Horror Stories In Marathi – आजची हि Marathi Bhaykatha no. 12 – झपाटलेलं रेल्वे स्टेशन. ह्या जगात काही जागा अश्या पण असतात, जिकडे रात्री काय दिवसा जाणे पण टाळावे, आजची गोष्ट अश्याच एका झपाटलेलं रेल्वे स्टेशनची.

Marathi Bhaykatha no. 12 – झपाटलेलं रेल्वे स्टेशन (Horror Stories In Marathi)

“ऋषिकेश ऽऽ 

ही शेवटची फाईल तेवढी पूर्ण करून दे, तसं ही शनिवार आणि रविवार हे २ दिवस सुट्टीचेच जाणार आहेत, त्या आधीच हे टार्गेट पूर्ण करून जा”

‘ठीक आहे सर, पण ही शेवटची फाईल, आज खूप उशीर झालाय’

“हो! हे तेवढं पूर्ण कर आणि जा तू”

बॉसचा आदेश पूर्ण करावाच लागेल, शेवटी पोटापाण्याचा प्रश्न, त्या साठीच हा जॉब करत होतो.

पण आज दर वेळ पेक्षा जरा जास्तच उशीर झालेला.
सेकंड शिफ्ट चालू होती, नेहमी प्रमाणे १० वाजता सुटायला हवं होतं, पण आज ११.३० झालेले.
काहीही करून शेवटची १२ ची ट्रेन पकडायचीच होती.

मी सर्व काम आवरून घाई घाईमध्ये ११.५० ला निघालो
स्टेशन जास्त लांब नव्हते.
तरीही मी स्टेशन पर्यंत पोहोचायच्या आधीच शेवटची ट्रेन माझ्या डोळ्यासमोरूनच गेली.

झालं..
जे नको व्हायला हवं होतं तेच झालं.
आता थेट सकाळची ट्रेन होती ते सुद्धा ४ वाजता.

तिकडेच थांबून सकाळच्या पहिल्या ट्रेन ची वाट बघत बसण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता.

स्टेशनला पोहोचलो.
स्टेशन पूर्णपणे सामसूम होतं.
दिवसा स्टेशन माणसांच्या गर्दीमध्ये लगबगलेलं
आणि तेच स्टेशन आता निर्मनुष्य झालेलं.
साधं कोणी चिटपाखरू सुद्धा नव्हतं, 
सगळीकडे स्मशानशांतात पसरलेली.
दूर कोठेतरी कुत्र्यांच्या विव्हळण्याचा आवाज त्या शांततेला भंग करत होता.

मी स्टेशन ऑफिस कडे गेलो पण ते ऑफिस सुद्धा आज बंद होतं.
परत प्लॅटफॉर्म वर आलो, बॅग खाली ठेवली आणि नशिबाला दोष देऊन जवळच्याच एका बाकड्यावर आडवा झालो.

डोळे बंद करून झोप लागणारच, की तितक्यात ट्रेन चा आवाज दुरून यायला लागला.
बघता बघता तो आवाज मोठा होत गेला, बहुधा ट्रेन आली असावी.
मी ताबडतोब उठून प्लॅटफॉर्म च्या जवळ जाऊन बघितले, पण दूर दूर पर्यंत ट्रेन काय,,, ट्रेन चा उजेड सुद्धा नव्हता.

बहुतेक मनाचा भ्रम असावा, म्हणून परत माझ्या जागेवर जाऊन झोपायचा प्रयत्न करू लागलो.

खूप वेळा नंतर झोप लागलीच.

थोड्या वेळाने जाग आली, ते सुद्धा पैंजनांच्या आवाजाने.
उठून आधी घडाळ्याकडे बघितले तर रात्रीचे २ वाजलेले,
मी आजू बाजूला बघितले. पण पूर्ण प्लॅटफॉर्म वर कोणीच नव्हतं.

Horror Stories In Marathi – फोटो स्टुडिओ | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – शौर्यकथा – वाडा | Storyteller Rushi

मी परत झोपायचं प्रयत्न करायला लागलो.
की तितक्यात पैंजनांचा आवाज माझ्या डावीकडून आला, आणि या वेळी एकदम स्पष्टपणे ऐकू आला.
मी क्षणाचाही विलंब न करता उठलो आणि आवाजाच्या दिशेने जायला निघालो.

आवाज पलीकडच्या प्लॅटफॉर्म वरून आलेला.
मी पायऱ्या उतरून प्लॅटफॉर्म च्या खाली आलो,
खाली विचित्र प्रकारची थंडी वाजत होती, जेव्हा मी वरती झोपलेलो तेव्हा इतकी थंडी नव्हती जेवढी प्लॅटफॉर्म च्या खाली होती, 

मी थोडंस चालत पुढे जाणारच, की माझ्या समोरच पांढऱ्या साडी वरती एक बाई बाजूच्या प्लॅटफॉर्म वरती पायऱ्या चढून वर जाताना दिसली.

मी जेव्हा स्टेशन वर आलेलो तेव्हा तर साधं कुत्रं पण नव्हतं.
आणि अचानक ही बाई कुठून आली,

मी तिच्या मागावर गेलो, पायऱ्या चढून बाजूच्या प्लॅटफॉर्म वर गेलो तर वरती कोणीच नव्हतं.

थोड्या वेळा साठी तर पूर्णपणे अचंबित झालो.
तेवढ्यात परत पैंजनाचा आवाज घुमायला लागला.
पण ह्यावेळी आवाज माझ्या मागून, म्हणजे पायऱ्यांच्या खालून आलेला.

Horror Stories In Marathi – अंधार | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – षंढ | Storyteller Rushi

मी झटकन मागे वळलो आणि खाली जायला लागलो.
खाली पोहोचताच जे पाहिलं, ते बघातच क्षणी तोंडात किंचाळी आली,

आता ती बाई माझ्या पेक्षा ५ पावलांवर होती,
८ फूट उंच, केस जमिनीला लागतील एवढी मोठी, ते केस तिने तोंडासमोर घेतलेले, त्या केसांमधून सुळयांसारखे दोन तीक्ष्ण दात बाहेर आलेले,
तिला वर पासून खाल पर्यंत बघतली तेव्हा नजर पायांकडे गेली, 

तिचे दोन्हीं पाय उलटे..
माझ्याकडे बघून तिने जोरात फुत्कार मारत माझ्यावर धाव घेतली.
तिला बघून आधीच माझे सर्व अवसान गळून पडलेले.
पण जीव वाचवायला इकडून पळणे गरजेचे होते.
मी ना आव बघितला ना ताव, मागे वळलो आणि जोरात धावत सुटलो.
तिकडून धावत दुसऱ्या पायऱ्यांपर्यंत गेलो, जिकडून स्टेशन च्या बाहेर जाण्याचा रस्ता होता.
तिकडे पोहोचायच्या आधीच ती बाई माझ्या समोर येऊन उभी राहिली.

आता त्या बाई आणि माझ्या मध्ये काही इंचाचाच फरक होता.

तितक्यात वाऱ्याची एक झुळूक आली आणि त्या वाऱ्याच्या झुळुकामध्ये त्या बाई चे केस उडून तिचा चेहरा दिसला.

तिचा चेहरा पूर्णपणे जळून निघाला होता.
पूर्णपणे भाजली गेली होती ती, त्यातून २ दात बाहेर आलेले, आणि बुबुळ तर पूर्णपणे पांढरी होती,
 ते दृश्य इतकं भयावह होतं की दुर्बल हृदयाचे तर ते बघताच क्षणी बेशुद्ध झाले असते.
पण मला काहीही करून इकडून बाहेर जायचे होते.

तितक्यात त्या बाई ने परत जोरात फुत्कार मारत माझ्यावर झडप घेतली आणि मला घट्ट पकडून धरलं.
तिची पकड एवढी मजबूत होती, की मी काहीच हालचाल करू शकत नव्हतो.
जसा साप त्याच्या शिकरावर झडप घेऊन त्याला जखडून ठेवतो तसं तिने मला जखडून ठेवलेलं
आणि त्या भक्ष्यासारखी माझी अवस्था झालेली.

खूप प्रयत्न करून सुद्धा मी तिच्या तावडीतून सुटू शकलो नाही.
तिचे दात माझ्या नरडीचा घोट घेण्या कडे वळले, 
पण त्याच क्षणी एका ट्रेन चा जोरात आवाज यायला लागला.

ती ट्रेन जशी जवळ आली, तशी त्या बाई ची माझ्या वरची पकड थोडी कमकुवत झाली.

हीच संधी साधून तिला जोरात हिसका देऊन तिकडून पाळायला लागलो.
पळता पळता रेल्वे ट्रॅक कडे लक्ष गेलं, तर लांबून एक ट्रेन येत होती, मला थोडंस हायसं वाटलं.
पण जशी ती ट्रेन जवळ आली, तसा आजून एक धक्का बसला.
आणि ह्या वेळी तर हृदयविकाराचा झटका यायचाच बाकी होता.

ती ट्रेन जवळ येताच समजलं की त्या ट्रेन ला पूर्णपणे आग लागलेली, त्या आग लागलेल्या ट्रेन मध्ये खूप प्रवासी अडकले होते, त्यांचे रडण्याचे, ओरडण्याचे आवाज कान बधिर करत होते,
ती ट्रेन भरधाव वेगात ट्रॅक वर धावत होती.
आणि बघता बघता एकदम एकाएकी गायब झाली.

आता मात्र मला कळून चुकले होते, की माझा स्टेशन ला थांबण्याचा निर्णय सपशेल चुकीचा ठरला.

आता इकडे अजून जास्त वेळ थांबणे म्हणजे मूर्खपणा होता.
मी मागे वळून न बघताच धावत धावत पायऱ्या उतरून खाली आलो आणि स्टेशन च्या बाहेर येऊनच आरामाचा श्वास घेतला.
स्टेशन च्या बाहेर येऊन परत एकदा स्टेशन वर नजर फिरवली, तर पूर्णपणे ओसाड असे ते स्टेशन खुप भयानक भासत होते.

Horror Stories In Marathi – नदीच्या पलीकडे 1| Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – नदीच्या पलीकडे 2 | Storyteller Rushi


परत जायला मागे वळणारच की तितक्यात आठवले मी माझी बॅग तर स्टेशन वरच विसरलो जिकडे मी मगाशी झोपलेलो.

झालं कल्याण.

त्या बॅगेमध्ये माझे सर्व महत्त्वाचे कागदपत्रं आणि जॉब च्या फाइल्स होत्या.

मृत्यूच्या दाढेतून परत आलेलो. पण परत तिकडे जायचं म्हणजे स्वतःहुन सिंहाच्या गुहेत जाण्यासारखं होतं,
आणि ते सुद्धा गुहेत सिंह आहे हे माहीत असूनही.

मनाची तयारी केली आणि निघालो परत स्टेशन कडे जायला.

आता ते स्टेशन मागासच्या पेक्षा जास्त भकास वाटत होते.
आतमधे गोठवून टाकणारी थंडी होती,
विजेचे दिवे मिणमिण करत होते, सगळीकडे तसंच सामसूम होतं.
जणूकाही तिकडे वर्षानुवर्षे कोणीच पाऊल सुदधा नाही टाकले.
मी चालत चालत जिकडे झोपलेलो तिकडे जायला लागलो.
माझी बॅग तिकडे तशीच पडून होती, बॅग उचलून मागे वळलोच की तितक्यात माझा पाय कोणीतरी खेचून मला खाली पाडले.
आता मात्र पुरता गांगरून गेलो आणि उठून परत पायऱ्या चढून खाली गेलो आणि बाहेरच्या दिशेने धावायला लागलो.
जिकडून बाहेर जायचा रस्ता होता, तो रस्ता बंद झालेला.
तिकडे एक भिंत होती आणि त्या भिंतीला पाठमोरी उभी राहून तीच बाई जोरात हसत होती..

प्लॅटफॉर्म च्या खाली एकच दिवा होता आणि त्या दिव्याचा प्रकाश त्या बाई वर पडून ती अजूनच भयानक दिसत होती.

मी परत मागे वळलो आणि प्लॅटोफार्म वरून धावू लागलो, मला इकडून बाहेर जाण्याचा अजून एक रस्ता माहीत होता, तो म्हणजे प्लॅटफॉर्म च्या मागच्या बाजूने.

मी धावत धावत त्या बाजूला जायला लागलो.
माझ्या मागे त्या बाई च्या धावण्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता.
मागे वळून बघायची हिम्मत नव्हती, लक्ष फक्त त्या बाहेर जाण्याच्या रस्त्याकडे होता.

जसा तो बाहेर जाण्याचा रस्ता जवळ आला तशी नजर मागे फिरवली आणि रडू कोसळले.
ती बाई एखाद्या वाघासारखी ४ पायांवर उड्या मारत वेगाने माझ्यावर झेपावत होती.

मी माझा वेग अजून वाढवला पण तिच्या वेगा पुढे ते असफल ठरले.
आणि तिने माझ्या पायाला पकडून मला खाली पाडले.
माझ्या धावण्याच्या वेगामुळे मी खूप जोरात खाली आपटलो,
हनुवटी ला जबर मार बसला.
माझ्या लागलेल्या भागाला हात लावणार तितक्यात तिने माझ्या पायाला धरून मला मागे ओढायला सुरुवात केली.
पूर्ण स्टेशन पर्यंत माझ्या जोर जोरात किंचाळ्या ऐकू येत होत्या.
मी खूप विनवणी करत होतो पण काहीच फायदा होत नव्हता.
त्या सैतान रूपी बाई ला माझा जीव घ्यायचाच होता.

एकाएकी ती बाई थांबली आणि माझ्याकडे वळून तिचे सुळयांसारखे दात माझ्याजवळ आणून मला खाणारच, तितक्यात मी माझे हात माझ्या चेहऱ्यासमोर आणून  तिला टाळण्याचा प्रयत्न केला, आणि मोठी किंचाळी मारत बेशुद्ध झालो.


सकाळ झाली.
उठलो, सगळीकडे खूप गर्दी होती, स्टेशन परत पाहिलेसारखा झालेला.
ट्रेन चा आणि गर्दी चा आवाज होता.
माझ्याकडे सर्वजण एकदम तुच्छ नजरेने बघत होते.

कारण कोणीही पांढऱ्या कपड्यावर बाई बघितली की तिला बघून मी माझ्या चेहऱ्यासमोर हात ठेवून किंचाळत होतो.

आज २ महिने झाले तरी मी इकडेच आहे, पण अजूनही कोणी पांढऱ्या कपड्यावर बाई दिसली की मी किंचाळतोच.
सर्व लोकं मला वेडी बोलतात
आणि मी त्यांना सांगतो मी वेडा नाहीय.

Horror Stories In Marathi – त्या भयाण रस्त्यावर | Storyteller Rushi

Horror Stories in Marathi – द क्रिटिकल केस | Storyteller Rushi

तुम्हाला ही Marathi bhaykatha no. 12 – झपाटलेलं रेल्वे स्टेशन

कशी वाटली हे comments करून आम्हाला सांगा. आशा आहे की तुम्हाला Horror Stories In Marathi- झपाटलेलं रेल्वे स्टेशन ही भयकथा आवडली असेल.

जर तुम्हाला हि भयकथा – झपाटलेलं रेल्वे स्टेशन आवडली असेल तर तुम्ही तुमच्या friends सोबत social networks जसे की Facebook, google, twitter इत्यादी वर share करा.

तसेच Like करा आणि ह्या आणि अश्या बऱ्याच कथा Audible स्वरूपात ऐकायच्या असतील तर आपल्या Storyteller Rushi च्या YouTube Channel ला भेट द्या.तुम्हाला सुद्धा तुमच्या Horror Stories किंवा तुमचे horror experience आमच्या पर्यंत पोहचवायचे असतील तर Email : Storytellerrushi@gmail.com यावर mail करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply