Horror Stories In Marathi – आजची Marathi Bhaykatha no. 9 – नदीच्या पलीकडे भाग 2 हि कथा आहे.पुन्हा एकदा ऋषी आणि रामा तयार आहेत, नदीच्या पलीकडच्या हवेलीचा अखेरचा सोक्षमोक्ष लावायला.

Marathi Bhaykatha no. 9 – Horror Stories In Marathi – नदीच्या पलीकडे 2

रामा आणि ऋषि हवेलीचा सोक्षमोक्ष लावून परतलेले, पण दोघांना पण कुठेतरी खटकत होतेच,

रामाचे स्वप्न अजूनही त्याचे पाठलाग करत होते.

तो पिशाच्च तर गेलाच, पण आता पर्यंत त्या पिशाच्चाने त्याच्या अधीन केलेले सर्व जणं कुठे गेले,

इतक्या वर्षांपासुन ते तिकडे अडकलेले, गावकऱ्यांना सुद्धा त्यांचा काहीच पत्ता लागला नव्हता.

त्यात रामाचे बाबा सुद्धा तर होते.

ऋषिला रामाच्या मनातलं कळत होतं. एवढे वर्ष रामा शहरात राहत होता दोघांचा एकमेकांशी खूप कमीच काँटॅक्ट होता तरी सुद्धा ते लहानपणा पासूनचे पक्के मित्र होते.

लहानपणी एकमेकांच्या सोबत राहून बाकीच्यांच्या खोड्या काढ, कधी भांडण झाले तर एकमेकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणे. हे त्यांना लहानपणी पासूनच जमत होते.

आणि आता तेच संकट रामा वर येऊन ठेपले होते.

काहीही झाले तरी रामा इकडून परत शहरात जायच्या आत त्याच्या बाबांना शोधायला हवं.

देव जाणे, आपण गेलो, त्या सगळ्यांना सोडवले अणि योगा – योगाने ते सर्व जिवंत असावेत?

एकाच वेळी दोघांच्या पण मनात तेच विचार आले.

दोघे नदीकिनारी बसून त्या नदी पलीकडच्या हवेलीकडे शांततेत बघत होते.

“रामा, मी तुझ्या मनाची चल-बिचल जाणतो. प्रत्यक्षरीत्या मी तुझ्या जागेवर असतो, तरी माझ्या मनाला ह्या प्रश्नांनी खाल्लेच असते, जे आता तुझ्या मनात घर करू पाहतायेत”

Horror Stories In Marathi – नदीच्या पलीकडे 1| Storyteller Rushi

‘गोष्ट फक्त माझ्या बाबांची नाही रे, असे अजून किती तरी जीव तिकडे पडून असतील. भले आपल्या गावातल्या लोकांनी त्यांना खूप शोधून काढले.

पण तरी त्यावेळी कोणीच बाबांसोबत का नाही गेले?-

रामा रडलेल्या सुरात म्हणू लागला

“हे बघ रामा, तू शांत हो आधी. रडणं थांबव!.आपण एक काम करू. एकदा दिवसा जाऊ आणि बघून येऊ, आता तर तो पिशाच्च सुद्धा मेला आहे”.

‘तुला सांगू ऋषि. कॉलेज पासून जॉब लागेपर्यंत कधीच ह्या गोष्टींवर विश्वास ठेवला नव्हता, मी हॉस्टेल मध्ये राहतो. तिकडे तर कधी कधी एकटं सुद्धा रहावं लागतं. पण कधीच घाबरलो नाही मी.

पण अचानक एकाएकी हे संकट’

Horror Stories In Marathi – शेवटची रात्र | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – हौंटेड हायवे | Storyteller Rushi

“हो मी समजु शकतो रे. तू शहरात गेलास म्हणून काय मोठा तिर नाय मारलास ढेपण्या.

लहानपणा पासून एकत्र खेळलो, वाढलोत आपण.

त्या पाटलाच्या पोराला मारायला माझीच मदत लागली हे विसरू नकोस”.

‘नाही रे, मी कसा विसरेन. 

त्याच्या नंतर तू नदी मध्ये गेलेला तेव्हा घरी ओरडा पण मिच वाचवलेला तुझा हे पण नको विसरू’

“हम्मम. जुन्या आठवणी आठवल्या, की परत बालपणी मध्ये हरवून जावसं वाटतं”

‘एकदम माझ्या मनातलं बोललास बघ. मी शहरात गेलो खरं, पण आपल्या गावाला कधीच विसरलो नाही. आणि दर सुट्टी मध्ये इकडेच यायचा निर्धारच केलेला.

पण दर वेळी येताना एका चांगल्या उद्देशाने यायचो, इकडे येऊन एक प्रकारची शांतता, त्या शांततेत हरवून जावं.

आई आणि आर्या सोबत राहता यावं.

गाव फिरता यावं.जुन्या आठवणी जगता याव्यात.

पण ह्यावेळी हे भलतंच पाठीमागे लागलंय.

इकडून पळूनही जाता येत नाही, आणि दुर्लक्षही करता येत नाही’

“अरे रामा, तू बिलकुल टेन्शन नको घेऊ, जसं लहानपणी एकमेकांना साथ दिली तशीच आता ह्या वेळी पण द्यायचीय.

आणि माझा शब्द आहे तुला. काहीही झालं तरी इकडून तू परत जाशील तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा छडा लागलेलाच असेल आपल्या हातून”

ऋषिच्या ह्या वक्तव्या नंतर रामाच्या मनात सुद्धा आत्मविश्वास जागृत होत होता.

‘मी परवाच निघणार आहे, ऑफिसमध्ये पाहुणे येणार आहेत म्हणून. त्या आधीच आपल्याला काहीतरी करावं लागेल’

“मग एक काम करू, उद्या सकाळीच आपण जाऊ”

‘ठीक आहे, तू सकाळी नाश्ता करून तयार राहा. मी घ्यायला येईन, तिकडून जाऊ’

दिवस उजाडला.

दोघानाही किरकोळच झोप लागलेली.

ऋषिने लवकर उठून आधी तयारी केली.

सोबत अंगारा, गंगाजल आणि त्याच बरोबर एक पेरूच्या झाडाची काठी घेतली, तिचे एक टोक सुरीने टोकदार बनवले, जणू तो एक प्रकरचा भालाच होता.

रामा आला तसे दोघे जाण्यास निघाले.

ऋषीने जाण्याआधी एकदा देवाचे नामस्मरण केले.

चालत चालत हवेलीपाशी पोहोचले.

मनात किंचित भीती होतीच, पण काहीही करून त्याला आता हे स्वप्न थांबवायचे होतेच.

ऋषिकडे चावी होती.

Horror Stories In Marathi – झपाटलेलं रेल्वे स्टेशन | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – फोटो स्टुडिओ | Storyteller Rushi

दार जसा उघडला तशी सर्वत्र दुर्गंधी पसरली.

बाहेर सूर्यप्रकाश असूनही हवेलीत पुरेसा प्रकाश नव्हता.पण टॉर्च काढावी लागेल, एवढा पण अंधार नव्हता.

दोघांनी आधी पूर्ण हवेलीभर नजर फिरवली.

हवेली होती तशीच निर्जीव, जसे आधी सोडून गेलेले.

सगळीकडे धूळ साचलेली, भिंतींचे रंग उडालेले.

जास्त वेळ न दवडता दोघे किचन कडे वळले.

जसं त्यांनी किचन मध्ये पाऊल टाकलं, तसं दुर्गंधी जास्त वाटायला लागली आणि ती दुर्गंधी येत होती तळघरातुन.

मागच्या वेळी त्याच तळघरात त्यांनी त्या पिशाच्चाला मारलेले.

जसे ते तळघरात जाऊ लागले, तशी त्यांच्या मनात तीच अनामिक भिती पुन्हा एकदा जाणवू लागली. तळघरात वेगळ्याच प्रकारची थंडी वाजत होती.

अंगावर शहारे येत होते. त्या दोघांनी मन पूर्णपने घट्ट केलं आणि नजर चौफेर फिरूवू लागले.

पूर्ण तळघर पालथे घातले, पण कोणीच सापडले नाही.

फक्त जुन्या वस्तू, एक लाकडी खाट, जुने कपाट आणि एक मोडकळीस आलेली खुर्ची.

हताश होऊन दोघेही परत जाण्यास निघाले, कि तितक्यातच.

हिहीहीही ऽऽऽ

मागून अचानक पणे कोणाच्या तरी विक्षिप्त हसण्याचा आवाज आला.

दोघेही सावध झाले. 

एका झटक्यात त्यांनी मागे बघितले, त्या खाटेवरून एक सत्तरीच्या आसपासची म्हातारी त्यांच्याकडे पाहून हसत होती.

आता मात्र दोघांची बोबडी वळली.

दोघेही त्या थंडी मध्ये घामाघूम व्हायला लागले. तेवढ्यात ऋषिला हातातला अंगारा आठवला, त्याने तो म्हातारी समोर धारला, तशी म्हातारी तोंडावर हात ठेवत त्याच्यापासून लांब लांब सरकायला लागली आणि भिंतीत कुठे तरी गायब झाली.

ऋषीने लगेच रामाला घेऊन तिकडून पळ काढायचं ठरवलं. ते जसे दरवाज्या पर्यंत पोहोचले, तितक्यात त्यांच्या तोंडावरच दरवाजा धप्प आवाज करत बंद झाला.

आणि पूर्ण तळघरात घुमू लागला फक्त हसण्याचा आवाज, आता हा आवाज कोणा एकाचा नसून, खुप जणांचा होता,

कर्णबधिर करणारा आवाज होता. दोघेही खूप घाबरले, दरवाजा ठोठावु लागले, दरवाज्यावर मारू लागले. पण ह्याचा काहीच फायदा नव्हता.

मागे वळून बघितलं तर आता तिकडे ६ मानवरूपी पिशाच्च त्यांच्याकडे बघून क्रूरतेने हसत होती.

पण ऋषिला माहीत होतं, जो पर्यंत ही दैविक सामग्री आपल्याकडे आहे तोपर्यंत ते आपल्याला काहीच करू शकत नाहीत.

त्या पिशाच्चाने सर्वांनाच त्याच्या सारखे बाधित करून टाकलेले.

ऋषिचं लक्ष रामाकडे गेलं. रामा शांतपणे एकटक त्या पिशाच्चानकडे पाहत होता.

त्या ६ जणांपैकी एक रामाचे बाबा पण होते.

“रामा, अरे शुध्दी वर ये, ते तुझे बाबा नाहीयेत, आपण ज्या पिशाच्चाला मारले, त्याने ह्या सर्वांना त्याच्या सारखे बनवले आहे, आणि आता आपल्याला इकडून बाहेर पडायचंय”

ऋषिने गंगाजल घेतलं आणि त्या पिशाच्चानसमोर फेकले, ते सर्व जण २ पाऊल मागे सरकले.

‘बघ. आता तरी बसला विश्वास, आता हे घे अंगारा, आणि इकडून बाहेर जाण्याचा रस्ता शोधू’

ते पिशाच्च ऋषीच्या गंगाजलाने किंचाळत मागे गेले तसा रामा शुद्धीवर आला आणि ऋषिने दिलेला अंगारा घेतला.

ऋषिने परत एकदा गंगाजल त्यांच्यावर फेकले, तसे सर्व पिशाच्च सैरभैर होऊ लागले, 

हीच संधी साधून ऋषि पायऱ्या उतरून तळघरात गेला, जेणेकरून बाहेर जायला काहि अजून मार्ग सापडतोय का.

ऋषि दरवाजा शोधतच होता की तेवढ्यात त्याला मागून जोरदार धक्का दिला. तो बाजूच्या खाटेवर जोरात जाऊन आपटला.

त्या धक्क्याचा प्रहार इतका जास्त होता, की जर खाटेच्या जागी भिंत असती, तर ऋषिला जबर मार बसला असता.

त्या धक्क्यामुळे ऋषीच्या हातातले गंगाजल सुद्धा खाली पडून सांडून गेलेले.

ज्या पिशाच्चाने त्याला धक्का दिलेला, तो आता त्याच्याकडे झेपाऊ लागला. त्याचा चेहरा खूप विक्षिप्त होता, त्याचे तीक्ष्ण दात, आणि त्या दातातून येणारा दुर्गंध, एकूणच तो प्रसंग खूप भयावह होता.

ऋषि खाटेवरच एक एक इंच मागे जाऊ लागला, तो सैतान ऋषिकडे येऊ लागला, की तितक्यातच रामाने त्याच्या हातातला अंगारा त्या सैतानावर उडवला.

सैतान जोरात किंचाळी मारत मागे सरकला, आणि त्याच्या अंगातून ठिणग्या उडत तो नाहीस झाला.

हीच संधी साधून ऋषि तिकडून पळत सुटला, एव्हाना अचानकपणे त्या तळघराचा दरवाजा उघडला गेला.

दोघांना ह्यामुळे हायसं वाटलं, ते तळघरातुन बाहेर येऊन, हवेलीच्या बाहेर जायला निघाले पण हवेलीच्या दरवाज्यासमोर परत तेच सैतान त्यांची वाट अडवून होते.

आता मात्र सर्व स्पष्टपणे दिसत होते.

ते ५ जण होते.सर्वांची उंची वाढलेली, हात जमिनीला टेकतील एवढे.चेहऱ्यावरच्या सुरकुत्या लांब लांब लोंबकळलेल्या. आणि तोंडातून बाहेर येणारे घाणेरडे दात. त्यादिवशी मारलेला जो यांचा प्रमुख होता तसेच सर्व जण होते,

ते दृश्य कोणत्याही कमजोर माणसाला हृदयविकाराचा झटका द्यायला पुरेसं होतं.

ऋषि आणि रामा मात्र निडर होते, पण एकसाथ एवढे सर्व बघून त्यांच्या मनात सुद्धा भीती बसलेली.

त्यातले दोघे जण ऋषि आणि रामा वर धावत आले तसं ऋषीने हातातला काठी रूपी भाला त्या एका सैतानच्या छातीतुन आरपार केला.

ते सैतान भयानक किंचाळी देऊन हवेत विरून गेले.

Horror Stories In Marathi – शौर्यकथा – वाडा | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – तो..| Storyteller Rushi

दुसऱ्या सैतानाने रामा वर धाव घेतलेली, रामाने क्षणाचाही विलंब न करता त्याच्या हातातले अंगार त्या सैतानावर फेकले,

ते सुध्दा मोठी किंचाळी देत हवेत नाहीसे झाले.

हे बघून राहिलेले पिशाच्च अजूनच संतापले, ते लागलीच दोघे त्यांच्यावर धावून गेले, 

ऋषि ने परत त्याच्या समोर भाला आणला, पण ह्यावेळी त्याने भाला चुकवत ऋषिला जोरात धक्का दिला.

ऋषी खाली पडला,

त्याच्या पायाला जबर मार बसला.

हीच संधी साधून त्या राक्षसाने ऋषि वर जीवघेणी उडी मारली, पण तितक्यातच त्याने भाला त्या राक्षसाच्या दिशेला ठेवला. राक्षसाची उडी थेट भाल्याच्या टोकावर. आणि त्या राक्षसाच्या चिलकांड्या उडाल्या.

दुसरीकडे रामाच्या अंगावर एका सैतानाने धाव घेतली, रामाने परत त्याच्यावर अंगारा टाकला, तो पिशाच्च कर्णकर्कश आवाजात हवेत मिसळला.

आता शेवटचं पिशाच्च होतं, ते म्हणजे रामाचे बाबा.

‘बाळा, अरे मी तुझा बाबा आहे,. तू मला मारणार’

रामाच्या बाबांच्या रुपात असलेले भूत रामाला विनवत होते..

पण ऋशीला समजले,

“अरे रामा, ते तुझे बाबा नाहीयेत, तो पिशाच्चच आहे,

आपण मागे ज्या सैतानाला मारला त्यानेच ह्या सगळ्यांना मारून त्याच्या सारखं केलेलं.

आता आपल्याला जे काही दिसतंय, ते त्या पिशाच्चानी केलेलं मायाजाल आहे,

ह्या मायाजालात अडकू नकोस, त्या सैतानाला मार आणि तुझ्या बाबांना मुक्त कर”

ऋषि रामाला पूर्ण जोर लावून समजावत होता.

त्याच्या हातातला अंगारा पण संपत आलेला, एक शेवटची मूठ होती.

ते सैतान जवळ येत होते..

पण रामाचे हात हालतच नव्हते. जसं काय त्या पिशाच्चाने रामाला वश मधेच केलेलं..

“अरे रामा ऊठ, जागा हो. ते तुझे बाबा नाहीयेत.

शेवटची मूठ राहिली अंगाराची, ती सर्व फेक त्या पिशाच्चावर आणि मुक्ती दे तुझ्या बाबांना”.

पण तरी रामाच्या चेहऱ्यावर काहीच हावभाव नव्हते.

ते पिशाच्च रामाजवळ आले, तसे त्याने त्याचे दोन सुळ्यांसारखे दात बाहेर काढले, आणि रामाचा घास घेणारच, की तितक्यात जोरात किंचाळी देत ऋषि धावत जाऊन त्या रक्षसाच्या अंगावर झेपावला.

ऋषीच्या हाताला राक्षसाचे सुळे लागले, दोघेही खोलीच्या कोपऱ्यात जाऊन पडले.

त्या प्रसंगाने रामा शुध्दीवर आलेला.

त्याने क्षणाचाही विलंब न करता त्या सैतानावर शेवटचा अंगारा उडवला.

मोठया ठिणग्या उडाल्या आणि जिवाच्या आकांताने ओरडत ते राक्षस राख बनून गेले.

रामाने धावत जाऊन खाली पडलेल्या ऋषीला उचलले.

ऋषीने एक धक्का देत रामाला बाजूला केले.

“मला हात नको लावुस रामा, मी सुद्धा आता बाधित आहे. त्या सैतानाने त्याचे सुळे माझ्यात घुसवले”

‘तुला काहीच नाही होऊ देणार, आताच्या आता ऊठ तुला डॉक्टर कडे घेऊन जातो’

“काही फायदा नाही रामा, माझ्याकडे जास्त वेळ नाहीय. मला माझ्या मध्ये बदल जाणवू लागले आहेत. तुझ्याजवळचा अंगारा पण संपला आहे.तो भाला घे आणि माझ्या छातीत मार”

रामाच्या डोळ्यात रडू कोसळले

‘नाही ऋषि मी तुला काहीही होऊ देणार नाही’

ऋषीच्या शरीरात बदल होऊ लागले, त्याचे दात एकाएकी सुळ्यांसारखे वाढू लागले

“रामा ऐक माझं, माझ्याकडे जास्त वेळ नाहीय.

तो भाला घे, मी सैतान मध्ये बदललो तर खूप मुश्किल होऊन जाईल तुला आणि गावाला वाचवणे, आपण आपला हेतू पूर्ण केला, यातच मला आनंद आहे”

रामाने खूप समजावले पण शेवटी ऋषीच्या पुढे त्याचे नाही चालले काही.

रामाने डोळे मिटून एका जोरात किंचाळीने भाला ऋषीच्या छातीतून आरपार केला.

हवेली आता पिशाच्च मुक्त होती.

रामाने गावात येऊन सर्वाना हकिकत सांगितली.

ऋषीच्या घरच्यांच्या सांगण्यावरून ती हवेली कायमची पाडण्यात आली.

रामा परत शहराकडे जायला निघाला.

आता त्याचे सर्व स्वप्न बंद झाले.

आजही रामा त्याच्या बाबांच्या फोटो शेजारी ऋषीचा फोटो आवर्जून लावतो.

Horror Stories In Marathi – अखेरचा प्रवास | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – द लास्ट शिफ्ट | Storyteller Rushi

तुम्हाला ही Marathi bhaykatha no.9 – Horror Stories In Marathi – नदीच्या पलीकडे 2

कशी वाटली हे comments करून आम्हाला सांगा. आशा आहे की तुम्हाला Horror Stories In Marathi- नदीच्या पलीकडे भाग 2 ही भयकथा आवडली असेल.

जर तुम्हाला हि Horror Stories In Marathi – नदीच्या पलीकडे 2 आवडली असेल तर तुम्ही तुमच्या friends सोबत social networks जसे की Facebook, google, twitter इत्यादी वर share करा.

तसेच Like करा आणि ह्या आणि अश्या बऱ्याच कथा Audible स्वरूपात ऐकायच्या असतील तर आपल्या Storyteller Rushi च्या YouTube Channel ला भेट द्या.तुम्हाला सुद्धा तुमच्या Horror Stories किंवा तुमचे horror experience आमच्या पर्यंत पोहचवायचे असतील तर Email : Storytellerrushi@gmail.com यावर mail करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply