Horror Stories In Marathi – आजची हि Marathi Bhaykatha no. 4 – भानगड हि भानगड या राजस्थान मधल्या  पुरातत्त्व किल्ला आणि त्याच्या संबंधित रहस्याशी निगडित आहे.

Marathi Bhaykatha no. 4 – भानगड (Horror Stories In Marathi)

“सुप्रसिद्ध अलौकीक शक्तींचे संशोधक गौरव तिवारी यांचे त्यांच्याच राहत्या घरी रहस्यमयरित्या निधन”

सकाळी उठल्या उठल्या ही बातमी कानावर आली…

हे तेच संशोधक आहेत जे ठीक ठिकाणी जिकडे काही अमानवी शक्तींचे वास्तव्य आहे, अश्या ठिकाणी जाऊन तिकडचे रहस्य उलगडतात…

पण अश्याच व्यक्तीचा अश्या रहस्यमय रित्या निधन…

हे मनाला न पटणारे होते…

थोडं इंटरनेट वर शोधाशोध केल्या नंतर समजलं, की त्यांच्या जीवनातला शेवटचा प्रवास हा भानगड मधला होता…

मी सुद्धा अश्या हॉंटेड गोष्टींची आवड असलेला…

आणि मला सुदधा नेहमीच अश्या अमानवीय शक्तींबद्दल कुतूहल असायचं,

असं काय होतं ह्या भानगड मध्ये,

भानगड बद्दल थोडक्यात सांगायचं तर

राजस्थान मधल्या अल्वेर जिल्ह्यामध्ये स्थित असा हा पुरातत्व किल्ला…

ह्या किल्ल्या बद्दल खूप आख्यायिका आहेत

त्यांपैकी एक अशी की,

खूप वर्षांपूर्वी राणी रत्नावती त्या किल्ल्यामध्ये राहायची…

तिची सुंदरता तर पुर्ण राजस्थान मध्ये चर्चित होती…

त्याच राज्यामध्ये सिंधू सेवडा नावाचा मांत्रिक सुद्धा राहायचा आणि तो काळ्या जादू मध्ये खूप पारंगत होता…

राणीला बघितल्या बघितल्या तो तिच्या प्रेमात पडला…

पण त्याला माहित होतं की राणीच्या पुढे त्याचं काही चालणार नाही…

मग त्याने राणी ला वश मध्ये करायचं ठरवलं…

एके दिवशी राणीची दासी राणी साठी तेल आणायला बाजारात गेली… ही संधी साधून त्या मांत्रिक ने त्या तेलामध्ये वशीकरण मंत्र करून तो तेल राणी जवळ पोहोचवला…

पण वेळीच राणी ने हे ओळखलं आणि तिने ते तेल एका मोठ्या दगडावर ओतून टाकलं…

त्याच्या मंत्राचा प्रभाव इतका जास्त होता, की त्याच्या मंत्रांच्या प्रभावाने ते दगड मांत्रिकच्याच दिशेने झेपाऊ लागले…

मांत्रिकाला त्याचे मरण निश्चित वाटले तेव्हा मरायच्या आधी त्याने पूर्ण भानगढ वासीयांना श्राप दिले,

“की भानगढ पूर्णपणे नष्ट होऊन जाईल, तिकडे जो कोणी येइल त्याचा मृत्यू होइल…

आणि इकडून पिढ्यानपिढ्या भानगढ पूर्णपणे ओसाड बनून राहील त्यांची आत्मा ह्या किल्ल्यावर भटकत राहील.”

हा श्राप देऊन मंत्रिकाचा दगडाखाली येऊन मृत्यु झाला…

त्यांनंतर काही दिवसांनी भानगढ आणि अजबगढ यांचे मोठे युद्ध झाले, आणि ह्या युद्धामध्ये भानगढ चा पराभव झाला आणि सर्व भानगढ वासी मारले गेले…

राणी रत्नावती सुद्धा स्वतःला वाचवू शकली नाही..

आणि त्या दिवसापासून भानगढ मध्ये आवाज ऐकू येतात ते फक्त आत्म्यांचे…

मी पण ठरवलं, आजपर्यंत ह्या किल्ल्याच्या फक्त गोष्टी ऐकत आलोय पण आता स्वतःच जाऊन बघूया…

जाताना कोणाला तरी सोबत घेऊ वाटलं…पण एकटं जाऊन सुखरूप एकटं बाहेर येणे ह्यात मज्जा आहे, आयुष्यामध्ये काहीतरी साहसी करायच्या इच्छेमूळे …

मग ठरवलं, ह्या किल्ल्याच्या गोष्टी ह्या कितपत खऱ्या आहेत हे उलगडूनच बघायचंच…

दिवस ठरला,

सोबत गराजेपुरत्या वस्तू, डिजिटल कॅमेरा, खायचे सामान आदी. घेऊन राजस्थान ला जायला निघालो…

सकाळची ट्रेन पकडली… तब्बल २४ तासांच्या प्रवासानंतर राजस्थान मध्ये पोहोचलोच…

राजस्थान म्हणजे अगदी नावा प्रमाणेच – राजांचं स्थान…

तिकडचे किल्ले, राजवाडे, त्यांचं राहणीमान, संस्कृती एकदम मन मोहून टाकणारी होती…

ते सर्व पाहून मी तरी काही दिवस इकडेच थांबायचे ठरवले…

Horror Stories In Marathi – दिघाटी रोड | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – भानगड | Storyteller Rushi

भानगड च्या जवळपास गावा मध्येच एका हॉटेलमध्ये राहणे पसंत केलं…

दुपारी थोडं आराम करून प्रवासाचा क्षीण घालवायचा निष्पळ प्रयत्न केला…

एवढ्या प्रवासाची मुळातच कधी सवय नव्हती…

पण असो, इथपर्यंत पोहोचलो यातच समाधान होतं…

शेवटी तो क्षण आलाच…

सर्व तयारी करून भानगढ ला जायला निघालो, सोबत कॅमेरा, थोडं खायचं सामान, पाण्याची बाटली घेऊन भानगढ ला पोहोचलो…

टुरिस्टची गर्दी जास्त होती… असणारच म्हणा, त्यांना सुद्धा तीच उत्सुकता आहे, जी मला खुप वर्षांपासून होती…

प्रवेशद्वारातुन आतमधे गेलो, बाजूलाच तिकीट खिडकी होती, तिकडून आतमधे अर्ध्या किलोमीटर वर तो किल्ला होता…

त्याच्या आधी जुन्या काळातली बाजारपेठ लागते, पुर्ण पणे मोडकळीस आलेली अशी ती बाजारपेठ होती…

तिकडून आतमधे गेल्यावर किल्ल्याचा प्रमूख द्वार…

उजव्या बाजूला एक मंदिर आणि तिकडून पुढे गेल्यावर भानगड…

मंदिरात डोकं टेकवून किल्ल्यावर जायला निघालो…

लोकांची गर्दीच खूप होती..

किल्ला तसा पडकाच होता, फक्त त्याचे अवशेष शिल्लक राहिलेले…

किल्ल्यावरून वरती गेलो काही ठिकाणी छोट्या खोल्या होत्या तर काही ठिकाणी पायऱ्या

मजल दरमजल करत किल्ल्याच्या सर्वात वरच्या टोकाला गेलो

आजूबाजूला नजर फिरवली आणि मनात विचार आला की एवढया अवाढ्य जागेत हा किल्ला आहे… ईकडे काही अमानवीय गोष्ट असण्याचं प्रश्नच येत नाही…तिकडच्या लोकांची गर्दी आणि तो किल्ला प्रत्यक्षात बघून माझी थोडी निराशा झाली…

काही तरी हौन्टेड बघायच्या ईच्छेने आलेलो पण इकडे तसं काही असेल ह्याची काहिच लक्षणं दिसत नव्हती…

पण मी वाट बघत होतो संध्याकाळची…

किल्ल्याची बऱ्या पैकीं छायाचित्रे कॅमेरा मध्ये बंदिस्त केली आणि तिकडेच थोडं आराम केला…

संध्याकाळ नंतर तिकडे प्रवेश निषिद्ध आहे हे ज्ञात होतं म्हणून किल्ल्याच्या बाजूच्या दिशेने आत जाण्याचा बेत आखला…

जशी संध्याकाळ झाली तसे सर्व लोक आपापल्या घरी जाऊ लागले…

मी सुद्धा परतीला लागलो…

बाहेर येऊन रात्र होण्याची वाट बघीतली…

किल्ल्याचे पहारेकरी तर मला मुख्य प्रवेशद्वारातून आतमधे जाऊन नव्हते देणार, ह्यासाठी मी बाजूने जाण्याचा रस्ता शोधून काढलेला…

रात्र झाली

तसा मी किल्ल्याच्या बाजूच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करायला लागलो…

बाजूचा कंपाऊंड जरा उंचीवर होता…पण माझ्या सारख्या ट्रेकर्स साठी इतकं पण कठीण नव्हतं…

माझा अनुभव वापरून मी आतमधे शिरलोच…

मगाशी दिवसा जसा किल्ला होता, तेच आता तो किल्ला पूर्णपणे विरुद्ध होता…

काही क्षणांसाठी माझा माझ्या स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेनासा झाला…

आता तो किल्ला पूर्णपणे सामसूम, अंधारात गुडूप झालेला भासत होता…

Horror Stories In Marathi – नदीच्या पलीकडे 1| Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – नदीच्या पलीकडे 2 | Storyteller Rushi

वर्षानुवर्षे बंद असलेल्या, काळाच्या पोटात समावून गेलेल्या एखाद्या जुन्या वाड्या सारखा तो किल्ला भासत होता…

मी पण हे दृश्य पाहून पुरता गांगरून गेलो…

पण जे काम करण्यासाठी इकडे आलेलो, ते काम करूनच जायचं असं मनाशी पक्क केलेलं…

मी किल्ल्याच्या दिशेने जायला निघालो…

बाजूच्या दिशेने आलेलो म्हणुन सुरुवातीची बाजारपेठ मागेच निघून गेलेली

सगळीकडे अंधार होता….

फक्त किल्ल्याच्या जवळ लाइट होती त्या प्रकाशा मध्ये फक्त किल्लाच दिसून येत होता…

बाकी रस्त्यावर पूर्ण अंधार होता म्हणून मोबाइल ची लाइट लावून रस्ता शोधत जाऊ लागलो…

सगळीकडे स्मशान शांतता, माझ्या बुटांचा आणि लांबून कुठुन तरी कुत्र्यांच्या विव्हळण्याचा जीवघेण्या आवाजा व्यतिरिक्त अजून कसलाच आवाज नव्हता…

तसाच चालत राहिलो… आता माझ्या चालण्याच्या आवाजा व्यतिरिक्त अजून कोणाच्या तरी चालण्याचा आवाज माझ्या मागून येऊ लागला…

मी जागीच थांबलो… तसा तो आवाज पण थांबला…

परत ४ पाऊलं चालत गेलो तसा परत आवाज येऊ लागला…

आता मात्र खात्री पटली की कोणीतरी माझा पाठलाग करत आहे…

क्षणाचाही विलंब न करता पटकन मागे वळून पाहिलं…

पण दूर दूर वरती साधं चिटपाखरूही नव्हतं…

मनाचा भास समजून परत चालायला लागलो…

किल्ल्याच्या पायथ्याशी आलो…

लाईट च्या मंद प्रकाशा मध्ये तो किल्ला पूर्णपणे भकास दिसत होता…

तिकडेच थोडी छायाचित्रे घेतली,

एकदा त्या किल्ल्याला पूर्ण वर पासून खालपर्यंत निरखून पाहिले आणि किल्ल्यामध्ये प्रवेश केला…

जसा किल्ल्या मध्ये प्रवेश केला, तशी हवेची गारेगार झुळूक पूर्ण अंगाला शहारून गेली…

बोचरी थंडी पडलेली…

आणि किल्ल्याच्या आतमधे आल्या पासून तिची झळ जरा जास्तच जाणवत होती

तळ मजल्यावरून वरती गेलो पण अजून पर्यंत कोणाचाच सुगावा नव्हता…

शेवटी कंटाळून तिकडून वरती किल्ल्याच्या टोकाला गेलो तिकडे बसून कॅमेरा मधले फोटोस बघायला लागलो…

संध्याकाळचे फोटॊस अगदी सुंदर टिपलेले…

फोटॊस बघता नजर एका फोटो वर गेली,

ती म्हणजे आता मगाशी किल्ल्यामध्ये प्रवेश करायच्या आधी काढलेला फोटो…

फोटो मध्ये वरच्या बाजूला उजव्या बाजूच्या बुरूजावर एक सावली दिसत होती…

तिकडे थोडं झूम केलं तरी त्या सावलीचं नीट चेहरा दिसत नव्हता…

जेव्हा मी फोटो काढत होतो, तेंव्हा तर असं काहीच दिसलं नव्हतं…

मग ह्या फोटोमध्ये असं का दिसलं…

फोटो अजून निरखून पहिला, पण बाकी ठिकाणी त्या फोटो मध्ये काहीच दिसलं नाही…

आणि मनामध्ये विचित्र भीती जाणवू लागली…

पटकन उठलो आणि ती सावली जिकडे होती तिकडे जाऊ लागलो…

पायऱ्या उतरून खाली आलो आणि त्या सावली दिसलेल्या दालनात गेलो…

पण तिकडे कोणीच नव्हतं…

त्या दालनातून किल्ल्याच्या बाहेर बघितलं… आजूबाजूला सगळीकडे फक्त अंधाराचं साम्राज्य होतं…

Horror Stories In Marathi – शेवटची रात्र | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – हौंटेड हायवे | Storyteller Rushi

तितक्यात पाठी मागून कोणतरी धावत गेल्याचा आवाज आला…

पाठी मागे वळून बघितलं तसं ती सावली पटकन डोळ्यासमोरून गेली…

त्या सावलीच्या मागावर गेलो…

ती सावली पायऱ्या चढून परत वरच्या टोकाला गेली…

तिकडे छोटीशी खोली होती…

खोलीच्या उंबरठ्याशी उभा राहून आतमधे बघतच होतो, की तितक्यात पाठून कोणतरी जोरात धक्का मारून आतमधे लोटलं…

त्या धक्क्याचा प्रहार इतका जास्त होता की धडपडून आतमधल्या भिंतीवर जाऊन आपटलो…

स्वतःला सांभाळून तसंच मागे बाघितलं आणि समोरचं दृश्य पाहुन थोड्या वेळा साठी मूकबधिर च झालो…

मगाशी जी सावली बघितली ती आता सावली नसून तिचे शरीर झालेले…

अंदाजे ९ फूट उंच

अंगाने धिप्पाड असे ते शरीर होते

त्या शरीराचे डोळे, तोंड, नाक काहीच नव्हते…

पूर्ण चेहरा सपाट…

हाताची नखे इंचच इंच वाढलेली

ते बघताच तोंडातली किंचाळी तोंडातच दाबून धरली, ते शरीर एखाद्या भूकेलेल्या सिंहासारखे माझ्यावर झेपावत होते…

माझे शरीर त्या कडाक्याच्या थंडीत सुद्धा पूर्ण घामाने भिजून गेलेले…

ओरडू तर कोणाला ओरडू, कोणाला हाक मारू…

कोणीच माझ्या मदतीला येणार नव्हते…

माझे रक्षण मला स्वतःलाच करायचे होते…

सर्वांगाने ताकत लावून उठलो आणि तिकडून जीव तोडून पळण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागलो…

पण काहीच फायदा नव्हता… ते शरीररुपी राक्षस दरवाज्यावरच उभे होते… तिकडून पळत असताना त्याने  मला घट्ट पकडले आणि परत दालनाच्या आत जोरात ढकलून दिले….

आता तर सर्वच पर्याय संपलेले…

मनातल्या मनात देवाचं नाव घेण्या पलीकडे माझ्याकडे काहीच उरलं नव्हतं… माझे सर्व अवसान गळून पडलेले…

ते राक्षस माझ्या वर झपावू लागले,

ते जस जसे एक एक पाऊल टाकत माझ्या जवळ येत होते, तस तसे मी पण सरकत सरकत मागे जात होतो…

एकाएकी ते राक्षस माझ्या एकदम जवळ आले आणि त्याच्या सपाट चेहर्या मधून एक किळसवाणा तोंड बाहेर काढून जोरात किंचाळी मारली…

त्या किंचाळी चा प्रभाव इतका जास्त होता…

२ मिनीटांसाठी माझे कान पूर्ण बधिर झाले…

मी सरकत सरकत इतका मागे गेलेलो की त्या दालनाच्या कडेला येऊन पोहोचलेलो…

जशी त्या राक्षसाने किंचाळी मारली तसं त्या प्रहराने त्या सर्वात वरच्या दालनातून थेट किल्ल्याच्या खाली येऊन पडलो, आणि बेशुद्ध झालो…

थोड्या वेळाने जाग आली…डोकं पूर्ण भिनभिनत होतं…

त्या किंचाळी चा आवाज कानात अजून खोलवर घुमत होता, काय झालेलं काहीच समजायला मार्ग नव्हता…

लगेच स्वतःला सावरलं…

आजू बाजूला अंधार होता, मी किल्ल्याच्या खाली होतो…

तिकडून बाहेर जायचा रस्ता जवळच होता…

उठलो आणि बाजूला बघितलं माझ्या बाजूला कोणतरी झोपलेलं

पण अंधारात नीट दिसलं नाही…

अजून क्षणाचाही विलंब न करता तिकडून सरळ बाहेरच्या रस्त्याला धाव ठोकली…

गेट वर पहारेकरी साखरझोपेत मग्न होते…

तिकडून जरासा पण आवाज न करता बाहेर आलो…

पण इतक्या रात्रीचं काही बस वगैरे नव्हती भेटणार…

परत किल्ल्यात जायचा विचार सुदधा आला नाही… तो खरा खुरा अनुभव स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवलेला

आता कित्येक महिने तरी हा अनुभव डोक्यातुन जाणारा नव्हता…

गेट वर पहारेकरी झोपलेले त्यांच्याच सोबत झोपायचं ठरवलं…

आणि सकाळ झाल्यावर पहिल्या बस ने इकडून निघायचं अस ठरवलं आणि झोपी गेलो…

सकाळ झाली…

सायरन च्या आणि आजूबाजूच्या गोंगाटाने जाग आली…

खूप लोक जमलेली आणि पोलीस सुद्धा आलेले…

काय भानगड झाली म्हणून बघायला गेलो…

पोलीस आणि काही माणसं होती ते एका शरीराला नेत होते… जवळ जाऊन बघितलं तर डोळे उघडे ते उघडेच राहिले…

ते माझंच शरीर होतं…

Horror Stories In Marathi – झपाटलेलं रेल्वे स्टेशन | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – फोटो स्टुडिओ | Storyteller Rushi

तुम्हाला ही Marathi Bhaykatha no. 4 – भानगड

कशी वाटली हे comments करून आम्हाला सांगा. आशा आहे की तुम्हाला Horror Stories In Marathi – भानगड ही भयकथा आवडली असेल.

जर तुम्हाला हि भयकथा – भानगड आवडली असेल तर तुम्ही तुमच्या friends सोबत social networks जसे की Facebook, google, twitter इत्यादी वर share करा.

तसेच Like करा आणि ह्या आणि अश्या बऱ्याच कथा Audible स्वरूपात ऐकायच्या असतील तर आपल्या Storyteller Rushi च्या YouTube Channel ला भेट द्या.तुम्हाला सुद्धा तुमच्या Horror Stories किंवा तुमचे horror experience आमच्या पर्यंत पोहचवायचे असतील तर Email : Storytellerrushi@gmail.com यावर mail करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply