horror stories in Marathi – Marathi Bhaykatha 20 – पिंपळावरची हडळ कथा आहे.आजची भयकथा हि भय अनुभव Related कथा आहे.ही कथा  माझ्या एका मैत्रिणीने सांगितलेली खरी घटना आहे, तिच्या गावामध्ये तिच्या सोबत घडलेली सत्य घटना.

Marathi Bhaykatha no. 20 -पिंपळावरची हडळ (Horror Stories In Marathi)

स्थानाचे किंवा गावाचे नाव मी काही कारणास्तव सांगणार नाही, जिने मला हे अनुभव सांगितले तीचीच ही मागणी. कारण अजूनही असे अनुभव लोकांना तिकडे येतात.

काही जागाच अश्या असतात जिकडे रात्री अपरात्री चुकूनही भल्या माणसाने पाऊल ठेवू नये.

ह्या घटनांची सुरुवात कशी झाली, हे सांगता यायचं नाही,

भुतांसाठी कुप्रसिद्ध अशी ती जागा, जागा म्हणण्यापेक्षा तो तेवढा रस्ता, किंवा तेवढा इलाका. नक्की काय होतं त्या रस्त्यामध्ये, ज्या रस्त्याची इतकी चर्चा सदा-सर्वदा लोकांच्या शब्द न शब्दांमधून बाहेर पडत होती.

काही जण म्हणतात तिकडे खूप वर्षाआधी पिंपळाच्या झाडावर एका बाईने सासरच्यांना कंटाळून स्वतःला फास लावून घेतला,

तर काही म्हणतात तिकडे एके काळी एका बाईकचा अक्सिडेंट झालेला तेव्हापासूनच ‘ती’ (हडळ की चेटकीण?) सगळ्यांना दिसते.

प्रत्येकाची आपापली मते आणि भाकिते आहेत, पण ह्या मागचे सत्य काय, देवच जाणो.

तिच्या सोबत घडलेल्या प्रसंगाची सुरुवात झाली जेव्हा गावात ज्योतिबाची जत्रा भरली होती.

जत्रा म्हटलं की साहजिकच जत्रेमधल्या त्या सर्व गमती-जमती आल्याच.

दिवसा गावजेवण असतं आणि संध्याकाळी भजन- कीर्तन ह्यांनी गाव भरून निघतं.

एकदा कीर्तन संपलं, की मग पुन्हा रात्रीच जेवण आणि जत्रेला सुरुवात.

खेळण्याची, पाळण्यांची दुकाने, छोटे मोठे स्टॉल ह्या सर्वांनी गाव गजबजून जातं, इतकंच काय लांब लांबच्या गावातून सुद्धा ह्या जत्रेत भाविक येत असतात.

मग ही जत्रा रात्री १२-१ कितीही वाजेपर्यंत चालू असते.

जाधवांची आरती तिच्या तीन मैत्रिणी पूजा, सुखदा आणि रक्षा सोबत जत्रे मधून रात्री उशिरा घरी येत होती.

Horror Stories In Marathi – अंधार | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – षंढ | Storyteller Rushi

रात्री ११ चा सुमार, आज जरा जास्तच उशीर झालेला म्हणून तिघीही जितक्या लवकर जमेल तश्या चालत होत्या.

त्या चौघींचा रस्ता हनुमान मंदिराच्या पाठीमागून उजव्या हाताला मोठा वळसा घालून त्या पिंपळाच्या झाडाजवळून जात होता.

संपूर्ण गावामध्ये ह्या झाडाविषयी व तिकडच्या रहस्यां विषयी एकतर नवीन रहिवासी किंवा पाहुणे ह्यांनाच माहिती नव्हती. बाकी पूर्ण गावाला माहीत होतं.

ह्या चौघी मैत्रिणी सुद्धा त्या गोष्टीबद्दल अनभिज्ञ नव्हत्या.

घरच्यांनी वारंवार बजावून देखील आज खूप उशीर झालेला.

“मी बोललेले ना लवकर निघायला, किती उशीर करता तुम्ही सगळीकडे” आरती तिच्या मैत्रिणींना म्हणाली.

‘आमच्यावर काय ढकलतेस, तू पण टाईमपास च करत होतीस’ सुखदा म्हणाली

“अरे बायांनो घरी भांडा हवं तेवढं, आधी इकडून चला”

सगळ्या पटापट चालू लागल्या.

हनुमान मंदिराच्या आवारात पोहोचेपर्यंत सोबत जत्रेतून घरी जाणारी मोजकी मानसे सोबत होती.

मंदिर सोडून पुढे आल्यावर त्यांना पहिल्यांदाच भयाची गडद आणि पारदर्शक अशी जाणीव झाली.

या रस्त्याला त्यांच्या सोबतीला कोणी नव्हते,

रस्त्यावरचा अंधार आणि त्या अंधाराला चिरून जाणारी भयाण शांतता मनातल्या भीतीला खतपाणी घालण्याचे काम करत होते.

भीती तर चौघींच्या मनात दाटून आलेली, पण कोणी बोलून नव्हते दाखवत. वयाने लहान असल्या, तरी अश्या बेताच्या परिस्थितीत स्वतःच्या मनातली भिती सांगून समोरच्यांचे मनोधैर्य खचवण्याचे काम त्यांच्यापैकी कोणीही करणार नव्हते.

Horror Stories In Marathi – अखेरचा प्रवास | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – द लास्ट शिफ्ट | Storyteller Rushi

जसे ते पिंपळाच्या झाडाजवळ येऊ लागले, तसं पूजाने भीती जाण्यासाठी सहजच गाणी गुण-गुणायला सुरुवात केली.

काही वेळच गाणी गुणगुणले असेल, की तातडीने तिने ते बंद केले, तिच्या कानाजवळ कोणीतरी तेच गाणी वेगळ्या आवाजात गुणगुणन्याचे तिला भास झाले.

लागलीच तिने बाकीच्या मैत्रिणींना विचारले, तुम्ही कोणी माझ्या सोबत आता गाणं गुणगुणत होता का?

पण सगळ्यांनी नकारात्मक मान हलवली.

आता सगळ्यांच्या लक्षात ती गोष्ट यायला उशीर नाही लागला.

तरीही त्यांनी धीर सोडला नाही, आणि कोणीही ह्याची वाच्यता एकमेकींसमोर केली नाही.

पिंपळाच्या झाडा जवळ जाताच सगळ्यांना कोणाच्यातरी रडण्याचा सौम्य आवाज येऊ लागला.

आवाज कोणा बाईसारखा होता.

आता मात्र सगळ्यांची घाबरगुंडी उडालेली, त्या चौघीजणी जवळ जवळ धावतच तिकडून जाऊ लागल्या.

पिंपळाच्या झाडापासून पुढे आल्या, तिकडून एक उजव्या बाजूला वळण आहे, तो वळण घेऊन जीव मुठीत ठेऊन वाट मिळेल तिकडे पळत सुटल्या.

त्यांचं त्यांनाच भान राहिलं नव्हतं की त्या कुठे चालल्यात.

खूप अंतर धावून शेवटी पायातले त्राण गेले, तेव्हा त्यांचा वेग मंदावला, हृदयाची धडधड तर तेवढ्या भयाण शांततेत अजूनच भीतीदायक वाटत होती.

थोडा वेळ उभ्यानेच विश्रांती घेण्यासाठी त्या एका बाजूला थांबल्या.

त्यांना थांबून काही सेकंदच झाले असतील, की पुन्हा एकदा, थोड्या जवळून कोणाच्या तरी रडण्याचा आवाज आला.

आता मात्र त्या पुरत्या घाबरून गेलेल्या, आवाजाच्या दिशेने त्यांनी एक कटाक्ष टाकला तेव्हा त्यांना लक्षात यायला वेळ नाही लागला, की ही तीच मगासची जागा होती, आणि हा तोच पिंपळाचा झाड.

आताच मगाशी हा झाड आपण पार केलेला, पुन्हा आपण तिकडेच कसे काय आलो?

पण ही वेळ विचार करण्याची नव्हती.

उरले सुरलेली सर्व शक्ती पणाला लावून त्यांनी परत तिकडून धूम ठोकली. काय चाललंय, काहीच समजायला मार्ग नव्हता.

जत्रेत चोरी जाण्याच्या भीतीने कोणी मोबाईल देखील सोबत आणले नव्हते, की फोन करून घरी कळवता तरी आलं असतं.

सर्व जणी मागच्या दहा मिनिटांत त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्यात भयानक प्रसंगाला सामोरे जात होते.

शेवटी पायातले त्राण पूर्णपणे निघून गेल्यावर पुन्हा एकदा एका रस्त्याच्या कडेला त्या थांबल्या पण तो विचारही त्यांना जास्त काळ ठेवता आला नाही.

कारण पुन्हा एकदा त्या जिकडे थांबलेल्या ते तेच झाड आणि तोच रस्ता.

आता मात्र त्यांना कळून चुकलं, की आपल्याला चकवा लागलेला आहे.

चकवा बद्दल त्यांच्या पैकी आरती आणि पूजा ह्या दोघींनाच माहीत होतं.

Horror Stories In Marathi – दिघाटी रोड | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – भानगड | Storyteller Rushi

काय करावे, कुठे जावे, काही कळत नव्हते, आणि त्यात अश्या संकटसमयी मनाची पकड पुर्णपणे सैल होऊन जाते, कोणतेच सद्विचार मनात येत नाहीत ना कोणते उपाय सुचतात.

त्यांच्या सर्वांमध्ये समजूतदार आरती, तीने मात्र अश्या परिस्थिती मध्ये सुद्धा मन स्थिर ठेवले, आणि त्यांचं आयुष्य बदलावणारा एक धाडसी निर्णय घेतला.

पुढे काही आवाज किंवा अनाहूत घडायच्या आतच ती मैत्रिणींना घेऊन आहे तिकडून माघारी फिरली.

जाता जाता तिने ह्याचे कारण त्यांना सांगितले.

चकवा लागतो तेव्हा सर्व माणसे पूढे जातात, जात राहतात आणि चकवा बसत जातो, कारण ज्यांनी हा चकवा बसवलेला असतो त्या आत्म्यांना किंवा त्या नकारात्मक शक्तींना आपण पूढे जाऊन ह्या चकव्यामध्ये फसत जावे हेच हवं असतं.

जर ह्या वाटेत त्यांच्यासोबत चमत्कार झाला, तरच ते ह्याच्यातून बचावतात, पण त्यातही खूप कमी जणांना हे भाग्य लाभतं.

जास्तीत जास्त लोकं तर ह्या मायाजालामध्ये फसतच जातात.

आपणही दोन वेळा हीच चुक केली.

मग मनात विचार आला, आपल्याला पुढे जाऊन काहीच साध्य होणार नाही आपण अजूनच ह्यात अडकत जाऊ, कदाचित पूर्ण रात्रभर सुद्धा.

पण जर पाठीमागे वळलो तर मागे देवाचा मंदिर आहे, कमीत कमी तिकडे आपल्याला हा चकवा नाही बसणार.

आणि झालेही तसेच, आरतीचं हे बेत यशस्वी झाले देखील.

पाठी मागे डाव्या बाजूने एक वळसा घालून हनुमानाचे ते दिव्य मंदिर दिसले.

या आधी कितीतरी वेळा ह्या मंदिरामध्ये गेलोय, पण आज ह्या मंदिराचे पावित्र्य जरा जास्तच भासत होते.

“बुडत्याला काठीचा आधार” ह्या म्हणीप्रमाणे आता त्यांच्या समोर उभ्या ठाकलेल्या जीवघेण्या संकटासमोर हा मंदिर जणू त्यांना एक नवसंजीवनी सारखा भासत होता.

सगळ्यांच्या मनात एकच विचार चमकला, आजची रात्र इकडेच काढायची, दिवस उजाडून थोडी वर्दळ जाणवली, किच बाहेर पडायचं.

ती रात्र त्यांनी त्याच मंदिरात जागून घालवली,

असे एकामागोमाग भयाण प्रसंग घडल्यावर झोप कोणाला येईल?

सकाळी घरी जाऊन त्यांनी ही घटना सांगितली.

आणि तेव्हापासून ते कधीच रात्रीच्या वेळी बाहेर पडले नाहीत.

Horror Stories In Marathi – फोटो स्टुडिओ | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – शौर्यकथा – वाडा | Storyteller Rushi

तुम्हाला ही Marathi bhaykatha no. 20 – पिंपळावरची हडळ

कशी वाटली हे comments करून आम्हाला सांगा. आशा आहे की तुम्हाला Horror Stories In Marathi- पिंपळावरची हडळ ही भयकथा आवडली असेल.

जर तुम्हाला हि भयकथा – पिंपळावरची हडळ आवडली असेल तर तुम्ही तुमच्या friends सोबत social networks जसे की Facebook, google, twitter इत्यादी वर share करा.

तसेच Like करा आणि ह्या आणि अश्या बऱ्याच कथा Audible स्वरूपात ऐकायच्या असतील तर आपल्या Storyteller Rushi च्या YouTube Channel ला भेट द्या.

तुम्हाला सुद्धा तुमच्या Horror Stories किंवा तुमचे horror experience आमच्या पर्यंत पोहचवायचे असतील तर Email : Storytellerrushi@gmail.com यावर mail करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply