horror stories in Marathi – आजची Marathi Gudh Katha 5 – अंधार हि Darkness Concept वर आधारित आहे.रात्र, अंधार, काळोख… एक नकारात्मक प्रहर, पृथ्वीच्या प्रत्येक प्रत्येक घटकातून निघणाऱ्या नकारात्मक ऊर्जेचा वावर.

याउलट दिवस, उजेड, प्रकाश… सर्वांना हवाहवासा वाटणारा, एक प्रकारच्या सकारात्मकतेने, प्रसन्नतेने भरलेला, सूर्याच्या पवित्र अश्या किरणांपासून उजळून निघालेली समस्त धरती…

Marathi Gudh Katha no. 5 – अंधार (Horror Stories In Marathi)

पण अंधार म्हणजे तरी काय?

प्रकाशाचा अभावच ना! जशी दैवी शक्ती आहे, तशीच अमानवी शक्ती सुद्धा आहे, मानलं तर दोन्ही आहेत, मानलं तर दोन्ही नाहीत… रात्र सरल्यानंतर दिवस आहेच की.

पण तरी ह्या रात्रीचा एवढा द्वेष का?

दिवस जर प्रसन्नता घेऊन येत असेल, तर रात्र वैराची आहे, घातकी आहे, असं का ठरवून टाकता?

पृथ्वीची स्वतः भोवतीच्या एका परिक्रमेलाच दिवस-रात्र म्हणतात, मग पृथ्वीच्या अर्ध्या परिक्रमेला एवढं महत्व आहे, तर राहिलेल्या अर्ध्या परिक्रमेला का नाही?

मी तरी ह्या मताचा नाही, किंबहुना मी तर ह्याच्या पूर्णपणे विरुद्ध आहे… मला आवडते ती रात्रीची निरव शांतता, त्यात हरवून जायला आवडतं, चांदण्यांशी गप्पा मारायला आवडतात, रात्रीच्या अंधारात न्हाऊन निघायला आवडतं.

शाळा-कॉलेजातून बाहेर निघाल्यापासून मी असाच आहे, आता मला टिपिकल इन्ट्रोव्हर्ट म्हणा, किंवा काहीही… मला त्याची फिकीर नाही, आता मोठ्या हुद्द्यावर जॉबला लागल्यानंतर सुद्धा माझा हा स्वभाव बदलला नाही…

दररोज वाटतं, कधी एकदाचा हा दिवस संपतोय आणि जिवाच्या जास्त प्रिय भासणारी रात्र होते आणि कधी माझ्या विचारांच्या प्रवाहाला दिशा भेटते.

मग रात्र झाल्यावर पावलांचे आपसूकच त्या निर्मनुष्य रस्त्यावर जाणे, त्या अंधाऱ्या रात्री स्वतःला त्या रात्रीच्या स्वाधीन करणे,ते स्वर्गसुख म्हणतात ते हेच का?…

शुक्रवारची १३ तारीख, आज पुन्हा एकदा कामावर जायला उशीर.

मग परत ते बॉसचे ओरडणे, सर्व कलीग्स समोर माझा अपमान करणे, आणि बॉसला मनातल्या मनात २-४ शिव्या घालत, मान खाली घालून परत आपल्या कामाला लागणे…

हे तर आता रोजचंच झालंय. आणि ह्या सगळ्यांची एक प्रकारे सवयच लागून गेली.

पण ते काहीही असो… रोज रात्री त्या निर्मनुष्य रस्त्यावर एकटेच जाणे, त्या स्वर्गाहूनही अधिक प्रिय रात्रीच्या शांततेमध्ये हरवून जाणे….वाहह, लाजवाब…

ह्यामुळेच जॉब ला उशीर होतो, पण होउदे…

ह्या स्वर्गसुखामध्ये किती आनंद आहे, सुख आहे, हे त्या खडूस बॉस ला कुठे कळतं, त्याला हे सर्व सांगून काय फायदा, त्याला थोडी ना ह्या सगळ्यांची रुची असेल.,

त्याला हे सर्व सांगितले तरी, गाढवाला गुळाची चव काय? आणि कोल्ह्याला द्राक्ष आंबट, ह्या दोन्ही म्हणींमध्ये फरक तो काय…

कामाचा कमी पण माझ्या ह्या रात्रीचाच विचार करता करता दिवस कसा गेला कळलंच नाही.

ऑफिसची सुटी झाली, सगळे आपल्या आपल्या घरी जायला निघाले,

बघता बघता सर्व ऑफिस रिकामा झाला.

मी सुद्धा मेन रजिस्टर वर सही करून पेन वरच्या खिशाला टांगून बाहेर पडलो…

सूर्य मावळतीला गेलेला, नुकतीच अंधाराची छटा पूर्ण आसमंतात पसरत चाललेली.

दारूच्या नशेत धूत असणाऱ्या दारुड्याला सुद्धा त्या दारूची एवढी नशा नसेल, जितकी मला ह्या अंधारासंबंधी होती…

अवर्णनीय,,, अमर्याद.

एखादी गोष्ट आपल्याला प्रिय असते, तेव्हा जरुरी नाही, की त्याच्या विरुद्ध गोष्ट आपल्याला अप्रिय असेल…

दोन्ही गोष्टी एकाच वेळी आवडू शकतात. काही थोड्या प्रमाणात तर काही जास्त प्रमाणात,,,

पण हे सर्व बाकीच्यांबाबतीत…

माझ्या बाबतीत तरी नाही.

Horror Stories In Marathi – षंढ | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – हा सागरी किनारा | Storyteller Rushi

मला मुळातच दिवसाचा तिरस्कार.

तो डोळे दिपवणारा सूर्य, सगळीकडे नुसता उजेड, त्यात आजूबाजूचे लोक, गर्दी, गाड्या,,, नको, नको,

नुसत्या विचारानेच अंगावर शहारे आले, नकोच ते विचार.

पण आता तर मस्त रात्र होत चाललेली, मी वरती बघत बघत चालत होतो, नुकताच रात्रीच्या अंधाराचा पाश माझ्यावर पडत चाललेला…

ऋषी….., ऋषी…..

कोणाचीतरी हलकेच हाक…

अरे ऋषि.

मलाच मागून कोणतरी हाक मारत होतं…

मी मनाच्या वरूनच मागे वळून पाहिलं.

माझाच कलीग रोहन,

ऐन वेळी ह्या गुंगी मध्ये असताना समोर कोणतीही मोठ्यातली मोठी गोष्ट घडू दे, मन स्वतःहून त्याकडे दुर्लक्ष करतं…

पण आज ह्याच्या एका वाक्याने मन चल-बिचल झाले.

Horror Stories In Marathi – नदीच्या पलीकडे 1| Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – नदीच्या पलीकडे 2 | Storyteller Rushi

“काय रे, कुठे हरवलास? असा वर बघत तल्लीन होऊन चाललास. कधीपासून हाका मारतोय.

‘अरे…स..सॉरी… ते.. मी’…

“जाऊ दे चल, मी समजू शकतो, कामाचा लोड”,

‘नाही रे… कामाचा लोड वगैरे काही नाही.’

“कसं काही नाही?, अरे स्वतःकडे बघ, एखादा बालवाडी मधला मुलगा पण सांगेल, तुला कसलातरी भयंकर टेन्शन आहे ते, किती खंगला आहेस तू, डोळ्याभोवती काळी वर्तुळं, जसे की डोळे आतल्या खोबणीत जबरदस्ती घुसवलेत, आणि शरीराची अवस्था तर एखाद्या कुपोषित व्यक्तीपेक्षाही बिकट…

मगाशी म्हणालो, बालवाडी मधला मुलगा सुद्धा सांगेल, पण बालवाडीमधला मुलगा हे सांगायला तुझ्या जवळच येणार नाही, लांबूनच घाबरून पळून जाईल, माफ कर, पण तुझा कालीग, एक मित्र म्हणून तुझी अवस्था बघवत नाही रे…

तू माझं ऐक, थोडे दिवस ऑफिस मधून सुट्टी घे आणि गावाला किंवा कोना नातेवाईकाकडे राहून ये, तेवढयातल्या तेवढं बरं वाटेल”

त्याचं बोलणं मी किती ऐकलं हे जर कोणी मला त्या वेळी विचारलं असतं, तर मला ते सांगता आलं नसतं…

मी त्याच्या सगळ्या वाक्याना हो ला हो मिळवून परत जायला निघालो…

आज पहिल्यांदा रात्रीच्या गुंगीपेक्षा स्वतःच्या अवस्थेकडे(शारीरिक की मानसिक?) जास्त लक्ष होतं…

मी खरंच एवढा खंगलो होतो? मागच्या आठवड्यापासून नियमित जेवण पाणी पण होत नव्हते.

मन हळूहळू ताळ्यावर येत होतं, स्वतःच्या जीवाची पर्वा करत होतं…

पण मग इतके दिवस ते कोणाच्या आवेशाखाली होतं, की स्वतःच्या शरीराची अशी क्रूर विटंबना रोखण्यासाठी त्याला काहीच करता नाही आलं?

आरशासमोर उभं राहून स्वतःला न्याहाळत बसलो, त्या आराश्याला लागलेल्या धुळीच्या जाडसर लेपाला बघून अंदाजा येत होता, की आरसा गेले कित्येक दिवस आपण स्वच्छ केलाच नव्हता…

स्वच्छ केला नाही ह्याचा अर्थ आपण स्वतःला इतके दिवस (किंवा महिने) बघितलंच नव्हतं…

आरश्यामध्ये स्वतःला पाहता पाहता नजर बाजूला टांगलेल्या कॅलेंडरवर गेली.

आजची तारीख शुक्रवार, १३ फेब्रुवारी. अमावस्या…

आज अमावस्या, आज आकाशात चंद्र नसेल, चंद्रप्रकाश नसेल, म्हणजे सगळीकडे अंधार, फक्त आणि फक्त… अंधार…

मनाने आता आताच तर कुठे सदमार्गाची पकड घेतलेली, स्वतःला सावरायला, त्याच्या शरीराला वाचवायला,

पण ह्या एका अमावस्येने सगळ्यांवर पाणी फेरले…

सरड्याची धाव कुंपणा पर्यंत, तसंच मनाच्या सदमार्गाच्या विचारांची मर्यादा इथपर्यंतच होती?…

माझे पाय आपोआपच दरवाज्याकडे वळले, परत एकदा त्या सामसूम, निर्मनुष्य रस्त्याकडे, कालपर्यंत मन पूर्णपणे त्याच्या अधीन होते, मी कुठे चाललो, का चाललो, ह्यांचे कशाचेच भान नसायचे,

पण आज… आज मात्र मन संपूर्णपणे त्याच्या अधीन नव्हते, अगदी थोड्या प्रमाणात का होईना, मनाचा निमुळता, छोटासा कोपरा अजूनही जागृत होता, सत्कर्माचा, सदाचाराचा मार्ग पकडून होता…

पण ह्या उलट अवयवांचे होते, माझे सर्व अवयव त्याच्या अमलाखाली होते,

अंधार..

माझी पाऊले झपझप चालू लागली… अमावस्येमुळे आज सगळीकडे मिट्ट काळोख पसरलेला, अतिशय प्रिय असा, मनाला सुखावणारा,

माझे पाय चालता चालता लटपटू लागले…

एकीकडे ह्या मनाला हवाहवासा वाटणाऱ्या काळोखाच्या दिशेने, तर दुसरीकडे मनाच्या छोट्या कोपऱ्यातल्या त्या सकारात्मक आवाजाने, जो सारखा घराकडे परत जायला विनवणी करत होता.

बघता बघता मी त्या निर्मनुष्य रस्त्यावर येऊन पोहोचलो…

इकडे मघापेक्षा जरा जास्तच अंधार होता…

रातकिड्यांची किर्रर्र चालूच होती…

रस्ता पूर्णपणे ओसाड, ना कुठे कोणी मनुष्य, ना कोणते वाहन… एकदम सामसूम आणि भकास.

मनाची ती चांगली बाजू अजुनही कार्यरत होती, म्हणूनच एवढं सगळं वर्णन आज मला सांगता आलं…

त्या रस्त्यावरून तसाच सरळ चालत राहिलो, चंद्रप्रकाश नसल्यामुळे वातावरणात अजूनच रोमांच येत होता. वाऱ्याची झुळूक हलकेच मानेवरून जाऊन अंग शहारावीत होती.

Horror Stories In Marathi – शेवटची रात्र | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – हौंटेड हायवे | Storyteller Rushi

माझ्या चपलांचा आवाज, रातकिड्यांच्या आवाजामध्ये मिसळत होता.

इकडे मी किती वेळ चालत होतो, मला माहित नाही, फक्त चालत होतो, आणि तेच मन सुखावणारे होते, मन प्रसन्न करणारे होते.

मनाची ही तंद्री भंग पावली, जेव्हा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला, म्हणजे शेवटच्या टोकाला एक प्रकाशाचा वर्तुळाकार भाग दृष्टिस पडला…

प्रकाश… उजेड… सावधान, धोका, खतरा…

मन स्वतःला बजावू लागलं…

मागे फिर, परत जा, पुढे एक पाऊल ही ठेऊ नकोस…

सर्व अवयवांची घालमेल होऊ लागली.

इतका वेळ शांतपने सर्व सहन करणारा, मनाच्या नकारात्मक बाजूच्या अधिपत्याखाली असलेला मनाचा तो सकारात्मक कोपरा आता जागृत झालेला…

मनाची विशाल नकारात्मक बाजू अजूनही उजेडापासून लांब जायला सांगत होती, ह्याच्या उलट सकारात्मक बाजूचं होतं… उजेडात जायला भाग पाडणारे…

तो प्रकाशाचा गोल माझ्यापासून काही थोड्याच अंतरावर होता…

सर्व अवयव एकवटल्या सारखे झालेले, पायांचे लटपटने चालूच होते…

धाप लागल्या सारखे पाय कधी पुढे तर कधी मागे पडू लागले…

डोकं अक्षरशः बधिर होत चाललेले…

डोक्यावर हात ठेवून डोकं जोरात दाबून मी पुढे चाललेलो…

कोणत्याही क्षणी तोंडातून किंचाळी बाहेर येईल अशा अवस्थेत मन गेलेलं…

आता मी जवळ जवळ प्रकाशाच्या भागात पाय टाकणारच होतो…

मनाच्या सकारात्मक बाजूचा विजय माझ्या डोळ्यांसमोर दिसत होता,

ते म्हणतात ना जगातील वाईट प्रवृत्ती, वाईट माणसे कितीही शक्तिशाली असुदे, सकारात्मक उर्जेपुढे त्यांचा १ सेकंद सुद्धा टिकाव लागणे मुश्किल असतं…

हेच आता माझ्या बाबतीत होताना दिसत होतं…

मी प्रकाशाच्या आत गेलो, माझे डोळे सहन करण्या पलीकडे गेले, कमी प्रमाणात असून देखील इतका वेळ वाईटाशी झगडणाऱ्या त्या सकारात्मक बाजूचे कौतुक करावं तितकं कमी…

पण नकारात्मक शक्तीने त्याचे वर्चस्व कायम ठेवले होते,

डोकं फुटून तुकडे व्हायची वेळ आलेली, कितीतरी वेळ डोकं हाताने घट्ट धरून तसंच चालत होतो,

ह्या दोन शक्तींच्या झगड्यामुळे मनाचे हाल बेहाल झालेले…

इकडून सुखरूप जरी वाचलो असतो, तरी ठार वेड तरी लागलं असतं…

मनाच्या नकारात्मक बाजूची पकड सैल होत चाललेली, तेव्हाच तिने तीचा शेवटचा प्रहार केला,

अवयव अजूनही तिच्या अधिपत्याखाली होते…

तो सहन न होणारा उजेड, मनाची होणारी घातक विटंबना…

तेवढ्यात माझा हात आपसूकच माझ्या खिशाला टांगलेल्या पेनाकडे गेला…

आता वेळ आलेली ही विटंबना थांबवण्याची, ह्या त्रासापासून मुक्त होण्याची…

नेहमी चांगल्या गोष्टीचा विजय होतो अशी इतिहासात सुद्धा कुठे नोंद नाही, मग मी तरी कुठे ह्याला अपवाद असणार…

मनाच्या चाललेल्या घालमेली मुळे माझ्या वेदनांचा असर नसल्या सारखाच होता…

मोठया किंचाळ्या मारून मी बेशुद्ध झालो…

सकाळी उठलो, पण उठल्या सारखं वाटत नव्हतं, डोळ्यासमोर अजून अंधारी होती…

मी उठून बसलो, आजू बाजूला थोडा फार माणसांचा किलबिलाट होता…

तेवढ्यातल्या तेवढ्यात हायसं वाटलं… मी जिवंत आहे…

आणि कोणत्यातरी बेड वर बसलो आहे…

तेवढयात माझ्या आजूबाजूला हालचाल जाणवली,

थोडं वेळ गेल्यानंतर समजले मी दवाखान्यात होतो…

तोंडावर हलकेच स्मित हास्य आलं… डोळे आपोआप मिटले… एक मोठा आरामदायी सुस्कारा सोडला…

आणि गालातल्या गालात हसायला लागलो…

कारण मगाशी नर्स येऊन गेल्यावर तिच्या तोंडून एक वाक्य ऐकलेलं,

डॉक्टरांना खूप कष्ट लागले माझ्या डोळ्यातून ते पेन काढायला…

आता माझ्या जीवनामध्ये आला आहे तो म्हणजे कायमचा अंधार…..

Horror Stories In Marathi – झपाटलेलं रेल्वे स्टेशन | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – फोटो स्टुडिओ | Storyteller Rushi

तुम्हाला ही Marathi Gudh Katha no. 5 – अंधार

कशी वाटली हे comments करून आम्हाला सांगा. आशा आहे की तुम्हाला Horror Stories In Marathi- अंधार ही गुढकथा आवडली असेल.

जर तुम्हाला हि गुढकथा – अंधार आवडली असेल तर तुम्ही तुमच्या friends सोबत social networks जसे की Facebook, google, twitter इत्यादी वर share करा.

तसेच Like करा आणि ह्या आणि अश्या बऱ्याच कथा Audible स्वरूपात ऐकायच्या असतील तर आपल्या Storyteller Rushi च्या YouTube Channel ला भेट द्या.

तुम्हाला सुद्धा तुमच्या Horror Stories किंवा तुमचे horror experience आमच्या पर्यंत पोहचवायचे असतील तर Email : Storytellerrushi@gmail.com यावर mail करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply