Horror Stories In Marathi – आजची हि Marathi Bhaykatha no. 3 – दिघाटी रोड हि दिघाटी रोड येथे घडलेली प्रवासात्मक भयकथा आहे.

Marathi Bhaykatha no. 3 – दिघाटी रोड (Horror Stories In Marathi)

दिघाटी रोड…➡️
हॉटेल उज्जेन- ४ किमी➡️
“अरे वाह, चल इकडूनच जाऊ, खूप भूक पण लागलीय, 

जरा हॉटेलपाशी थांबव गाडी,पेटपूजा करून जाऊ”
‘ठीक आहे’
अमन आणि रजत, नाशिक वरून एका मित्राचे लग्न उरकून आपल्या घरी मुंबईला चाललेले,
लग्नावरून निघताना जरा उशीरच झाला, एव्हाना रात्रीचे ११.३० वाजून गेलेले,
भूक पण लागलेली, म्हणून एखादा हॉटेल भेटतोय का? तेच बघत जात होते, की हा हॉटेल भेटला,

गाडी हॉटेलच्या गेटपाशी थांबली,
म्हणावी तशी गर्दी नव्हती, गाडी लॉक करून ते आतमधे गेले,
हॉटेल मध्ये मॅनेजर दिसत नव्हता, ते सीट वर बसायला गेले, आणि सीट वर बसताच क्षणी वेटर त्यांच्या समोर हजर झाला…

“बोला, काय ऑर्डर आहे?”

‘मेनू सांगा जरा’ रजतने त्याला विचारले

“इकडे चिकन खूप स्पेशल भेटतं” वेटर ने त्यांना सांगितले

दोघांनी थोडं विचार करून चिकन आणि राईसची ऑर्डर दिली…
ऑर्डर येईपर्यंत ते आपापसात गप्पा मारतच होते, की तितक्यात,

हॉटेलच्याच किचन मधून कोंबडीचा जोरात ओरडण्याचा आवाज आला,
आणि बघता बघता लगेच वेटर त्यांच्या डिश घेऊन आला सुद्धा…
दोघेही एकमेकांकडे आश्चर्यचकीत होऊन बघत बसले,
आताच २ मिनिटांपूर्वी ऑर्डर दिलेली, आणि हा लगेच कसा आला?…

पण ते आश्चर्यचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर फार काळ टिकले नाहीत,

कारण समोरची डिश बघताच क्षणी दोघांच्या पण तळपायाची आग मस्तकात गेली,
वेटरने टेबलावर जे डिश ठेवले, त्यात चिकन तर होते, पण न शिजवलेले, एकदम कोंबडी जशीच्या तशी कापून आणून त्यात ठेवलेली, आजूबाजूला पूर्ण रक्त सांडलेले…

दोघे एका झटक्यात उठले आणि त्या डिशेस् ना हाताने उडवत त्या वेटरवर ओरडले,
“अरे मूर्खा हे काय आहे?, इकडे काय आमची मस्करी लावलीय?, मी चिकन मागवलेलं, आणि ते ही पूर्णपणे शिजवलेलं, तू हे काय आणलय”

त्यावर वेटर शांतपणे म्हणाला, “अशी अन्नाची नासाडी करायची नसते साहेब”

रजत एवढा वेळ स्वतःवर कंट्रोल ठेवून होता, वेटरच्या अश्या बोलण्याने तर तो त्याच्यावर धावुनच गेला,
अमनने कसेबसे त्याला अडवले आणि वेटर ला २-४ शिव्या घालत दोघे हॉटेलच्या बाहेर आले…

दोघांचेपण राग अनावर झालेले, पण तरी कसंबसं स्वतःला आवारात दोघे बाहेर आले…

बाहेर येऊन आपल्या गाडीकडे जातंच होते, की हॉटेल च्या बाजूलाच एक चहाची टपरी होती,

“जाऊदे शांत हो, ती बघ चहाची टपरी आहे, जेवण नाही तर कमीत कमी चहा तर पिऊ” – अमनने रजतला शांत करत सांगितले…

दोघांनी टपरीवर जाऊन २ कटींगची ऑर्डर दिली,

चहा बनवता बनवता टपरी वरचा माणूस त्यांच्याशी बोलायला लागला…

‘साहब, आपने वो खाना फेंकके अच्छा नही किया’

त्याच्या बोलण्यावर दोघेही त्याच्याकडे वळले,
रजत परत एकदा रागाच्या स्वरात त्याला म्हणाला,

“वो क्या खाना था? त्याला आम्ही शिजवलेलं चिकन आणायला सांगितलं, पण त्याने तर तसंच कच्च आणून दिल, म फेकू नाहीतर काय करू”

‘अरे साहब, यहा पे ऐसा ही मिलता हैं, लगता है आप नये हो, पहले कभी देखा नही आप लोगोंको’

रजतचा राग अजून ओसरला नव्हता, म्हणून अमनच त्याच्याशी बोलायला लागला,

“हा वैसे नये हे, नाशिक से मुंबई जा रहे हैं, 

बिच मे बोहोत जोरों की भूक लगी, तो सोचा कुछ खा पी कर फिर निकलते हैं, और फिर ये हॉटेल दिखा हमे”

ह्यावर तो माणूस त्यांना चहा देत शांतपणे म्हणाला,

‘हम्म, साहब, यहासे आगे जरा संभलके जाईएगा, ये दिघाटी रोड ईलाका हैं, इधर का सबसे भूतीया इलाका, यहा जो कोई भी आता हैं, वो घर वापीस नाही जा पाता,
यहा तक के कोई परिंदा भी पर मारनेसे कतराता हैं’

रजतचं तर रागाने आधीच रागाने डोकं फुटत चाललेलं, आणि आता ह्या चहावाल्याच्या वक्तव्या वरून तर तो अजूनच रागावला,

“आप को क्या तकलीफ हैं भाईसहाब, यहा तो कोई परिंदा भी पर नहीं मारता ना, 

तो आप क्या कर रहे हो यहा, और ये सडा हुआ हॉटेल ये भी तो हैं यहा, पहले तो वो वेटर हमे जिंदा मुर्गी खिलाता हैं, और अब तुम यहा हमे भूतीया जगह बताके पागल बना रहे हो”…

अमनने पुन्हा एकदा त्याला शांत केला, दोघेही आपापले चहा संपवून परत जायला निघाले…

“संभल के जाईएगा”
पाठून त्याचा आवाज येत राहिला…

Horror Stories In Marathi – षंढ | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – हा सागरी किनारा | Storyteller Rushi

रजतने गाडी स्टार्ट केली, दोघे पुन्हा आपल्या परतीच्या प्रवासाला लागले,

गाडी कॉन्स्टंट ७०-८० चा वेग पकडत होती…
रात्रिचे १२ वाजलेले, रस्त्यावर सगळीकडे काळोखाशिवाय काहीच नव्हते,

त्यांच्या गाडी खेरीज रस्त्यावर दुसरी कोणतीच गाडी नव्हती,
हा रस्ता जरा जास्तच निर्जन होता, रस्त्याच्या कडेला जंगल आणि त्यातून येणारे जंगली प्राण्यांचे आवाज.

रजतने गाण्याचा आवाज वाढवला,

थोडे पुढे जाताच, बाजूच्या सीट वर बसलेल्या अमनला समोर रस्त्यावरून कोणीतरी येताना दिसले,
त्याने डोळे बारीक करून जरा निरखून बघितले…

जशी गाडी पुढे गेली, तसं समजलं, कोणीतरी एक बाई होती, पांढऱ्या रंगाची साडी आणि त्यात डोक्यावर पदर घेऊन भर भर पाऊले टाकत त्यांच्या गाडीच्या विरुद्ध दिशेने जात होती…

थोडं मन विचलीत करणारं होतं, अमन च्या मनात थोडी शंका येऊन गेली, ही बाई इतक्या रात्री, एवढ्या सामसूम रस्त्यावर?
पण लागलीच तो परत विसरून गेला,

पण थोड्या वेळाने पुन्हा तेच,
गाडीच्या प्रकाशामध्ये परत एकदा कोणीतरी समोरून येताना दिसले,
ह्यावेळी मात्र अमन जरा सावरून बसला आणि त्याने रजतला गाडी स्लो करायला सांगितली,

गाडी जशी स्लो झाली, तसं अमनने पुन्हा एकदा तिच्याकडे पाहिलं परत एक बाई, पांढरी साडी, डोक्यावर पदर, ही मगासचीच बाई होती…

आता मात्र अमनच्या भुवया उंचावल्या, मनात एक अनामिक भीती निर्माण झाली,

तितक्यात त्याला रजतचा आवाज आला,
“काय रे, गाडी का स्लो करायला सांगितली, आणि 

असं एकएकी तुझ्या चेहऱ्यावर बारा का वाजलेत?”

अमनने त्याला घाबरतच सांगितले, ‘अरे भाई, तू नाय का बघितलीस तिला, ती बाई मगाशी पण दिसलेली, आता सुद्धा तीच सेम बाई परत, मला काहीतरी गडबड वाटतंय’

त्यावर रजत उलट हसतच म्हणाला,
“भाई इकडे ना कोणी बाई आहे ना कोणी माणूस, तुला कुठून दिसली ती, 

काय त्या भय्याने तुझ्या चहा मध्ये दारु टाकलेली काय, मी मगासपासून गाडी चालवतोय माझं लक्ष तुझ्यापेक्षा जास्त आहे रस्त्यावर, 

मला तर कोणीच दिसले नाही”

त्या दोघांचं बोलणं चालूच होतं, की तितक्यात अमन ला परत एकदा समोरून तीच बाई येताना दिसली,
अमन जोरात ओरडला,
“ही बघ हीच ती बाई, मगासपासून आता तिसऱ्यांदा दिसतेय, 

मला नक्की काहीतरी गडबड वाटतंय रजत”

Horror Stories In Marathi – भानगड | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – अंधार | Storyteller Rushi

अमनचं तितकं बोलणं बाकी होतं, की ती बाई एकाएकी रस्त्याच्या मध्ये आली, रजत ला समोर कोणीच दिसत नव्हतं, त्याने गाडीचा वेग तसाच ठेवला,

अमनने त्याला खूप विनवणी केली, ती रस्त्याच्या मध्ये आहे, गाडी बाजूने घे, ती बघ समोर आहे रस्त्याच्या….
पण रजत तसंच गाडी चालवत राहिला, आणि एकाएकी गाडी त्या बाई च्या इतक्या जवळ आली, की कोणत्याही क्षणी गाडी तिला चिरडून जाईल,

अमनने घाई मध्ये रजत चा स्टीअरिंग वरचा हात बाजूला करून गाडीचे स्टीअरिंग वळवले, पण गाडीचं स्पीड जास्त असल्यामुळे गाडी कंट्रोलमध्ये न राहता रस्त्याच्या कडेला जाऊन मोठा आवाज करत एका झाडाला जोरात आपटली,

दोघे बेशुद्ध झाले…

अमनने डोळे उघडले, तेव्हा आजूबाजूला अंधार होता,
आणि भयानक अशी शांतता होती,
तो डोक्याला हात लावत उठला, पायाच्या भागाला ओलं ओलं काहीतरी भासत होतं, कदाचित पायाला मार बसून रक्त येत असावा असा त्याने अंदाज बांधला,

त्याने उठल्या उठल्या आजुबाजुला रजत कुठे आहे बघितले,
पण त्याचा काहीच पत्ता नव्हता,
डाव्या बाजूला एक शेकोटी पेटत होती, आणि त्या शेकोटीसमोर कोणतरी बसलेलं, पाठमोरी आकृती, एक बाई, आणि तिनेही मागून पदर घेतलेला…

अमन अडखळत उठला…
त्याच्या डोळ्यांना आता अंधाराची सवय झाली, त्याने आजू बाजूला बघितलं,
एक बंद खोली होती, त्या खोलीला ना खिडकी होती ना कोणते दार…
मग तो तिकडे आला कसा?…

“क-क-कोण आहेस तू” – अमनने घाबरत घाबरत विचारले…

त्या बाईने हळू हळू फिरत अमनकडे तोंड केले,
ते तोंड पाहताच अमनच्या तोंडून भीतीने किंचाळी आली,
त्या बाईच्या चेहऱ्याचा एका बाजूचा भाग पूर्ण जळलेला, त्यातून रक्त आणि एक किळसवाणे द्राव निघत होते,
आगीच्या प्रकाशात तर तो चेहरा आणखी भयावह वाटत होता,

अमनची किंचाळी निघताच ती बाई सुद्धा विचित्र आवाज करत एका झटक्यात अमनकडे वळली,
अमनने किंचाळतच डोळे मिटून घेतले…

Horror Stories In Marathi – नदीच्या पलीकडे 1| Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – नदीच्या पलीकडे 2 | Storyteller Rushi

अमनचं मन काही काळासाठी पूर्णपणे सुन्न झालं,
कानठळ्या बसल्या…

डोळे उघडले, तेव्हा तो गाडीतच होता…

“काय रे एवढं दचकायला काय झालं?, काय वाईट स्वप्न वैगेरे बघीतलंस का काय?” – बाजूने रजतचा आवाज आला…

तसा अमन भानावर आला, डोकं जड झालेलं पण वेळीच सावरून बसला, घड्याळात बघितले तर रात्रीचे १ वाजून गेलेले…

म्हणजे हे एक वाईट स्वप्न होतं तर,

बाहेर खूप वारा वाहत होता, बाजूच्या जंगलमधून प्राण्यांचे आणि रातकिड्यांचे आवाज येतच होते…

काही वेळ तरी शांततेत गेला, पण नंतर परत समोर गाडीच्या प्रकाशात एक पांढऱ्या साडी वर बाई गाडीला हात करून लिफ्ट मागताना दिसली, …

ह्या वेळी ती रजतला सुद्धा दिसली,
अमनच्या शरीरावरुन एक सर सरून काटा येऊन गेला…

“एवढ्या रात्री अश्या सामसूम ठिकाणी कोण आहे? चल बघू कदाचित आपली मदत तरी होईल” -रजत आपल्याच धुंदीत होता.

पण अमन त्याचं बोलणं थांबवत मधेच म्हणाला,
‘रजत नाही, गाडी अजिबात थांबवू नकोस, मला आता वाईट स्वप्न त्याच बाबतीत पडलं, गाडी कुठेच थांबवू नकोस, डायरेक्ट आपल्या घरी चल, ती बाई मला काही ठीक नाही वाटत’

पण रजत त्याचं ऐकेल तर खरं…

“अरे अमन तुला कधीही भूतांचेच स्वप्न पडत असतात, 

जरा बघू तरी कोण आहे, आणि आपण गाडीतून नाही उतरणार, चालता चालताच विचारू”

एवढं बोलून रजतने गाडी स्लो केली, जशी गाडी तिच्या जवळ आली तसं त्यांना स्पष्ट दिसायला लागला,
तिने डोक्यावरून पदर घेतलेला…

अमनच्या शरीरातून घामाच्या धारा वाहू लागल्या, तेवढ्या थंडी मध्ये सुद्धा त्याचे हात पाय बर्फासारखे गोठू लागले…

कारण ही तीच बाई होती, जी त्याच्या स्वप्नात होती,
अमनने गाडीची काच खाली केली…
रजतने गाडी थांबवून तिला विचारले, “कुठे जायचंय? आमची काही मदत होईल का?”

रजत तेवढं बोलतच होता, की वाऱ्याची एक मोठी झुळूक येऊन तिचा पदर डोक्यावरून खाली पडला…

आणि ते बघून दोघांच्या पण चेहऱ्यावरचे हावभाव एका क्षणात बदलले, कारण त्या बाईचं फक्त धड च तिकडे होतं, एक शीर नसलेलं धड…

भय काय असतं, ह्याचा प्रत्यय त्या दोघांना त्या वेळी आला…

दोघांच्या पण तोंडातून एक भयंकर किंचाळी आली…
अमन तर जोरात रजत वर ओरडला,,
“गाडी काढ ऽऽऽ रजत गाडी पळव”

रजत ने एका झटक्यात गाडी ची स्पीड वाढवली, अमनने लगेच गाडी ची काच लावून घेतली…

दोघांची पण भीतीने गाळण उडालेली
‘आपल्याला इकडून यायलाच नाही पाहिजे होता’

रजत तर काही बोलायच्या मनस्थितीतच नव्हता…
घाबरतच त्याने रिअर व्हीव्यु मिरर मध्ये बघितलं, पण पाठीमागे कोणीच नव्हते, पूर्ण रस्ता सामसूम आणि ओसाड होता…

तरी खात्री करून घ्यायला त्याने अमनला मिरर मध्ये न बघता गाडीच्या मागच्या काचेतुन बघायला सांगितले…

अमनने वळून मागे बघितले, आणि ह्यावेळी मात्र त्याच्या मधले होते नव्हते ते त्राण सुद्धा निघून गेले,
कारण पाठी मागून ती शीर नसलेली बाई त्यांच्या गाडीचा धावत धावत पाठलाग करत होती…

तिच्या धावण्याचा वेग इतका जास्त होता, की कोणत्याही क्षणी ती त्यांच्या गाडी पर्यंत पोहोचू शकत होती…

“रजत गाडी पळव, अजून फास्ट” – अमन मोठ्याने ओरडत त्याला सांगू लागला…
गाडीची स्पीड १०० पार झालेली पण त्या पळणाऱ्या बाईचा वेग वाऱ्याच्या वेगा पेक्षा कमी नव्हता…

त्यांना त्यांचं अंत जवळ दिसत होतं, त्या टपरी वाल्याने सांगितलेले शब्द त्याला आठवले…
जगण्याच्या सर्व आशा त्यांच्या समोर गळून पडत होत्या…

रजतने गाडी चा वेग अजून वाढवला, कालांतराने पाठीमागून त्या बाई चे पाठलाग थांबले,
अमनने परत एकदा मागे वळून बघितले, आता पाठीमागे कोणी नव्हते,
फक्त एक ओसाड रास्ता…

दोघांनीही एक मोठा निश्वास सोडला,
झाल्या प्रकाराने दोघेही पूर्णपणे घाबरून गेलेले…
काही अंतर कापल्यावर रस्त्याच्या कडेला एक ढाबा दिसला,

चल ढाब्यावर थांबव कमीत कमी चहा तरी घेऊ,
ढाब्याच्या कडेला असलेल्या टपरीवर गाडी थांबली…

बाहेर खूप थंडी होती…
अमनने उतरून २ चहा सांगितले…
आणि दुसऱ्याच क्षणी टपरी वाला चहा घेऊन आला, चहा देत देत त्यांना हसत म्हणाला…
“हम्म, आप बचगये? बोहोत नसीब वाले हो, नही तो इस रास्ते से यहा आजतक कोई आ नही पाया”

दोघांच्याही कपाळावर आठ्या आल्या,

त्याचं एवढं बोलणं पुरेसं होतं, की दोघांनी घाई मध्ये त्या चहा वाल्याकडे बघितले,
हा तोच चहा वाला होता, जो हा रस्ता लागायच्या आधी त्या हॉटेल च्या बाजूला भेटलेला…

त्यांनी लगेच हॉटेल कडे बघितले, हा हॉटेल सुद्धा तोच होता,
”हॉटेल उज्जेन”

त्यांच्या हातातले चहा चे कप तसेच गळून पडले आणि त्यांनी लागलीच आपल्या गाडी कडे वेगाने धाव घेतली…

गाडी स्टार्ट करायला लागले, पण काही केल्या स्टार्ट होत नव्हती…
अमन सारखं सारखं त्याला बोलत होता पण तरी गाडी स्टार्ट व्हायचं नावच नव्हती घेत…

दोघांनी समोर बघितले, एकाएकी हॉटेल मधली सर्व लोक त्यांच्या दिशेने येऊ लागले…

काहींचे कपडे फाटलेले, काहींचे चेहरे भाजलेले, आणि काही तर बिना शिरांचे…

ती लोक जिवंत होती की मेलेली, काही समजत नव्हतं…
एक शेवटचा प्रयत्न केला गाडी स्टार्ट करण्याचा पण तो सुद्धा वाया गेला…

आता ह्या क्षणाला देवाचा धावा करण्यावाचून दुसरा पर्यायच उरला नव्हता…
ते समोरचे लोक जवळ येत होती, विचित्र आवाज काढत त्यांच्यावर हळू हळू झेपावत होती…

आता अंतिम मार्ग म्हणून त्या दोघांनी गाडी तशीच टाकून तिकडून पळायचे ठरवले…
पण गाडीतून उतरता उतरताच त्यांना उशीर झालेला,
ते समोरचे लोक त्यांच्या पर्यंत आलेली सुद्धा…

त्यांचे ते भयानक, किळसवाणे चेहरे, आणि जीवघेणे आवाज…
ह्यातच त्यांचा अर्धा जीव गेलेला…

त्यांनी चारही बाजुंनी त्यांना घेरले…
सुटायचे सगळे पर्याय नाहीसे झाले…

दोघांच्या मोठ्या किंचाळ्या पूर्ण आसमंतात भिन-भिनल्या…

२ महिन्या नंतर-
एक फॅमिली त्याच रस्त्यावरून जात होती…
“बाबा खूप भूक लागलीये”-

‘ठीक आहे तो बघ हॉटेल दिसत आहे’, तिकडे जाऊया खायला…

गाडी हॉटेल पाशी थांबली आणि सर्व जण हॉटेल मध्ये गेले…

“बोला, काय ऑर्डर आहे?” -वेटर

‘मेनू काय आहे’

इकडे चिकन खूप स्पेशल भेटतं…..आणू?”

Horror Stories In Marathi – शेवटची रात्र | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – हौंटेड हायवे | Storyteller Rushi

तुम्हाला ही Marathi bhaykatha no. 3 – दिघाटी रोड

कशी वाटली हे comments करून आम्हाला सांगा. आशा आहे की तुम्हाला Horror Stories In Marathi- दिघाटी रोड ही भयकथा आवडली असेल.

जर तुम्हाला हि भयकथा – दिघाटी रोड आवडली असेल तर तुम्ही तुमच्या friends सोबत social networks जसे की Facebook, google, twitter इत्यादी वर share करा. तसेच Like करा आणि ह्या आणि अश्या बऱ्याच कथा Audible स्वरूपात ऐकायच्या असतील तर आपल्या Storyteller Rushi च्या YouTube Channel ला भेट द्या.

तुम्हाला सुद्धा तुमच्या Horror Stories किंवा तुमचे horror experience आमच्या पर्यंत पोहचवायचे असतील तर Email : Storytellerrushi@gmail.com यावर mail करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply