघाला.

दिलेल्या पत्त्यावर पोहोचला, पण ह्यावेळी ते स्टोअर उघडे होते,

अमनच्या खुशीला पारावर उरला नव्हता.

आता त्याला त्याच्या सर्व प्रश्नांचे उत्तर भेटणार होते.

की हे नक्की भानगड तरी काय आहे.

स्टोअर मध्ये आतमधे गेला तसं पूर्ण स्टोअर मध्ये समान अस्ताव्यस्त पडलेलं. नुकतेच खूप सारे स्टॉक आले असतील म्हणून असेल कदाचित.

डाव्या बाजूला वरती जाण्याचा जिना होता, अमनला स्टोअर मध्ये कोणीच दिसले नाही, ना मालक, ना कस्टमर, ना वॉचमन.

अमन तसाच स्टोअर मध्ये शोधू लागला.

खाली सगळीकडे शोधलं त्या नंतर जिना चढून वरती गेला.

जसा अमन वरती गेला, तशी त्याची नजर समोरच्या एका भिंतीवर खिळली. 

भयाचे एक अगतिक दृश्य त्याच्या समोर होते.

समोर ८ फोटो फ्रेम्स लावलेले, त्यापैकी ७ फ्रेम्स वर त्या ७ जणांचे फोटोज् होते ज्यांचा मृत्यू अमनच्या स्टुडिओ मध्ये येऊन गेल्या नंतर झालेला.

आता मात्र अमनची चांगलीच बोबडी वळली, एवढा वेळ दाबून ठेवलेली भीती, एखाद्या धरणाच्या पाण्यासारखी त्याचा मनातून बाहेर येऊ लागली.

त्याची नजर ८ व्या फ्रेम वर पडली, पण ती फ्रेम रिकामी होती.

अमनचे हात पाय लटपटू लागले, सर्वांगावर एकदम शिरशीरी आली आणि लगेच त्याने तिकडून काढता पाय घेतला.

जसा स्टोअरच्या एक्सिट डोअर वर आला, तसा त्याच्या समोर तो डोअर बंद होऊन शटर खाली पडताना त्याला दिसला..

अमनने जोरात किंचाळी मारली, आणि जोर जोरात दरवाजा ठोठावु लागला, पण लांब लांब पर्यंत त्याची किंचाळी ऐकणारा कोणीच नव्हता.

शटर पूर्णपणे बंद झालेला आणि आतमधून अमनच्या किंचाळ्या सोबत अजून एक आवाज येऊ लागला

तो म्हणजे सारखा सारखा वारंवार फोटो क्लिक होण्याचा आवाज.

खूप दिवस झाले, अमनचा काहीच फोन नाही किंवा तो घरी नाही स्टुडिओ मध्ये पण नाही. 

सुजयला याचा खूप संशय यायला लागला, आणि त्याने त्याच्या बाबांना जे पोलीस मध्ये होते, त्यांना घेऊन त्या स्टोअर मध्ये पोहोचले.

स्टोअरचा दरवाजा बंद होता तो तोडण्यात आला.

आतमधे पोटाजवळ पाय ठेवुन अमनचा शव निपचित पडलेला.

पूर्ण स्टोअर मध्ये शोधले पण काहीच हाती सापडले नाही, पोस्टमॉर्टेम मध्ये रिपोर्ट आले की हृदय विकाराने त्याचा मृत्यू झालेला.

स्टोअर पूर्णपणे खाली केला गेला, त्या स्टोअर मध्ये कॅमेरा आणि त्या ८ फोटोफ्रेम्स सुद्धा काढल्या गेल्या ज्यात एक फोटो अमनचा देखील होता.

त्या नंतर सुजयने तो कॅमेरा नदीत टाकून फेकून दिला.

कधी कधी जुन्या वस्तू घेतल्या तर त्या पूर्ण पडताळल्या शिवाय कधीच खरेदी करू नये,

काय माहीत कोणाची आत्मा त्या वस्तू मधून परत जन्म घेऊ शकेल..

Horror Stories In Marathi – हा सागरी किनारा | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – नदीच्या पलीकडे 1| Storyteller Rushi

तुम्हाला ही Marathi Bhaykatha no. 13 – Horror Stories In Marathi – फोटो स्टुडिओ

कशी वाटली हे comments करून आम्हाला सांगा. आशा आहे की तुम्हाला Horror Stories In Marathi – फोटो स्टुडिओ ही भयकथा आवडली असेेल.

जर तुम्हाला हि भयकथाHorror Stories In Marathi – फोटो स्टुडिओ आवडली असेल तर तुम्ही तुमच्या friends सोबत social networks जसे की Facebook, google, twitter इत्यादी वर share करा.

तसेच Like करा आणि ह्या आणि अश्या बऱ्याच कथा Audible स्वरूपात ऐकायच्या असतील तर आपल्या Storyteller Rushi च्या YouTube Channel ला भेट द्या.तुम्हाला सुद्धा तुमच्या Horror Stories किंवा तुमचे horror experience आमच्या पर्यंत पोहचवायचे असतील तर Email : Storytellerrushi@gmail.com यावर mail करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply