Horror Stories In Marathi – आजची Marathi Bhaykatha no. 8 – नदीच्या पलीकडे भाग 1 हि कथा आहे.काही रहस्य ही पडद्यामागे असलेलीच बरी असतात, त्यांना नेहमीच सर्वांसमक्ष आणने गरजेचे नसते.

Marathi Bhaykatha no. 8 – नदीच्या पलीकडे भाग 1 (Horror Stories In Marathi)

रामा खूप वर्षांनी गावाकडे चाललेला…

तसा रोजच्या कटकटीच्या जीवनापासून लांब राहायला कोणाला नाही आवडणार, भले ते थोड्या दिवसांपुरतेच का असेना… आणि त्यात मे महिन्याच्या सुट्टीची भर…

तसंही त्याचे मागचे काही दिवस जरा ताण – तणावांमध्येच गेलेले, ते त्या एका स्वप्नामुळे…

ते एकच स्वप्न त्याला नेहमीच पडत असे…

स्वप्नामध्ये तो एका हवेलीत आहे, हवेली तशी फार फार जुनी होती, आतमधे वर्षानुवर्षे सडत राहिलेला पालापाचोळा, एक भयंकर दुर्गंधी चहूकडे पसरलेली…

घराच्या भिंतींचे रंग उडालेले, 

तो दरवाजा ढकलून आत गेला, समोरच मोठा हॉल, त्याला लागूनच डावीकडे किचन, 

हॉलच्या दुसऱ्या बाजूला एकमेकांच्या समोर २ बेडरूम आणि त्याच्या पुढे हवेली चे मागचे दार, 

घराच्या मागच्या दरवाज्या जवळच बाजूला वर जाण्याचा जिना…

रामा ते संपूर्ण घर न्याहाळतच होता की तितक्यात किचन मधून हुंदके देत कोणाच्या तरी रडण्याचा आवाज आला…

कधी कधी आपण आपल्या विचारात एवढं मग्न असतो, की आपण समोरच्या व्यक्तीच्या चेहर्याकडे एकटक बघत असतो, भले त्या व्यक्तीच्या चेहऱ्याशी आपला काही संबंध नसतो, पण आपण आपल्याच विचारात गुरफटलेले असतो,.आणि तितक्यातच जर त्या व्यक्तीने त्वरीत आपल्याकडे बघितले तर जशी आपली विचारांची मग्नता भंग पावते… तसंच रामाच्या विचारांना फुल स्टॉप लागलेले ते तिच्या रडण्याने…

रामा ने क्षणाचाही विलंब न लावता किचन मध्ये धाव घेतली…

ज्या वेगानं त्याने किचन मध्ये धाव घेतली, त्याच वेगानं त्याच्या उत्सुकतेचं रूपांतर भीती मध्ये झालं…

जसा तो किचन मध्ये पोहोचला तसा आवाज पूर्णपणे बंद झाला…त्याने पूर्ण किचन बघितले, पण त्यात कोणीच नव्हते…

हताश होऊन जसा मागे जाण्यास वळला, त्याच क्षणी त्याचे दोन्ही पाय ओढून कोणीतरी त्याला जोरात खाली पाडले…

अचानक झालेल्या त्या घटनेमुळे रामा पूर्णपणे घाबरला होता, आणि ते जे कोणी होते, ज्याने रामाला खाली पाडलेले… ते त्याच्या पायाला धरून त्याला खेचून घेऊन जात होते…

रामाला सुचत नव्हतं नक्की काय होत होतं… तो पूर्णपणे कावराबावरा झालेला… तोंडातून शब्द फुटत नव्हते की श्वासनलिके मधून श्वास येत नव्हता…

पूर्ण दबलेल्या अवस्थेत रामा एक आर्त अशी किंचाळी मारायच्या तयारीत होता,

की तितक्यातच तो दचकून जागा व्हायचा…

ती हवेली कोणाची होती?

त्यात कोण राहत होते?

आपण प्रत्येक स्वप्नात तिथेच का जातो?

ह्या सगळ्या प्रश्नांचा नाममात्र सुगावा लागत नव्हता…

Horror Stories In Marathi – अखेरचा प्रवास | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – द लास्ट शिफ्ट | Storyteller Rushi

लहानपणीच वडील गेल्या पासून घराचा सगळा भार त्याने उचलला होता, तो धीट होता, सर्व प्रकारच्या संकटांना एखाद्या निडर सिंहासारखा सामोरा जायचा…

पण आता हे स्वप्न….

ह्या एका स्वप्नाने त्याचे मन चल – बीचल केले होते…

आणि ह्यामुळेच त्याने गावामध्ये काही दिवस त्याच्या आईसोबत, त्याच्या लहान बहीण आर्या सोबत आणि गावातल्या मंडळींसोबत व्यतीत करायचे ठरवले…

गावात पोहोचला तेव्हा सूर्य त्याचा प्रखरलेला तेज कमी करत अस्ताला जात होता…

तो येणार ह्याची पूर्वकल्पना त्याने आईला आधीच दिली होती…

थोडी फार घरं सोडली तर गावामध्ये इतका बदल नव्हता…

आल्या आल्या आईने जेवण दिले,

इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या…

मग रामा आराम करायला त्याच्या खोलीत गेला…

प्रवासाच्या थकाव्यामुळे झोप सुद्धा लगेच लागली…

पण परत तेच स्वप्न, तीच हवेली आणि पून्हा एकदा तेच रडणे…

एखाद्या मुलीचे रडणे…

ती कशामुळे तरी त्रासलेली होती किंवा तिला तिकडे मरणासाठी अडकवून ठेवून कोणीतरी पसार झालेले त्यामुळे रडत असलेली…

तर्क कुतर्क लावण्यात काही अर्थ नव्हता…

आज कितीही झाले तरी ह्याचा मागमूस हा लावायचाच…

रामा किचन कडे जाण्यास वळला…

जसा किचनच्या उंबरठ्यावर पाय ठेवला तसा एक दुर्गंधीने भरलेला भपका नाकातून सर्वांगात भिनला…

हातानेच तोंड झाकत तो पुढे गेला…

ह्यावेळी मात्र तो किचन मध्ये आला तरी सुद्धा रडण्याचा आवाज थांबला नव्हता…

त्याने इकडे तिकडे नजर फिरवली,

किचन च्या एका कोपऱ्यात एक व्यक्ती दिसली, एक स्त्री होती… तिचे डोके तिच्या दोन्ही गुढग्यांमध्ये टाकून हुंदके देत होती…

रामाचे पाय जागच्या जागी थबकले… ईच्छा नसताना सुद्धा त्याचे मन तिची विचारपूस करण्यासाठी वळत होते…

काही न काही रामाच्या ह्या स्वप्नांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या तिच्याशी काही ना काही संबंध हा होताच…

रामा ने मन घट्ट केले आणि तिच्या दिशेने चालू लागला…

जसा रामा तिच्या जवळ जायला लागला, तसे तिचे हुंदके सुद्धा कमी झाले.

खोलीमध्ये आता फक्त रामाच्या चप्पलचा आवाज घुमायला लागला.

रामा ने तिच्या जवळ जाऊन जसं तिच्या खांद्यावर हात ठेवलं, तसं तिने तिचा चेहरा हळू हळू वरती केला.

चेहरा कसला, चेहराच नव्हता फक्त हाडाची कवटी, पूर्ण पांढरीफटक आणि त्यातून ना जाणे किती तरी किडे डोळ्यातून, नाकातून वळवळत होते.

रामा ने असे दृश्य ह्या आधी कधी टी.व्ही. मध्ये सुद्धा पाहिले नव्हते. रामा चे डोळे उघडे ते उघडेच राहिले.त्याने झटकन हात मागे घेतले आणि तिकडून पळून जाण्यास मागे वळला, की तेच तिने रामाचे पाय ओढले आणि त्याला खाली पाडला आणि तसंच त्याला खेचून घेऊन जाऊ लागली.रामा ओरडत होता, विव्हळत होता, पण त्या निर्दयी स्त्री रूपी भुताला ह्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं. रामा ऊठ.

बघ सूर्य डोक्यावर आला, आज जरा आपल्याला पाटकरांच्या घरी जायचंय पूजा आहे त्यांच्याकडे.

आईचा आवाज ऐकताच रामा उठला, काही वेळ तसाच अंथरूनात बसून राहिला, 

डोकं पूर्णपणे दुखत होतं.

Horror Stories In Marathi – हौंटेड हायवे | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – झपाटलेलं रेल्वे स्टेशन | Storyteller Rushi

त्याला वाटलं आईला हे सांगावं, पण ते एक स्वप्नच तर होतं.

आणि आता तो लहान तर मुळीच नव्हता.

 आपल्या सारख्या निडर मुलाने जर अस घाबरलं, तर आईला कसं सांभाळायचं.

म्हणून रामाने हे सर्व स्वतः पाशीच ठेवायचं ठरवलं.

पण आपण कितीही स्ट्रॉंग माइंडेड असलो, तरी आपल्या मध्ये एक नाजूक कडी नेहमी असते.

रामाचंही तसंच होतं.

त्याला ह्या गोष्टी आतमधे ठेवून त्यांना आपल्या मनावर आणि हृदयावर हावी होऊन द्यायच्या नव्हत्या.

त्याला ह्या गोष्टी व्यक्त करायला कोणतरी हवं होतं.

तितक्यात त्याला आईचं मगासचं बोलणं आठवलं.

पाटकरांच्या घरी पूजा होती.

पाटकरांचा मुलगा म्हणजे ऋषि आणि त्याच्याशी त्याची बालपणाची ओळख.

लहानपणी एकत्र खेळलेले, एकत्र वाढलेले.

पण आता कामा निमित्त रामा शहरामध्ये गेलेला एवढाच काय तो फरक.

त्याने पटकन अंघोळ करुन तयारी केली.

मनात पूर्ण विचार केलेलं की आपल्यासोबत जे काही होत आहे ते ऋषि ला सांगायचं.

पुजा नियमितपणे पार पडली, सर्व आपापल्या घरी जायला निघाले.

“आई तू हो पुढे, मी जरा ऋषि सोबत गप्पा मारून येतो’

‘मला वाटलेलंच, पण जास्त उशीर नको करुस, दिवे लागणीच्या वेळेला ये’

रामा तिकडेच थांबला, पण तेव्हा ऋषि च्या घरचे सुद्धा होते.

सगळ्यांसमोर सांगायचे, तर ते आपलीच मस्करी उडवतील म्हणून तो ऋषिला घेऊन गाव फिरायला गेला.

रामा पाहिले तर जरा बिचकतच होता म्हणून ऋषिनेच सुरुवात केली

‘हा बोल, काय सांगायचं होतं. पण त्या आधी तुमच्या मुंबईला कसं आहे सर्व हे सांग, आणि आम्हाला पण ने की कधीतरी त्या मायानगरीत’.

“हो नेईन रे नक्कीच नेईन, आपण सगळे जाऊ पण त्या आधी मला तुला जे सांगायचंय ते यापेक्ष्या किती तरी जास्त महत्वाचं आहे”, 

‘हा सांग ना बिनदास्त, मी ऐकतोय’

“तर ऐक- खूप दिवसांपासून, तसे दिवसांपासून म्हणण्या पेक्षा खूप महिन्यांनपासून मला एक विचित्र स्वप्न पडत आहे, एक नाईटमेयर. आणि त्यामध्ये हवेली आहे जुनी पुराणी, त्यामध्ये मी ओढला जातो आणि त्यात कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येऊन मला कोणतरी खेचून घेऊन जाऊ लागतं. दर वेळचं हे असंच आहे, खूप कंटाळलो आहे यार मी. विचार केला मानसोपचार तज्ज्ञांकडे जावं, पण कामाच्या पळापळीतून वेळ भेटेल तर नशीब”

रामाच्या ह्या बोलण्यावर आधी तर ऋषिला हसू अवरेनासे झाले. पण त्याला राग नको यायला म्हणून मधेच हसू दाबून ऋषि म्हणाला-

‘अरे वेड्या, हे असं तू ते सारखे होर्रोर मूवी बघून तेच तुझ्या डोक्यात बसलंय, म्हणून हे असले स्वप्न पडतात’

बोलता बोलता ते नदीच्या काठावर येऊन पोहोचले.

तितक्यात रामाला नदीच्या पलीकडे एक हवेली दिसली.

“काय रे ऋषि, ते घर कोणाचं आहे”

‘ते घर नाही रे, ती हवेली आहे, असं ऐकलंय, की त्यात खूप वर्षांआधी एक जोडपे राहत होते, त्यांना एक मुलगी पण होती. पण काय झालं माहीत नाही एकाएकी ते तिघे जण अचानक पणे गायब झाले. पहिले तर आपल्या गावातल्या लोकांनी तिकडे जाणे टाळले. पण शेवटी हिम्मत करून सर्व गाववाल्यानी एकत्र जाण्याचे ठरवले.

आणि जेव्हा सगळे त्या हवेली मध्ये पोहोचले, तेव्हा अख्या हवेली मध्ये त्यांना साधं चिटपाखरू सुद्धा नाही भेटलं. शेवटी निराश होऊन सर्व आपापल्या घरी आले.

पण त्या नंतर त्या हवेली जवळ किंवा हवेली मध्ये जो कोणी गेलाय, तो परत नीट आलाच नाही. एकतर तो वेडा तरी झाला, किंवा गायब’

ऋषिचे बोलणे संपतंय-न-संपतंय तेच रामा त्याच्या विचारांमध्ये गुंग झाला.

त्याच्या स्वप्नातली हवेली त्याने अशी बाहेरून बघितली नव्हती, फक्त आतूनच तीच दर्शन झालेलं.

आता मात्र त्याच्या डोक्यात प्रश्नांचं काहूर माजलं.

संध्याकाळ होत आली, दोघेही आपापल्या घरी गेले.

घरी येताच रामाच्या मनात होतं की आता आईला संगण्यावाचून गत्यंतर नाही.

जेवता जेवता रामाने सर्व हकीगत आईला सांगितली.

रामाचे सर्व बोलणं झाल्यावर एकच शांतता घरभर पसरली. आर्या आणि आई दोघींना भीतीचा झटका आल्यासारखं झालं. त्या दोघी रामाकडे एकटक बघत बसले.

त्या शांततेला भंग करत आई बोलली.

“तुला कोणी त्या नदीच्या जवळ जायला सांगितलेलं रे नाही ते उद्व्याप करायला, आता परत तिकडे जाऊ नकोस”

रामाला काहीच समजेना, तिकडे का जाऊ नये?, आणि माझ्या बोलण्यावर त्यांची प्रक्रिया अशी का होती?

क्षणभर रामाला वाटले की आर्याला ह्या बद्दल विचारावे, पण ती कशी सांगणार, तिला सुद्धा आईने बजावून सांगितले होते.

शेवटी रामाने हट्टच धरला आईकडे ह्या घटनेबद्दलचा.

आईला ही गत्यंतर नव्हता रामाला सर्व खरं संगण्याखेरीज.

“मी खूप वर्षांपासून तुझ्यापासून हे लपवत आलेली, पण आता तुला सांगायची वेळ आली आहे, तू चांगलं वाईट आता जाणायला लागलायस”

आईने जसं सांगण्याची सुरुवात केली, तसा तिचा चेहरा गंभीर होत गेला.

“इकडून २५ वर्षांपूर्वी तुझे बाबा एकदा जंगल मध्ये जाळण्यासाठी लाकडं घ्यायला गेलेले. तू लहान होतास तुला झोपवून मी त्यांची वाट बघत होते, पण काही लोकांनी त्यांना त्या हवेलीत जाताना बघितले, तिकडून ते एकाएकी नाहीसे झाले. ते गायब झाल्याची वार्ता कळताच पूर्ण गाव त्यांना शोधण्यासाठी गेला, पण जंगलासकट पूर्ण हवेली बघितली, पण तुझे बाबा कुठेच सापडले नाही. आपल्या घरावर तेव्हापासूनच दुःखांचा डोंगर कोसळला. त्यापासून तुला काही व्हायला नको म्हणून मी तुला शहरात पाठवले”

आईचे डोळे पाणावले.

रामा तर पूर्णपणे सदम्यातच गेलेला.

लगेच दुसऱ्या दिवशी त्याने तिकडे जाण्याचं ठरवलं.

सकाळ झाली, सकाळचा नाश्ता झाल्यावर रामा लगेच जाण्यास निघाला, 

“आई मी जरा ऋषिकडे जाऊन येतो”

आईला खोटंच अंगीतल नाहीतर तिने तिकडे परत जाऊन दिले नसते.

पण वाड्यात एकटं जाणे हे त्याच्या मनाला मान्य नव्हतं.

ऋषिला सोबत घेतलं तर सोबत पण होईल आणि भीती सुद्धा नाही वाटणार.

नदीच्या वाटेतच ऋषिचं घर होतं.

ऋषि तर आधीपासून साहसी होता तो लगेच यायला तयारही झाला.

दोघे निघाले नदीच्या रस्त्याला.

Horror Stories In Marathi – फोटो स्टुडिओ | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – शौर्यकथा – वाडा | Storyteller Rushi

रामाच्या मनात चलबिचल होती, त्याला त्याच्या स्वप्नांचं मूळ गवसणार होतं.

ऋषिला मात्र ह्यात काही नवल वाटत नव्हतं.

चालत चालत नदीवर पोहोचले, एक जुना लाकडी पूल होता, तसंही पूल ओलांडून पलीकडे खूप कमी लोकं जायचे.

दोघेपण तो लाकडी पूल ओलांडून पलीकडे गेले, जशी ती हवेली जवळ आली, तसे दोघांच्याही हृदयाच्या ठोक्याने जोर धरला.

हवेलीपाशी पोहोचले, हवेली बाहेरून बंद होती, पण दाराला कुलूप नव्हते.

ऋषीने दाराला एक जोरात धक्का दिला, आणि दार मोठा आवाज करत उघडला गेला.

बाहेर जरी दिवस होता तरी हवेलीच्या आतमधे पूर्ण काळोख होता, जणू सूर्याची किरणे त्या हवेलीच्या आतमधे स्पर्षच करत नव्हती.

दोघे हळू हळू आत शिरले.

जसे आतमधे गेले, रामाच्या भुवया उंचावल्या, श्वासोच्छ्वास उंचावला, तो स्वप्नामध्ये जी हवेली बघत आलेला, ही हवेली हुबेहूब तशीच होती.

ते हॉलमधून किचनमध्ये गेले. जिकडून ह्या सर्वांची पाळंमुळं निघत होती, ते जसे किचन कडे वळले, पूर्ण हवेली मध्ये एक विचित्र थंडावा जाणवू लागला, किचन मध्ये दुर्गंधी होती, आजूबाजूला पालापाचोळा सांडलेलं.

ते जसे किचनच्या आत गेले,

त्यांना किचन च्या एका कोपऱ्यात एक दरवाजा दिसला, बहुतेक हवेळीचा तळघर असावा.

ज्या वेळी ते दरवाज्याकडे जायला लागले. तेव्हाच त्यांना ज्याची सर्वात जास्त भीती होती तेच झाले.

ते जसे आतमधे गेले, तसे त्यांच्या दोघांच्या पायाला कोणीतरी जोरात ओढून त्यांना खाली पाडले.अचानक झालेल्या ह्या प्रसंगाने दोघेपण बिथरले. पाठी मागे वळून बघितलं तर कोणीच दिसत नव्हते, फक्त त्यांचे पाय हवेत होते आणि त्यांना कोणीतरी खेचून घेऊन जात होते. ते जे कोणी होते, ते पूर्ण किचन भर त्यांना तसे घसरवत नेत होते.अख्या हवेलीभर फक्त त्यांच्या किंचाळ्या ऐकू येत होत्या.

Horror Stories In Marathi – भानगड | Storyteller Rushi

 किचनच्या दरवाज्यापर्यंत पोहोचल्यावर एकएकी हा प्रकार थांबला.

ते जे कोणी होतं, आता ते गेलेलं.

 क्षणभर तर त्यांना आपल्या सोबत काय झाले हे कळलेच नाही. हात पायांना वर वर खरचटले. 

ते दोघे तातडीने आधी त्या हवेली बाहेर पडले आणि जोरात धावत सुटले.

जेव्हा ते दोघे नदीच्या या बाजूला आले तेव्हाच त्यांनी मोकळेपणाचा श्वास घेतला.

पायांवर हाताचे लाल व्रण होते. जसे मृत्यूच्या दाढेतून परतावे तसे ते परतले होते, 

आता मात्र ऋषिच्या मनात सुद्धा भीती उत्पन्न झालेली, त्याचा भूताखेतावरचा विश्वास ह्या प्रसंगाने जागृत झालेला.

“हे बघ रामा, आपण तिकडे नको परत जायला, मी सुद्धा असं काहीच एक्सपेक्ट नव्हतं केलं.

हे जे काही झालं ते आपल्यातच असुदे आणि आता तू माझ्या घरी चल तिकडे आराम कर, मग सावकाश जा घरी तुझ्या”

पण रामाला उलट आता अजून जास्त उत्सुकता होती, 

पहिले तर कधीच आपल्याला स्वप्नात ते दरवाजा नव्हते दिसले.त्याला आता काहीही करून ह्या सर्व गोष्टींचा छडा लावायचाच होता. आणि ह्याचा एकच मार्ग होता, ते म्हणजे तिकडे रात्रीचं जाणं.

कारण आता पर्यंत जेवढे पण प्रसंग झालेले ते सर्व रात्री मधेच झालेले.

त्याचे वडील सुद्धा रात्रीच तिकडून गायब झालेले.

काय माहित तिकडे कोणि अशी अमानवीय शक्ती असेल, ज्याने त्या सगळ्यांना त्या तळघरात कैद केले असेल, 

त्या सर्व निष्पाप जीवांना बाहेर काढायला कोणी प्रयत्नच केलं नसेल, आणि त्यात आपले वडील सुद्धा तर होतेच.

रामाच्या प्रश्नांचे उत्तर फक्त त्या हवेलीतच होते.

त्याने ऋषीला ह्या गोष्टी साठी मनवले तर होते, पण आतमधून दोघेही चांगलेच घाबरले होते.

ऋषीच्या घरी पोहोचले,

त्याचे आई आणि बाबा जेवणासाठी वाटच बघत होते.

दुपारचं जेवण झालं आणि दोघे अंगणात बसले आणि कसं आणि कधी जायचं ह्याचंच विचार विनिमय करू लागले.

२ दिवसांनी अमावस्या होती, अमावास्येला वाईटशक्ती दुप्पटीने वाढतात.

त्यांनी उद्याच जायचं ठरवलं.

ठरल्या प्रमाणे दिवस ठरला.

घरी सर्वजण झोपल्यावर कोणालाही न सांगताच ते निघाले, सोबत हव्या त्या वस्तू सोबत घेतल्या.

ऋषीचे आजोबा पंडित होते, त्यांची तुळशीची माळ सोबत घेतली, आणि रामाला पण एक दिली, सोबत देवाचा अंगारा आणि गंगाजल.

ऋषीचा घर नदीकडे जाण्याच्या रस्त्याला लागूनच होता.  रामाने तीकडूनच त्याला घेतले.

दोघे टॉर्च घेऊन झपाझप पाऊले टाकत निघाले.

कोवळी थंडी पडलेली.

रात्रीची भयाण शांतता, त्यात आजूबाजूचे सर्व दिवे मालवलेले. 

वाटेत कुठेतरी कुत्रांच्या विव्हलण्याचा आवाज त्या शांततेत भंग आणत होता.

घडळ्यात पाहिले, रात्रीचे ११ झालेले.

चालत चालत नदिच्या पलीकडे त्या हवेलीपाशी पोहोचले. दिवसा ती हवेली तितकी भयानक दिसत नव्हती जितकी रात्रीच्या वेळी.

ती कितीही भयानक असली तरी पण आतमधे जाण्यावाचून पर्याय नव्हता.

रामाने दरवाजा खोलून आत पाऊल टाकले. मागोमाग ऋषि सुद्धा होता. आतमधे मिट्ट काळोख, फक्त टॉर्च चा उजेड आणि त्यांच्या पायांच्या चपलांचा आवाज.

बाहेरच्या थंडी पेक्षा हवेली च्या आतमधली थंडी जीवघेणी होती.

ते किचन कडे वळले. टॉर्चचा उजेड त्या किचनच्या कोपऱ्यातल्या दरवाजापाशी टाकला आणि दोघेही आश्चर्यचकित झाले. तो तळघराचा दरवाजा ह्यावेळी उघडा होता.

  ते तळघराकडे जाण्यास वळले. दरवाजाच्या आत अंधार होता.

खाली जाण्यास पायऱ्या होत्या, तसं त्यांना ते अपेक्षितच होतं.

त्यांनी पहिली पायरी उतरली आणि खट्ट आवाज करत मागचा दरवाजा लागला.

दोघेही एकसाथ दचकले. परत दरवाज्याकडे गेले पण दरवाजा कोणीतरी बाहेरून लावलेला.

ते परत खाली जायला लागले.

खाली हवेलीच्या बाहेरच्या पेक्षा जास्त अंधार होता.

त्या तळघरात फक्त ते दोघेच होते.

पण त्यांचा हा भ्रम काही वेळातच तुटला.

जसं त्यांनी शेवटची पायरी खाली उतरली तशी त्यांची टॉर्च समोर असलेल्या कोपऱ्यात गेली.

जशी लाईट पडलि, ते समोरच दृश्य बघून आधी रामा आणि मग ऋषि दोघे एकामागोमाग एक ओरडले.

कारण समोर ६-७ मृत शरीर पडलेली दिसली.

इतकं भयावह दृश्य त्यांनी त्यांच्या भर आयुष्यात कधी पाहिले नव्हते.

ते लगेच तिकडून पायऱ्या चढून वर जायला लागले पण पहिली पायरी चढताच दोघांनाही परत खाली ओढले.

त्या खाली पडण्याने दोघांच्या हनुवटीवर जबर मार बसलेला.

त्यांनी मागे वळून बघितले, ते जे कोणी होते ते आता स्पष्ट दिसायला लागले.

ते एक पिशाच्च होते.

त्याची उंची साधारण 8 फूट, हात जमिनीला लागतील एवढे मोठे, त्वचा एखाद्या वितळत चाललेल्या मेणा सारखी

डोळे तर नव्हतेच फक्त खुबणी होती.

जीभ जणू सारड्या सारखी लांब आणि त्यातून बाहेर आलेले २ सुळे त्यांचा घास घेण्यास आतुर होते.

ते दोघे खाली पडलेले त्यामुळे ऋषिने जी पिशवी आणलेली ज्यात ते दैविक साहित्य होते, ती दूर कुठेतरी पडली गेली, टॉर्च दुसऱ्या बाजूला पडली.

त्या पिशाच्च ला बघून दोघांची बोबडी पूर्णपणे वळली, काय करावे काहीच सुचत नव्हते.

तो पिशाच्च रामा वर धावून गेला

रामाचा चेहरा काळा निळा पडला, हे एका मागोमाग एक एवढे भयानक दृश्य त्याच्या मानसिक बुद्धीला फास देत होते.

तो रामाच्या अंगावर धावला तेव्हा ऋषि ला पुरेसा वेळ भेटला ती पिशवी शोधायचा.

त्याने क्षणाचाही विलंब न करता लगेच पिशवी घेतली.

तो पिशाच्च रामा चा घास घेणारच की तितक्यात

ऋषीने गंगाजल पटकन त्या पिशाच्च वर उडवले,

ते पिशाच्च त्या गंगाजल च्या माऱ्याने जोरात ओरडत मागे फिरले.

तसा ऋषीने संधी साधून सोबत आणलेली तुळशीची माळ स्वतःच्या गळ्यात घातली आणि एक रामाला दिली.

ह्यामुळे त्यांना जरासा दिलासा आलेला.

ते दोघे उठले आणि ऋषीने सोबत आणलेला अंगारा पिशाच्च जवळ फेकत जाऊ लागले, तो सैतान जिवाच्या आकांताने ओरडत होता, 

त्याचा आवाज इतका भयानक होता की ती पूर्ण हवेली दणाणून निघत होती.

जसा तो अंगारा त्याच्या अंगावर पडत होता, तसा त्याच्या शरीरातून ठिणग्या उडत होत्या

तितक्यात रामाने बाजूला पडलेला रॉड घेतला त्याला गंगाजल आणि अंगारा लावून तो त्या सैतानाच्या छातीत घुसवला.

Horror Stories In Marathi – तो..| Storyteller Rushi

त्या सैतानाच्या छातीतून एक जोरात स्फोट झाला आणि तो पिशाच्च पूर्णपणे राखेत मिसळला.

जसा त्या सौतानाचा अंत झाला, ऋषि त्या कोपरयात पडलेल्या मृत शरीरांकडे गेला.

पण आता तिकडे काहीच नव्हते.

ऋषीने पटकन रामा ला पकडले आणि तिकडून आल्या पाऊली पळ काढला..

त्या दिवसांनंतर ऋषीने आजोबांना बोलावून तिकडे पूजापाठ करून ती हवेली कायमची बंद करून टाकली.

तेव्हापासून त्या हवेलीत परत असे काही प्रकार झाले नाहीत.

क्रमश…

तुम्हाला ही Horror Stories In Marathi bhaykatha no.8 – नदीच्या पलीकडे भाग 1

कशी वाटली हे comments करून आम्हाला सांगा. आशा आहे की तुम्हाला Horror Stories In Marathi – नदीच्या पलीकडे भाग 1 ही भयकथा आवडली असेल.

जर तुम्हाला हि Horror Stories In Marathi भयकथा – नदीच्या पलीकडे भाग 1 आवडली असेल तर तुम्ही तुमच्या friends सोबत social networks जसे की Facebook, google, twitter इत्यादी वर share करा.

तसेच Like करा आणि ह्या आणि अश्या बऱ्याच कथा Audible स्वरूपात ऐकायच्या असतील तर आपल्या Storyteller Rushi च्या YouTube Channel ला भेट द्या.तुम्हाला सुद्धा तुमच्या Horror Stories किंवा तुमचे horror experience आमच्या पर्यंत पोहचवायचे असतील तर Email : Storytellerrushi@gmail.com यावर mail करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply