जलभक्षिणी या एका नव्या सिरीज मधली Horror Stories In Marathi – जलभक्षिणी – ती अमावस्येची रात्र ही पहिली कथा.

Horror Stories In Marathi – अखेरचा प्रवास | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – द लास्ट शिफ्ट | Storyteller Rushi

Marathi Bhaykatha no. 22 – जलभक्षिणी – ती अमावस्येची रात्र (Horror Stories In Marathi)

दिवस भर काम करून थकलेल्या मनाला शांत करायला एक लॉंग-ड्राइव्ह माझ्यासाठी नेहमीच पर्वणी असते.

रात्रीची सुखावणारी शांतता आणि त्यात मंद अशी पावसाची रिमझिम, गाडीमध्ये चालू असणारा रेडिओ त्यामधली रोमँटिक गाणी.

अगदी स्वर्गसुखाची व्याख्याच म्हणता येईल.

माझी सेकंड शिफ्ट रात्री ११ ला सुटते. ऑफिसपासून माझं घर तसं एका तासाच्या अंतरावर आहे, पण माझ्या कार मधून ते अंतर फारसे जाणवत ही नाही.

घड्याळात ११ चे ठोके पडले आणि नेहमीप्रमाणे मि माझी बॅग घेतली आणि घरी जायला निघालो. 

पावसाची रीप रीप चालूच होती. मंद वारा शरीर आणि हाडं दोन्ही गारठवून टाकत होता.

मि गाडी स्टार्ट करून हिटर सुरु केला आणि घरी जायला निघालो. रस्त्यावरची शांतता आता रोजचीच झाली होती. गाडी वळणे घेत माझा आणि घरापर्यंतचा अंतर कमी करत होती.

“93.5 रेड fm पर, एक कहानी ऐसी भी”

माझ्या विचार चक्राला अडथळा आणत रेडिओचा आवाज मधेच वाढला.

हॉरर गोष्टी म्हणजे माझ्या जिव्हाळ्याचाच विषय.

मि रेडिओचा आवाज वाढवला आणि गोष्ट ऐकण्यात मग्न झालो.

“क्या आपने कभी रात के समय सुनसान सडक पे अकेले गाडी चलाई है?

अगर आपकी हा है, तो क्या आपने भी ऐसेही रात के समय मे कुछ हौन्टेड एक्सपेरियन्स किया हुआ है?

आज कि ये कहानी ऐसेही एक शक्ष्स पर है, जिसे रात मे लॉंग ड्राइव्ह बोहोत पसंद थी.

विकास, एक २६ साल का नौजवान, एक मल्टिनॅशनल कंपनीमे डीजाईन इंजिनीअर पोस्ट पे काम करता था, उसकी शिफ्ट चेंज होती रेहती थी, कभी सुबह कि, कभी दोपहर, तो कभी रात.

फिलहाल तो विकास कि सेकंड यानी दोपहर कि शिफ्ट चल रही थी.

दोपहर ३ से लेकर रात ११ बजे तक.

इसीलिये विकास ऑफिससे रोज देर रात निकलता था. आज भी ऐसेही ११ बजेके बाद विकास अपने घर जाने को निकला.

अमावस की रात थी, धिमी धिमी बारिश की बुंदे, और जमा देने वाली ठण्ड विकास की रूह को बर्फ की तरह ठन्डा करती जा रही थी. विकासने गाडी स्टार्ट करते ही एसी को हिटर मोड पे रखा, बदन को थोडी राहत मिली.”

कमाल आहे बुवा, सेम माझीच स्टोरी सांगून राहिले काय आज रेडिओ वाले. डिजाईन इंजिनीअर, ३ ते ११ शिफ्ट, गाडीमधलं हिटर चालू करणं आणि त्यात आजही अमावस्या.

रेडिओच्या या विचारात गुंतलो असतानाच एक कार मोठ्याने हॉर्न वाजवत मला वेगाने ओव्हरटेक करून बाजूने निघून गेली. तिचा वेग इतका होता, की एकवेळ साठी माझी गाडी सुद्धा बिथरली.

मनातल्या मनात २-४ शिव्या हासडून मि पुन्हा गोष्ट ऐकण्यात मग्न झालो.

Horror Stories In Marathi – दिघाटी रोड | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – भानगड | Storyteller Rushi

“गाडी चलाते चलाते अकेलापन ना लगे इसलिये विकास ने रेडिओ ऑन किया. लेकिन रेडिओ पे गानो के अलावा कुछ भूतीया कहानिया चल रही थी. विकास वैसे तो डरपोक आदमी है, लेकिन भूतो की कहानिया सुनना उसे बोहोत अच्छा लागता है.

कहानिया सुनते सुनते विकास कहानीयोमेही खो गया था की अचानक से एक कार बोहोत तेज, मानो सौ की रफ्तार से उसे ओव्हरटेक करके आगे चली गयी.

उस गाडी की रफ्तार इतनी तेज थी, की थोडी देर के लिये विकास भी हक्काबक्का रेह गया.”

माझ्या मनात थोडी का होईना पण शंकेची पाल चुकचूकली.

गाडी मध्ये हॉरर गोष्टी ऐकणे आणि त्यात आता थोड्याच वेळा पूर्वी ही कार ओव्हरटेकची घटना माझ्या सोबतही घडलेली.

मि न राहवून रेडिओच बंद केला. ना रहेगा बास, ना बजेगी बासुरी.

पण मानवाचं मन बिन भरवशी आहे. उत्सुकतेची परिसिमा गाठली की तो हव्या त्या गोष्टी करायला लागतो. यात त्याला स्वतःचा फायदा होईल की तोटा याचेही भान राहत नाही.

शेवटी याच उत्सुकतेपोटी मि पुन्हा रेडिओ चालू केला.

गोष्ट कंटिन्यू चालू होती. 

“विकास की गाडी जैसे जैसे अपना रास्ता काट रही थी वैसे वैसे वो शमशानके बाजूवाली नदी नजदिक आ रही थी.”

मला आठवलं, माझ्या घरी जाण्याच्या मार्गावरही स्मशानभूमी आणि तिला लागूनच एक नदी वाहते.

“कई लोगोंका ये मानना था, की उस नदी मे अमावस की रात ‘वो’ निकलती है. ‘जलभक्षिणी’.

हाहाहा, जलभक्षिणी, हा कसला नाव आहे. आता पर्यंत या गोष्टीमधलं सर्व तंतोतंत खरं वाटत होतं, माझी ऑफिस शिफ्ट, अमावस्या, गाडी ओव्हरटेक करून जाणे वेगैरे, पण हे जलभक्षिणी काय नवीन प्रकार आहे.”जैसेही विकास की गाडी उस नदीके पास आयी तो उसने देखा दूर नदी के उस पार एक बोहोत ही खूबसुरत औरत विकास को बोहोत ही प्यार से देख रही थी.

विकास तो मानो जैसे उसके काबूमेही चला गया था.

वो उसके पास खिचा चला गया.

विकास पुरी तरह से उसके आगोष मे आ गया था. वो क्या कर रहा था, कहा जा रहा था. उसे खुद पता नही था.जब वो उस जलभक्षिणी के पास पोहोंचा. तो उसके होश ही उड गये. उसकी बची खुची ताकद भी जैसे खतम हो गयी हो.वो औरत एक चलते फिरते राक्षस की तरह दिख रही थी. आँखे पुरी तरह से लाल, नाक तो चेहरे पे थी ही नाही, और मु तो जैसे शार्क की तरह बडा उसमे बडे बडे दात, जैसे की एक झटके मे किसीको भी नोच खाये.

ये जलभक्षिणी पुरी तरह जलपरी से विपरीत थी.

विकास को जब होश आया तब तक बोहोत देर हो चुकी थी. वो उस जलभक्षिणीके चंगुल मे पुरी तरह से फस गया था.

उसकी आखरी दर्द से भारी चिंख सुनेने वहा पे कोई नही था.”

मि लागलीच रेडिओ बंद केला.

हँ, काहीही सांगतात, म्हणे जलभक्षिणी आणि ते ही जलपरीच्या विरुद्ध रूप.

मुळात जलपरी ही संकल्पना सुद्धा एक अंधश्रद्धाच आहे.

जलपरी सत्य असण्याचा एकही ठोस असा पुरावा नाहीये.

जसजशी माझी गाडी त्या नदीच्या जवळ येऊ लागली, तसं माझ्या मनातही एक दडपण येऊ लागलेलं.माझ्या बाबतीत सहसा असं कधीच घडत नाही. योगायोगाने माझं आयुष्य भरलेलं आहे, पण इतकं अचूक योगायोग क्वचितच एखाद्याच्या आयुष्यात पाहायला मिळतो.

माझी गाडी जशी नदीच्या बाजूने क्रॉस करू लागली, तसं मि नदीच्या पलीकडे पहिले.

आधी काही जाणवलं नाही, पण अंधाराला डोळे सरावल्यावर मला नदीच्या दुसऱ्या टोकावर पुसटशी हालचाल जाणवली.

मि त्वरित गाडी थांबवली आणि नीट निरखून पाहू लागलो.

पण तेवढ्या हलक्या हालचाली शिवाय दुसरं काहीच दिसलं नाही, जणू एक मानवी हालचाल वाटावी अशी.

एक शेवटचा उपाय म्हणून मि माझा मोबाईल काढला. माझ्या मोबाईलचा कॅमेरा तेवढा कॅपॅबल होता.

झूम इन करून मि त्या दिशेकडे कॅमेरा फिरवला, तेव्हा सगळ्यात पहिला धक्का माझ्या मनाला बसला.

माझ्या उघड्या डोळ्यांना जि पुसटशी हालचाल जाणवत होती, त्यामधलं काहीच कॅमेरा मध्ये दिसत नव्हतं.

असं कसं होऊ शकत?

मला काहीतरी फार मोठी गडबड वाटली.

इकडे जास्त वेळ थांबून स्वतःचा जीव धोक्यात घालून काहीही फायदा नाही, असला तर तो तोटाच.

मि ताबडतोब गियर टाकला आणि गाडी चालू करून पुढे चालायला लागलो.

काही अंतरच कापलं असेन, की एक मधुर संगीत माझ्या कानावर पडलं.

नीट लक्ष देऊन ऐकलं, ते संगीत त्या नदीच्या पलीकडूनच येत होतं.

Horror Stories In Marathi – अंधार | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – षंढ | Storyteller Rushi

पण एक गोष्ट इकडे वाखणण्याजोगी होती, ती म्हणजे आवाजाचे वहन करण्याचे कार्य वारा करतो. लांबचा आवाज आपल्यापर्यंत वाऱ्या मुळेच ऐकू येतो. वाऱ्याची दिशा आपल्याकडे असली तर.या आवाजाप्रमाणेच गंध म्हणजेच वास, याचे वहन करण्याचं कार्य देखील वाराच करतो. म्हणून जंगलात एखाद्या हरिणीचा गंध लांब उभ्या असलेल्या सिंहाला या वाऱ्यामार्फतच कळतो.

पण आताच्या घडीला जिकडे मि होतो तिकडे रात्री १२ वाजता वाऱ्याने साधं एक छोटं पान देखील हलत नव्हतं.

आणि तरीही इतक्या दूर वरचा मधुर संगीताचा आवाज माझ्या कानापर्यंत कसा येत होता?

माझ्या मनाचा ठाव ठिकाणाच राहिला नाही.

आता काही क्षणापूर्वीच मि रेडिओ वर अशीच गोष्ट ऐकत होतो. आणि आता तेच माझ्या सोबतही घडत होतं.

माझं मन त्या आवाजाच्या दिशेने खेचल जातं होतं, ओढलं जात होतं.

मि तिच्या संमोहन कक्षात प्रवेश करत होतो.

मला आजूबाजूच्या सर्व दुनियेचा विसर पडला. मि माझ्या गाडी मधून उतरून तिच्या कडे खेचलो जाऊ लागलो.

माझं मन क्षणाक्षणाला एक शेवटची जाणीव देत होतं.

प्रत्येकाच्या आतमध्ये वसलेला अंतरात्मा हाच असेल बहुतेक.

मला जाणीव होतं होती, तिकडे जाऊ नकोस, तिकडे धोका आहे. पण मन जेव्हा शरीरावर, हृदयावर हावी होतो. तेव्हा त्याला अडवणारं कोणीच नसतं.

मि तिच्यापर्यंत आपसूकच पोहोचलो.

मला फक्त तिचा चेहरा दिसत होता. जाणीवशून्य डोळे फक्त तिच्या सौंदर्याकडे पाहत होते.

मोरासारखे निळेशार डोळे, उभट पण धारदार नाक, गुलाब पाकळ्या दुमडल्या प्रमाणे ओठ.

तेच ओठ तिने मि जवळ येण्याने उघडले.

एका क्षणात तिचा रूप पालटला.

सत्यातून असत्याकडे, सज्जनातून दुर्जानाकडे, चांगल्यातुन वाईटाकडे असे तिचे रोप सौंदर्यातुन कुरूपतेमध्ये बदलले.

कुरूपता कसली, राक्षसी बदलच म्हणा, माझ्या उभा आयुष्यात मि असलं काही पाहिलं नसेल.

माझे कायमचे डोळे मिटण्याआधी तिचा एखाद्या राक्षसाप्रमाणे भासणारा जबडा मला दिसला.ते जीव पिळवटून टाकणारे दृश्य पाहून भीतीने अथवा कशाने तरी पण मि तिच्या संमोहनातून बाहेर पडलो. म्हणून कमीत कमी मरताना तरी हे तिचे खरे रूप मला पाहायला मिळाले.तिचे निळेशार असणारे डोळे आता लाल भडक झालेले, नाक तर नव्हतंच, पण तोंड तंतोतंत शार्क माश्यासारखे, त्यामधले ते माझ्या मांसाला खाण्यासाठी आसूसलेले मोठे मोठे दात.

काळीज चिरून जाणाऱ्या स्मशान शांततेला भंग करत दूर कुठूनतरी रेडिओ चा आवाज घुमू लागला.

“तो दोस्तो ये थी आज की जलभक्षिणीकी सच्ची कहानी.

इस कहाणी का लीड रोल विकास था लेकिन उसका असली नाम कुछ और ही है, लेकिन उसी के परिवार ने उसका असली नाम लेने से मना कर दिया.

तो मिलते है अगली कहानी लेकर कल रात ठीक ११ बजे.

Horror Stories In Marathi – त्या भयाण रस्त्यावर | Storyteller Rushi

Horror Stories in Marathi – द क्रिटिकल केस | Storyteller Rushi

तुम्हाला ही Marathi Bhaykatha no. 22 – जलभक्षिणी – ती अमावस्येची रात्र

कशी वाटली हे comments करून आम्हाला सांगा. आशा आहे की तुम्हाला Horror Stories In Marathi – जलभक्षिणी – ती अमावस्येची रात्र ही भयकथा आवडली असेल.

जर तुम्हाला हि भयकथा – जलभक्षिणी – ती अमावस्येची रात्र आवडली असेल तर तुम्ही तुमच्या friends सोबत social networks जसे की Facebook, google, twitter इत्यादी वर share करा.

तसेच Like करा आणि ह्या आणि अश्या बऱ्याच कथा Audible स्वरूपात ऐकायच्या असतील तर आपल्या Storyteller Rushi च्या YouTube Channel ला भेट द्या.

तुम्हाला सुद्धा तुमच्या Horror Stories किंवा तुमचे horror experience आमच्या पर्यंत पोहचवायचे असतील तर Email : Storytellerrushi@gmail.com यावर mail करून आम्हाला नक्की कळवा.

This Post Has 2 Comments

  1. bkjb

    Are bhava madhe madhe ch hindi che lines aahet. Jara copy tari dimag lavun kar

    1. Storyteller Rushi

      Radio show hindi ahe story madhe mhanun hindi sentence ahet story madhe. Copy keleli nahiy.

Leave a Reply