Horror Stories In Marathi – खेकडा? की हि आजची पहिली कथा एका भयानक,रहस्यमयी अश्या खेकड्या वर आहे, पण तो नक्की खेकडाच होता? की आणखी काही. हे ह्या कथेमध्ये आपण पाहणार आहोत.भुताटकी मैफल ह्या नवीन सिरीजच्या रुपात आपण आपल्या बालपणाच्या शेकोटी भोवतीच्या भयकथा ऐकणार आहोत.

Horror Stories In Marathi – भानगड | Storyteller Rushi

Marathi Bhaykatha no. 16 – Horror Stories In Marathi – खेकडा? की

‘भूत’ ह्या एका शब्दाबद्दल कुतूहल कोणाला नसावं? लहानांपासून प्रौढांपर्यंत प्रत्येकाच्या  आवडीचा भागच असतो.

           लोकांचं कशाला? आपल्या घरातच बघा! भुतांच्या गोष्टी, भयकथा ह्या खूप Interesting गोष्टी मानतात.

आमच्याइकडे देखील अश्या haunted किंवा रहस्यमयी कथा मोठया आवडीने सांगितल्या जातात. गावाला गेल्यावर जणू एक प्रकारची मैफलच जमते… मग ह्यामध्ये आम्ही सर्व भावंडे, गावातले मित्र, मैत्रिणी सर्व एकत्र जमतो. आणि रात्रीच्या वेळी घराच्या मागच्या अंगणात मस्त शेकोटी पेटवून भुतांच्या गोष्टी सांगण्यात व ऐकण्यात दंग होतो.

            आमच्या  सगळ्यांमध्ये मोठा ‘पवन’. त्यामुळे प्रत्येकवेळी पहिली गोष्ट सांगायचा मान आम्ही नेहमी त्यालाच द्यायचो. तो सुद्धा त्याच्या सोबत घडलेले, किंवा त्याच्या ऐकिवात असलेले किस्से मोठ्या आवडीने आम्हाला सांगायचा.

जास्त वेळ न दवडता पवन किस्सा सांगायला लागतो…

         तशी गोष्ट आहे साधारण 3 वर्षांपूर्वीची, मी आणि माझा मित्र सागर, आम्ही दोघे रात्रीच्या एक Horror चित्रपटाच्या Show मधून घरी जात होतो, तरी साधारण १-१.३० चा सुमार असेल. गाडी सागर चालवत होता आणि मी मागे Double sit बसलेलो. दोघांनाही चांगलाच उशीर झालेला पण तरीही सागर गाडीची वेग मर्यादा पाळत होता…

          माझ्या घरापासून ते सिनेमाघर साधारण अर्ध्या तासाच्या रस्त्यावर आहे, पण ते मुख्य रस्त्यानेच…

जर लवकर पोहोचायचे असेल, तर एक bypass road सुध्दा आहे…  आज उशीर झाल्या कारणाने मी सागर ला bypass road ने गाडी टाकायला सांगितली.

आजवर ह्या bypass road ने खूप वेळा ये-जा केलेली. पण दिवसा… असं रात्री-अपरात्री कधीच ह्या रस्त्याने येणं जाणं झालं नव्हतं …

Horror Stories In Marathi – पिंपळावरची हडळ | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – हायवे वरील थरार | Storyteller Rushi

           दिवसा गाड्यांच्या वर्दळीनी गजबजलेला हा रस्ता, रात्रीच्या काळोख्या विळख्यात एवढा सामसूम व निर्मनुष्य भासेल, असं वाटलही नव्हतं…

आम्ही त्याच गतीने गाडी चालू ठेवली…

पुढे राणसई च्या फाट्या नंतर वरच्या लाईट च्या खांबामधल्या लाईट्स बंद होत्या… एवढ्या सामसूम रस्त्यामध्ये आमच्या बाईकचा तेवढा मोजका प्रकाश पडलेला…            

आम्ही पाहिलेल्या Movie बद्दल गप्पा मारत जातंच होतो, की तितक्यात सागरने अचानकपणे एकाएकी गाडीचा Urgent brake मारला. 

Brake एवढा urgent होता, की मी हलकेच जाऊन सागर वर आदळलो. आणि त्याने का इतका urgent brake मारला, हे बघायला समोर नजर फिरवली.

आणि समोर बघताच मला सागरचे urgent brake मारण्याचे कारण समजले.

     आमच्या गाडीच्या समोर एक साधारण दोन ते अडीच फूट लांबीचा ‘खेकडा’ आमची वाट अडवून रस्त्याच्या मधोमध थांबलेला.

त्याला बघून माझी तर बोलतीच बंद झाली. तो खेकडा त्याच्या मोठमोठ्या नांग्या हवेमध्ये उचलून आमच्या दिशेने बघत होता.

       भीतीची एक लहर अंगावरून येऊन गेली. मला माहित आहे, की सागर ची अवस्था सुद्धा माझ्या सारखीच झाली असावी.

मी घाबरतच सागर ला बोललो…

“अ-अरे  स… सागर, ह हा एवढा मोठा खेकडा पहिल्यांदाच ब- बघतोय रे, त… तू एक काम कर, गाडी रस्त्याच्या क-कडेने ने आणि खूप फास्ट ने, त…त.. त्याच्यापासून लांबून ने.”

पण सागर ने माझ्या बोलण्यावर काहिच प्रतिक्रिया दिली नाही, जसं की त्याला माझं बोलणं ऐकूच गेलं नाही.

       मी सागर ला हलवत पुन्हा मोठ्याने म्हणालो, 

“अरे सागर, मी काहीतरी सांगितलं तुला” 

ह्यावर सागरने माझ्याकडे न बघताच गाडीचे हँडल डाव्या-उजव्या बाजूला हलकेच फिरवून गाडीच्या Headlight च्या प्रकाशात  समोरचं दृश्य दाखवलं.

ज्या विशाल खेकड्याला आम्ही बघितलं, तसेच एक सारखे दिसणारे, एक सारखे आकाराचे १० ते १२ खेकडे आमचा रास्ता अडवून आमच्या समोर उभे होते…

एवढ्या सामसूम जागे मध्ये, एवढे जीवघेणे दृश्य…

तेवढ्या कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा अंगावर घामाच्या धारा वाहू लागल्या…

त्यावेळी मी एकच आशा करत होतो, हे सगळं खरं नसावं, एक स्वप्न असावं…

Horror Stories In Marathi – अखेरचा प्रवास | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – द लास्ट शिफ्ट | Storyteller Rushi

मी लागलीच सागर ला मोठ्याने म्हणालो, “सागर गाडी फिरावं, U-Turn घे आताच्या आता, फास्ट, घाई कर, वेळ नाही आपल्याकडे, मला हे काहीतरी खूप भयानक वाटत आहे पळव गाडी इकडून पटकन”

सागरने सुद्धा माझं ऐकून त्वरित गाडी फिरवली, हा शॉर्टकट घ्यायचा आमचा निर्णय पूर्णपणे चुकलेला…

सागरने यावेळी मात्र गाडी पूर्ण स्पीड ने पळवली, मी सुद्धा जोपर्यंत मुख्य रस्ता येत नाही तोपर्यंत पाठी मागे वळून बघितलेच नाही…

काही वेळानंतर जिकडून आम्ही हा shortcut turn घेतलेला, तिकडे येऊन पोहोचलो, तेव्हा कुठे जिवात जीव आला.

तिकडून आम्ही आमच्या रोजच्या रस्त्याने घरी पोहोचलो…

ह्या रस्त्याने जाताना आम्हाला कोणताच भास झाला नाही,

आम्ही सुखरूप घरी पोहोचलो.

घरी आल्या आल्या आधी देवासमोर दिवा लावला आणि देवाचे आभार मानले.

त्या प्रसंगानंतर मी दिवसासुद्धा त्या रस्त्याने कधी गेलो नाही.

आम्ही त्या रात्री वाचलो, तेच आमचं नशीब.

पवन ची गोष्ट संपताच आम्ही सगळे हकाबक्का झालो,

सगळेजण पुरते घाबरून गेलेले, थोड्या वेळा साठी पूर्ण शांतता झाली.

तितक्यात त्या शांततेला भंग करत मी म्हणालो,

अरे हे तर काही नाही, खरा भयानक किस्सा तर एकदा माझ्या सोबत घडला…

Horror Stories In Marathi – अंधार | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – षंढ | Storyteller Rushi

तुम्हाला ही Marathi Bhaykatha no. 16 – खेकडा? की

कशी वाटली हे comments करून आम्हाला सांगा. आशा आहे की तुम्हाला Horror Stories In Marathi – खेकडा? की ही भयकथा आवडली असेल.

जर तुम्हाला हि भयकथा – Horror Stories In Marathi – खेकडा? की आवडली असेल तर तुम्ही तुमच्या friends सोबत social networks जसे की Facebook, google, twitter इत्यादी वर share करा.

तसेच Like करा आणि Horror Stories In Marathi – खेकडा? की ह्या आणि अश्या बऱ्याच कथा Audible स्वरूपात ऐकायच्या असतील तर आपल्या Storyteller Rushi च्या YouTube Channel ला भेट द्या.

तुम्हाला सुद्धा तुमच्या Horror Stories किंवा तुमचे horror experience आमच्या पर्यंत पोहचवायचे असतील तर Email : Storytellerrushi@gmail.com यावर mail करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply