Horror Stories In Marathi – आजची हि Marathi Bhaykatha no. 11 – हौंटेड हायवे हि गोष्ट एका सामसूम पण तितक्याच घातक रस्त्याची.

Marathi Bhaykatha no. 11 – हौंटेड हायवे (Horror Stories In Marathi)

सुनसान रस्ता,
आणि त्या मध्ये विशाल ची बाईक एकदम संथ गतीने धावत होती आणि त्याच्या मागे डबल सीट निधी.
दोघे एक हॉरर मूवी बघून घरी परतत होते.

‘काय बकवास मूवी होता, मला तर काहीच भीती नाही वाटली, मी नाही मानत ह्या असल्या फालतू गोष्टींना’

“अरे त्यात काय एवढं, आणि तो मूवीच तर होता, पण भुतांची अशी मस्करी नको करू काही गोष्टी आपल्या समजण्या पलीकडे सुद्धा असतात”
निधी त्याला समाजवायच्या स्वरात बोलली.


ह्यावर विशाल मोठ्याने हसला आणि गाडी चालवत राहिला.

रस्ता खूप सामसूम होता आजू बाजूला गर्द झाडी
आणि पूर्ण रस्ता अंधारात गुडूप झालेला,
फक्त गाडीच्या हेडलाइटचा तेवढा प्रकाश होता.

थोडे पुढे जातो, तेच विशालला त्याची गाडी थोडी हलकी भासू लागली.
त्याने वळून मागे बघितलं तर त्याला आश्चर्यचकित होण्या पलीकडे दुसरं काही सुचलं नाही.
पाठी मागच्या सीट वर निधी नव्हती.

तसे दोघे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये होते,
त्यात निधी ला काही झालं तरी जीवाचं एक करणारा होता तो.

Horror Stories In Marathi – झपाटलेलं रेल्वे स्टेशन | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – फोटो स्टुडिओ | Storyteller Rushi


त्याने त्वरित गाडी बाजूला थांबवली, आणि खाली उतरून निधीला शोधायला लागला.
चालत चालत थोडा मागे गेला, पण लांब लांब पर्यंत निधी चा काहीच पत्ता नव्हता.

तो हतबल झाला आणि चिंताग्रस्त सुद्धा.
शेवटी त्याने निधीला अजून पाठी मागे जाऊन शोधायचे ठरवले.
तो परत बाईक कडे वळला.
तितक्यात त्याला त्याच्या वरून एक आवाज यायला लागला.

कुर्रर कुर्रर.

त्याने वर बघितले आणि आता पर्यंत त्याचे चिंताग्रस्त चे हावभाव एका क्षणात भीती मध्ये बदलले.

त्याच्या बाजूच्या झाडाच्या वरती निधी रांगत रांगत झाडावर चढत होती.
आणि वर चढताना गुरगुरण्याचा आवाज सुद्धा काढत होती.

हे बघून त्याचे होते नव्हते ते अवसान सुद्धा गळाले.
त्याने क्षणाचाही विलंब न करता बाईकला किक मारली आणि एकदम स्पीड मध्ये गाडी चालवायला लागला.

थोडे पुढे जातो, तेच त्याची बाईक परत त्याला जड वाटायला लागली.

त्याने हलकं मागे वळून पाहिलं, तर ती निधी होती.

हे बघताच त्याचा त्याच्या गाडीवरचा पूर्ण नियंत्रण सुटला, आणि गाडी स्लिप होऊन घासत गेली.

थोडा वेळ तसाच पडून राहिला,
शुद्धीत आल्यानंतर विशाल ने निधी कडे पाहिले, ती तशीच पडून होती, थोडे रक्त सांडलेलं.
त्याने पटकन जाऊन रूमाल ने आधी रक्त थांबवलं.

आणि तिला उचलून हायवेच्या जवळ आला.

तितक्यात लांबून एक ट्रक येताना दिसला.
विशाल ला आता जरा हायसं वाटलं, मनातल्या मनात त्याने देवाचे आभार मानले.

ट्रक जवळ येताच त्याने आधी ट्रकला थांबवले आणि त्यात बसले.

गाडी चालत राहिली, की तितक्यात त्याला गाडी च्या पाठी मागून कोणतरी ट्रक ठोठवतोय असा आवाज यायला लागला सारखा.

ठकठक ऽऽऽ

विशालने शेवटी न राहवून ड्राइवर ला विचारलं,

‘हे कसला आवाज येतोय रे मगासपासून’

ड्रायव्हर ने ट्रक थांबवला आणि जरा चिडतच बोलला.

“अरे साहाब वो हमरी बिवी हैं. पहले खुद मरी पिछले साल और अब २ महीना पहले हम को भी मार दिया.
फिर भी पिच्छा नही छुटा साला”

त्याचे हे शब्द ऐकताच विशालचे जे होते नव्हते ते त्राण सुद्धा निघून गेले.

त्याने निधी ला घेतलं आणि तिकडून लगेच खाली उडी मारली.
स्वतःला लगेच सावरलं आणि तिकडून निधी ला घेऊन कसा बसा घरी आला.

घरी पोहोचताच त्याच्या जीवात जीव आला, विचार केला बाईक उद्याच सकाळी जाऊन बघेल.

Horror Stories In Marathi – शौर्यकथा – वाडा | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – तो..| Storyteller Rushi

टिंग टॉंग

सकाळ झालेली.
दारावरची बेल वाजली.

डोळे चोळत विशाल उठला आणि दार उघडायला गेला.
दारा मध्ये पोलिस होते, त्यांना विशालची गाडी भेटलेली, तीच घ्यायला त्याला बोलवायला आलेले.

विशाल ही गोष्ट निधी ला सांगायला गेला, पण ती बेड वर नव्हती,

ती अंघोळ करायला गेलेली, विशाल ने बाहेरूनच तिला आवाज दिला.

“निधी, मी जाऊन येतो जरा पोलीस आले आहेत त्यांना आपली गाडी भेटली ती घेऊन येतो”

‘हो जा, आणि लवकर घरी ये’
निधी ने आतमधूनच उत्तर दिले

पोलीसांच्या गाडी मधून ते घटनास्थळी पोहोचले.
तिकडे पोहोचताच विशाल ला अजून एक मोठा धक्का बसला.
कालच्याच प्रसंगातुन तो अजून सावरला नव्हता, की परत एक प्रसंग ओढवलेला.

त्याची गाडी तिकडे तशीच पडून होती, आणि गाडी च्या बाजूला निधीचे मृत शरीर सुद्धा होते.

पोलिसांनी संशयावरून विशाल ला ताब्यात घेतले.
विशाल ने खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण काही फायदा झाला नाही.

२ दिवसांच्या कैदेनंतर त्याला त्याच्या मीत्राने जामिनावर सोडवले.

दोघे परत घरी जात होते, की परत तो रस्ता आला,
विशाल मागे बसलेला आणि त्याचा मित्र गाडी चालवत होता.
जसा तो रस्ता आला तेव्हा त्याने त्याच्या मित्राला ही घडलेली हकीगत सांगितली.

त्याच्या मित्राला हे ऐकून हसू आवरेनसे झाले.
जोरात हसत तो बोलला.

“काय रे विशाल, जरा कमी फेक माझ्या जवळ.
हे भूत वैगेरे काहीच नसतं रे”

ह्यावर विशाल जरा चिडला.
‘हसू नको, मी खोटं बोलत नाही, मी सुद्धा त्यादिवशी अशीच मस्करी केली होती, म्हणून आता ही वेळ माझ्यावर आलेली’

इतकं बोलून ते परत चालु लागले.

पुढे त्या रस्त्याची हद्द संपत आली, आणि त्याच वेळी रस्त्याच्या कडेला एक पांढरी आकृती त्यांना थांबवायचं इशारा करत होती.
त्याने जवळ जाऊन बघितलं तर ती निधी होती.

विशालच्या मनात जोरात सनक गेली.

त्याने लगेच मित्राला गाडी थांबवायला सांगितली.

गाडी थांबवल्या थांबवल्या दोघे खाली उतरले.
विशाल ने मित्राकडे बघितले तर त्याचा चेहरा आता पूर्ण लालबुंद झालेला.
डोळे पांढरे झालेले.एका बाईच्या आवाजामध्ये तो विशाल ला बोलला.
“तुला बजावले होते ना मी, की मस्करी नको करत जाऊस, तुझ्या मुळे माझा जीव गेला”

हे इतकं ऐकणं बाकी होतं, की विशालचे वाचण्याचे सर्व प्रयत्न अपयशी ठरत होते असं वाटत होतं.

त्याने लगेच बाईक घेतली आणि तिकडून रिटर्न मागे गेला.

थोडासाच पुढे गेला असेल की लागलीच त्याची बाईक बंद पडली.

बाईक बंद पडली, त्या रस्त्याच्या बाजूलाच एक टेम्पो होता.

तो बाईक तशीच बाजूला ठेवून टेम्पो जवळ गेला,
टेम्पो आतमधून लॉक होता.

स्वतःच्या नशिबाला दोष देत विचार केला, टेम्पो च्या वरती जाऊन बसतो, तिकडे सुरक्षित तरी राहील, आणि कोणी गाडी आली तर लिफ्ट सुद्धा मागेन.

लगेच तो टेम्पोच्या वरती बसायला गेला.
थोडं वेळ जातो न जातो की तेच, परत त्याच्या वरून आवाज यायला लागला.

कुरररर कुर्रर..

त्याने परत वरती बघितलं तर तिकडे निधी होती.

आता मात्र ती पूर्ण रागामध्ये झाडावरून खाली उतरून विशाल च्या जवळ येत होती तिचे ते रक्ताळलेले डोळे, ती तीक्ष्ण आणि खुनशी नजर, 
तोंडातून एखाद्या जनावरा सारखे दात बाहेर आलेले.

Horror Stories In Marathi – अखेरचा प्रवास | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – द लास्ट शिफ्ट | Storyteller Rushi

विशालला आता असं वाटत होतं की त्याला कोणीतरी खोल दरी मध्ये धक्का दिला आहे,
ज्या मध्ये तो परत वर तर जाऊ शकत नाही.
 शिवाय तो खाली सुद्धा पडत नाही, किंवा मध्ये कोणता दगड येऊन त्याचे तुकडे तुकडे सुद्धा करत नाही
मधल्या मध्ये अडकला आहे, आता जीव जातो की नंतर.

निधी ला त्याच्या जवळ येताना पाहून विशाल ने पटकन टेम्पोच्या खाली उडी मारली, 
आता मात्र टेम्पो चा दरवाजा उघडला होता आणि आतमधे चावी सुद्धा होती.

त्याने लगेच टेम्पो चालू केला आणि फुल स्पीड मध्ये टेम्पो चालवू लागला…

पण कितीही झालं तरी आजची रात्र विशाल साठी काहीच ठीक करत नव्हती.

थोडे पूढे जाते, तेच त्याच्या गाडी च्या दोन्ही हेडलाईट एक एक करून बंद झाल्या.

तरीही गाडी थांबवून काही फायदा नव्हता.
गाडी तशीच चालू राहिली,

अंधारात काही दिसत नव्हते, 

की तितक्यातच मोठा आवाज करत गाडीच्या बॉनेट वर काही तरी आदळले.

विशाल ने मोबाईल ची टॉर्च लावून समोरच्या काचेमध्ये बघितले, तर एक माणूस होता धूळ आणि रक्ताच्या थारोळ्यात त्याचा शेवटचा श्वास घेत होता.

मोठा अकॅसिडेंट झालेला विशालच्या गाडीतून
आणि त्याच्या समोर त्या माणसाने जीव सोडला.

ते बोलतात ना नशीब एकदा खराब निघायला लागलं, की पूर्ण बरबाद झाल्याशिवाय सोडत नाही माणसाला.

विशाल सोबत सुद्धा तेच होत होते.

तितक्यातच पोलिसांची गाडी राऊंड मारत त्याच्या जवळ येईन थांबली.
आता त्यांच्या समोर होते ते फक्त विशाल, त्याची टेम्पो आणि एक प्रेत.

पोलिसांनी लगेच विशाल ला ताब्यात घेतलं आणि त्यांच्या व्हॅन मध्ये बसवले.

गाडी पुढे जात च होती, की ही गाडी सुद्धा भर रस्त्यातच बंद पडली.

खूप प्रयत्न करून सुद्धा गाडी चालू होतं नव्हती.

तितक्यात विशाल जिकडे बसलेला त्याच्या साइड चा दरवाजा आपोआप उघडला गेला,
विशाल ला पाळायचा पूर्णपणे चान्स होता, पण त्याच्या मनात हा विचार आलाच नाही, कारण जर इकडून पळालो तर हे पोलीस मागून गोळी मारतील.
म्हणून तो तसाच गाडी चालू होण्याची वाट पाहू लागला.

थोडा वेळ जातो ना जातो, तेच त्याच्या गाडी च्या खालून कोणाच्या तरी घसरण्याचा आवाज येऊ लागला.

गाडी च्या खाली कोणतरी रांगत चालत होते, ते बरोबर विशाल च्या पाया खालच्या भागावर येऊन थांबले.

आता मात्र विशाल ची बोबडी वळली,
आणि काही क्षणातच ते जे काही रांगत रांगत आलेले, ते गाडी च्या खालून एकदम विशाल वर झडप घालायला आले.


एका एकी दचकून विशाल जागा झाला जसं काय तो झोपेतून किंवा बेशुद्धावस्थेतुन जागा झालेला,

तो अजूनही टेम्पो चालवत होता, आजूबाजूला अंधाराच साम्राज्य होतं.
समोरची काच सुद्धा तुटलेली.
की तेव्हाच टेम्पो च्या मागून ठकठक करण्याचा आवाज आला.

त्याने समोरच्या मिरर मधून मागे बघितला, तर पाठी मागे निधी त्याला हात हलवून निरोप देत होती.

विशाल पाहिजे असून सुद्धा ब्रेक मारू शकला नाही, आणि गाडी पुढे जाऊन मोठया दगडा वर आदळून चकानाचूर झाली.
खूप मोठा अपघात झालेला आणि त्यात विशाल वाचू नाही शकला..


कोणी तरी खरंच बोलून गेलंय, 
प्रत्येक गोष्टीची मस्करी चांगली नसते.

Horror Stories In Marathi – दिघाटी रोड | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – भानगड | Storyteller Rushi

तुम्हाला ही Marathi bhaykatha no. 11 – हौंटेड हायवे

कशी वाटली हे comments करून आम्हाला सांगा. आशा आहे की तुम्हाला Horror Stories In Marathi – हौंटेड हायवे ही भयकथा आवडली असेल.

जर तुम्हाला हि भयकथा – हौंटेड हायवे आवडली असेल तर तुम्ही तुमच्या friends सोबत social networks जसे की Facebook, google, twitter इत्यादी वर share करा.

तसेच Like करा आणि ह्या आणि अश्या बऱ्याच कथा Audible स्वरूपात ऐकायच्या असतील तर आपल्या Storyteller Rushi च्या YouTube Channel ला भेट द्या.

तुम्हाला सुद्धा तुमच्या Horror Stories किंवा तुमचे horror experience आमच्या पर्यंत पोहचवायचे असतील तर Email : Storytellerrushi@gmail.com यावर mail करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply