Horror Stories In Marathi & Konkan horror stories – आजची हि Marathi Bhaykatha no. 6 – षंढ हि कोकणात घडलेली horror story आहे.

Marathi Bhaykatha no. 6 – षंढ (Horror Stories In Marathi)

(फोन च्या अलार्म चा आवाज)

“हॅलो कोण बोलतोय” “हॅलो?”  “हॅलो?” अरे ह्याच्या तर आता… फोन च्या रिंगटोन ची आणि अलार्म ची टोन एकच ठेवल्यावर हा प्रॉब्लेम…

अलार्म वाजला तरी असं वाटतं कोणीतरी कॉल केलाय…

जाऊ दे…

अरे बापरेऽऽऽ ही अलार्म ची तिसरी टोन,

आज खुपच उशीर झालेला…

कसा बसा उठून, सर्व तयारी करून कॉलेज ला जायला निघालो… आज माझा शेवटचा पेपर आणि शेवटचा दिवस सुद्धा…

होय ! आज माझ्या अभियांत्रिकी शिक्षणाच्या ४ वर्षांच्या मोठ्या प्रवासामधला अखेरचा दिवस…

पण त्यात शेवटच्या पेपर ला सुध्दा वेळ झाला उठण्यामध्ये,

काल जरा जास्तच वेळ झाला झोपायला…

अभ्यास करता करता वेळ कसा जातो कळतंच नाही.!

“अरे काहीतरी खाऊन तरी जा”

घरातून बाहेर पडताना आईचा आवाज घाईमध्ये असलेल्याला मला ऐकून ना ऐकल्यासारखा झाला…

नशिबाने का होईना पण परीक्षेला वेळेवर पोहोचलो…

                         ______

Horror Stories In Marathi – त्या भयाण रस्त्यावर | Storyteller Rushi

Horror Stories in Marathi – द क्रिटिकल केस | Storyteller Rushi

पेपर संपला… पेपर सोप्पा गेला ह्या पेक्षा जास्त आनंद हा शेवटचा पेपर, ह्याचा होता… एक शेवटची गळा भेट आणि नियमित पुनर्भेटिंचे वचन देऊन एकमेकांना निरोप दिला…

पेपर संपवून घरी आलो…

“मग कसा गेला पेपर?”-आई

“सुटलो गं एकदाचा तेवढंच बस आहे.! आता निकाल यायची वाट बघायची फक्त…”-मी

“पण आई, तुला एक विचारायचं आहे… तसंही मला आता सुट्टी पडलेली आहेच… इतक्या वर्षांच्या मोठ्या प्रवासामध्ये क्वचितच कुठे तरी गेलो असेन नाही?

ते सुद्धा आता आठवत नाही,,, गेलो असेन पण तेही तात्पुरतेच आणि त्यामध्ये ह्या शेवटच्या वर्षाला तर कुठेच गेलो नाही फिरायला…

शेवटचं वर्ष म्हणून अजिबात रिस्क नाही घेतली खास करून अभ्यासाच्या कारणामुळे…

पण या वेळी मात्र विचार केला की काही दिवस आपल्या गावालाच जाऊन येतो आणि कोकणात जायला कोणाला नाही आवडणार, नशिबाने आपल्याला ते गावंच लाभलंय”

“मस्तच! मी सुद्धा तुला हेच सांगणार होते, पण अगदी मनातलं ओळखलंस बघ… तू ये जाऊन…तुझं मन तरी रमेल तिकडे… मनमोकळं राह आणि काका काकींना मदत सुद्धा कर बिचारे एकटे आहेत ते”

” हो नक्कीच! मग मी लगेचंच उद्याची तिकीट काढतो आणि तयारीला लागतो”

झालं एकदाचं पक्क!

रात्रीची ट्रेन होती, अर्धा तास आधीच स्टेशन वर पोहोचलो…

ट्रेन मध्ये गर्दी दिसत होती… असणारच म्हणा! मे महिन्याची सुट्टी होती…

ट्रेन मध्ये बसलो… डोळ्या समोर आता फक्त गाव दिसत होतं…तिकडचे नयनरम्य निसर्ग, त्यामध्ये काका काकीचं घर, अथांग समुद्र, गावाकडचे बालपणीचे सर्व मित्र आणि माझी मैत्रिण संगीता, आम्ही सर्वजण लहानपणी एकत्र खेळलेलो, एकत्र वाढलेलो…

ते दिवसंच अवर्णनीय होते आणि आता तब्बल ६ वर्षांनी गावाला जात होतो…

ट्रेन अंधाराला चिरत जलदगतीने गावाकडे मार्गक्रमण करत होती…

गावातल्या आणि बालपणीच्या रम्य विचारात मला झोप कधी लागली कळलेच नाही…

झोपेत असतानाच, एकाएकी कानांवर टाळ्यांचा आवाज यायला आला… एवढी शांत आणि मनाला सुखावणारी झोप क्वचितच कधीतरी लागते… आणि त्यात पण हा डिस्टर्बन्स नॉइस…

कितीही झालं तरी माझ्यात डोळे उघडायची कणमात्र क्षमता नव्हती… झोपेची गुंगी ही बाहेरच्या आवाजापेक्षा जास्तच होती… पण तो टाळ्यांचा आवाज इतका तीव्र होता की कानावर हात देण्यापलीकडे दुसरं काहीच करू शकत नव्हतो… जणू आजूबाजूला अंधाराचे वावटळ पसरलेले आहे आणि त्या अंधाराच्या गर्तेत मी ओढत चाललेलो आहे…

काही वेळाने एकाएकी तो टाळ्यांचा आवाज इतका तीव्र झाला की ते सहन करण्यापलीकडे गेले…

डोकं पूर्णपणे चक्रावून गेलेलं, कान बधिर व्हायच्या मार्गावर होते…

हात कानावर घट्ट पकडून एक जोरदार किंचाळी मारत उठणारच होतो, की तितक्यात तो आवाज यायचा बंद झाला… क्षणभरासाठी हायसं वाटलं पण लागलीच पाठी वर कुणीतरी हाताने जोरात थाप मारली…

त्या हाताच्या प्रहारा मध्ये इतका जास्त जोर होता, की पाठ त्या प्रहाराला सहन करू शकली नाही आणि काही क्षणांसाठी थाप मारलेली जागा बधीर झाली…

डोळे उघडले, आजू बाजूला बघितलं तर सर्व त्यांच्या त्यांच्या साखरझोपेत रम्य होते…

ना कुठे टाळ्यांचा आवाज होता आणि नाही कोणी जागं होतं जे पाठीवर मारू शकेल…

कदाचित स्वप्न असेल असं विचार करून परत झोपेचा प्रयत्न करत होतो, पण झोप यायचे काहीच लक्षण दिसत नव्हते…

खिडकी मधून बाहेर बघितले, सर्वत्र अंधार होता…

ट्रेन कोणत्या तरी स्टेशनवर काही क्षणांसाठी थांबलेली…

बाहेर जाऊन तोंडावर पाण्याचे शिंतोडे मारून परत जागेवर येऊन बसलो…

झोप यायला काही मार्ग दिसत नव्हता तेव्हा शेवटी मोबाईल काढून गाणी ऐकत झोपायचं प्रयत्न केला…

खूप वेळानंतर झोप आली…

डोळे उघडले तेव्हा सकाळ झालेली आणि माझं स्टेशन सुदधा आलेलं…

काका काकूंना कळवलं नव्हतं कारण त्यांना थोडंसं अचंबित करायच होत…

जसजसं गावामधून आमच्या घरी जात होतो तसतसं गाव अजूनच मनाला लोभत होतं… आजूबाजूला गर्द झाडी आणि त्या झाडांच्या सवलीमधून जाणारा रस्ता… रस्त्यांवर पडलेला करवंद, जांभळांचा सडा, झाडांवरून पक्ष्यांची किलबिल, पोपटांची मीठू मीठू, कोकिलेचे मधूर कुंजन…

जणू अस वाटत होतं की गाव निसर्गाच्या रूपाने माझ्या स्वागतासाठीच उभा आहे…

गावाच्या वेशीपासून काकांच घर फारतर अर्ध्या मैलावर होतं…

अखेर काकांच्या घरी पोहोचलोच…

Horror Stories In Marathi – तो..| Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – खेकडा? की | Storyteller Rushi

कौलारू घर,… घरा बाहेर स्वछ केलेले अंगण…आजू बाजूला आंब्याची झाडे… असे हे निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेले काकांचे घर मन मोहून टाकणारे होते…

घरा जवळ पोहोचताच काका काकी दारातच उभे होते दोघांच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता…

मी- ” कसे आहेत काका काकू?”

काका- “आम्ही मजेतच! तू कसा आहेस?”

मी – “मी सुद्धा मजेत ! पण तुम्हाला कसं माहीत, की मी येणार आहे ते? मी तर काही कल्पना सुद्धा दिली नव्हती”

काका- “अरे तुझ्या बाबांचा आताच फोन येऊन गेला की तू पोहोचला का विचारायला तुझा फोन बंद लागला म्हणून”

मी- “ठीक आहे मग! फोन बंद नव्हतं, काल गाणी ऐकत असताना चार्जिंग संपून बंद पडला असेल”

काकी- “बरं जाऊ दे.! तू आत ये आधी आणि अंघोळ करून ये… दमला असशील,  तोपर्यंत मी आपल्या साठी खायला करते”

मी बाथरूम कडे वळलो… प्रवासाचा क्षीण स्नान करूनच जाणार होता…

पूर्ण फ्रेश होऊन आल्यावर काकींनी बनवलेल्या घावनांवर मस्तपैकी ताव मारला…

काका- “काय मग! कसा झाला प्रवास आणि कसं वाटतंय इतक्या वर्षांनी गावामध्ये येऊन?”

मी- “प्रवास एकदम मस्त झाला! आणि आपल्या गावाबद्दल तर काय सांगायचे… जे सांगू तेवढं कमी आहे… स्वर्ग सुध्दा फिके पडेल… इतक्या वर्षांनी आलोय आता मस्त मज्जा करूनच जाईन”

काकी- “आता आला आहेस तर खाऊन पिऊन आराम कर मस्त , मग संध्याकाळी काका तुला गाव फिरवून आणतील आणि जवळच समुद्र सुद्धा फिरून या”

जेवनानंतर निपचित पडलो, प्रवासाच्या थकव्याने झोप सुद्धा लगेच लागली…

उठलो तेव्हा संध्याकाळ झालेली, काका तयारच होऊन बसलेले…

मी सुद्धा उठलो आणि तयार होऊन गाव बघायला गेलो…

६ वर्षां आधीच्या आणि आताच्या गावामध्ये फारसा फरक जाणवत नव्हता… शहाराकडची हवा इकडे तर बघायला सुद्धा मिळत नव्हती… त्यामुळेच गावाला गावपण अजूनही होते…

गाव बघून झाल्या नंतर समुद्रकिनारी गेलो…

समुद्राच्या लाटांचा मनाला भुरळ पाडणारा आवाज, त्यात आजुबाजुची निरव शांतता… माझ्या सारख्या निसर्गप्रेमिला ही एक सोन्याची पर्वणीच होती…

थोडं वेळ तिकडेच राहावं अस विचार करून काकांना निरोप दिला…

काका घराकडे वळले पण मी तिकडेच थांबलो थोडं अजून निसर्गामध्ये हरवून जायला…

गावामध्ये जास्त राहिलो नसलो तरी कधीही इकडे आलो तरी गावाचा आणि माझा जन्मोजन्मीचा संबंध आहे असंच वाटायचं…

स्वतःच्याच विचारांमध्ये गुंग होतो, कि तितक्यात पाठीवर कोणाचातरी हात पडला…

पाठी मागे बघितलं तर ती संगीता होती… आता किती मोठी झालेली…

“कधी आलास?”

“आज सकाळीच आलो, मगाशी गाव फिरलो आणि आता समुद्र किनाऱ्यावर आलो थोडंसं मन रमवायला…

तू सांग ना तू कशी आहेस? काका काकू कसे आहेत?, आणि किती वर्षांनी भेट होते… किती बदलली आहेस तू”

“मी बरी आहे आणि आई बाबा सुद्धा मस्त आहेत…

तुझं झालं का सर्व शिक्षण पूर्ण? आणि आता पुढे काय विचार केलंय मग?”

तिच्या बोलण्या मध्ये इतका तेज नव्हता… काही तरी अपूर्ण राहिल्या सारखं बोलत होती, बोलण्या मध्ये मनमोकळे पणा नव्हता…

आणि मी इतका ही लहान राहिलेलो नव्हतो की कोणाचं मन त्याच्या बोलण्यावरून वाचू शकत नव्हतो…

“माझं झालं शेवटचं वर्ष पूर्ण! आता निकाल लागल्यावर नोकरी करायची…

पण संगे तुला काय झालं… ६ वर्षां आधीची संगीता आणि आताची संगीता यात फरक जाणवत आहे… मला इतक्या वर्षांनंतर बघून बोलत नाहीस की अजून कोणते कारण आहे?”

Horror Stories In Marathi – फोटो स्टुडिओ | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – शौर्यकथा – वाडा | Storyteller Rushi

“असं काहीच नाही रे, मी अशीच तर होते!”

“तू अशी नव्हतीस… मी ज्या संगिताला ओळखतो ती एकदम बेधडक, मनमिळावू आणि बिनदास्त होती…

त्या मानाने आता पूर्ण बदलली आहेस”

खूप आग्रह केल्या नंतर संगीताने तिच्या बाबतीत घडलेला एक किस्सा सांगितला

संगीता- “माझं लग्न ठरलेलं मागच्या वर्षी, आशिष नावाच्या मुला सोबत…घरचा गर्भ श्रीमंत होता… समाजामध्ये मान होता त्यांना … पण माझ्या चेहऱ्यावर प्रेम झालेलं त्याला… लग्न झालं आमचं पण लग्ना नंतर समजलं की तो षंढ आहे!

मग काय… मी आले पळून आणि त्या नंतर त्याला घटस्फोट दिला”

ही गोष्ट माझ्या साठी तरी साधी होती, आणि तो जरी षंढ असला तरी त्याने संगीता वर प्रेम केलेलं…

संगीताचं वागणं सुद्धा कुठे तरी चुकलं असं वाटत होतं…

पण शेवटी तिचा प्रश्न… तिच्याही आयुष्याचा प्रश्न होता… ती तिच्या निर्णयावर बरोबर होती हे सुद्धा मनाला पटणारे होतें…

अंधार पडायला लागला, संगीताला निरोप देऊन मी माझ्या घराकडे वळलो…

रस्त्यातून जाताना सुद्धा संगीताचा विचार मनात घर करायला बघत होता…

घरी जाऊन या बद्दल काका काकूंना विचारावं पण हिम्मत नाही झाली… शेवटी ज्याचा तो प्रश्न.! संगीताने हा निर्णय घेतलंय ते तिच्या भल्याचंच असेल…

रात्रीचं जेवण झालं…

सर्व झोपायला गेले,

 मी सुद्धा दिवसभर फिरून आधीच दमून गेलेलो…

अंथरुणावर पडल्या पडल्या लगेच झोप लागली…

मध्यरात्री कसल्याश्या आवाजाने जाग आली…

विचार केलं कोणी मांजरू असेल… म्हणून दूर्लक्ष केलं आणि परत झोपन्याचा प्रयत्न करु लागलो…

थोडं वेळ जातंय न जातंय, तेच पुन्हा आवाज आला आणि या वेळी तो आवाज थोडा जवळून आला…

आता मात्र मनामध्ये संकोच निर्माण झाला… मनामध्ये अनामिक भीती उत्पन्न व्हायला जास्त वेळ नाही लागला…

मन घट्ट करून हलकेच डोळे उघडले,

आणि डोळे उघडताच समोरच दृश्य बघून दातखीळीच बसली… एवढ्या थंडी मध्ये सुद्धा घामाची १ धार डोक्यातून खाली जायला लागली…

समोर एक धिप्पाड माणूस माझ्या पोटावर बसलेला,

त्याच्या वजनाने माझ्या छातीतील श्वास छातीत च दबून जात होता…

तो माणूस होता की आत्मा?

ते जे काही होते, खूप भयानक होते…

त्याचे डोळे रक्तपेक्षा पण लाल, डोळ्यांमध्ये जणू क्रूरता डोळ्यांच्या बाहेर निघत होती… ओठ पूर्ण सुकलेले आणि तोंडातून २ तीक्ष्ण सुळ्यासारखे दात बाहेर आलेले…

आणि तो माणुस…. माणूस नाही राक्षस… तो राक्षस एखाद्या भक्षकासारखा माझ्याकडे तीक्ष्ण नजरेने बघत होता…

सर्व अंग एकवटून त्याला माझ्या शरीरावरुन खाली लोटायचा अपुरा प्रयत्न करत होतो पण काहीच फायदा होत नव्हता..

सर्व प्रयत्न निष्फळ झाल्यावर शेवटी रडायच्या सुरामध्ये त्याला हात जोडुन विनवणी केली…

“कोण आहेस तू? आणि मी काय बिघडलय तुझं ? आणि इकडे का आला आहेस?”

जोरात आरोळी देत ते राक्षस माझ्यावर खेकसलं…

Horror Stories In Marathi – हौंटेड हायवे | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – झपाटलेलं रेल्वे स्टेशन | Storyteller Rushi

“माझं नाव आशिष….

हो मी तोच आशिष आहे,, जो कधीकाळी तुझ्या संगीताचा नवरा होतो…

आमचं लग्न झालेलं, मी संगीतावर मनापासून प्रेम करत होतो… पण संगीताचं माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं… लग्नाच्या पहिल्या दिवसा पासून ती एकलकोंडीच असायची, तिच्याच विचारात मग्न असायची… तिला मी खूप वेळा समजवायचा प्रयत्न केला…तिला प्रेम द्यायचा सुद्धा प्रयत्न केला,… पण माझे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले…

हे तर काहीच नाही,

एके दिवशी तर कहरच झाला… आमच्या सर्वांच्या नजरा चुकवून ती तिचे समान भरून इकडून पळून जाण्याचा प्रयत्न करत होती,  पण नशीब चांगले की वेळीच मी बघितले आणि तिला अडवले…

आमचा समाजा मध्ये मान होता, इज्जत होती…

घरातली सून अशी पळून गेली तर आमच्या घराण्याला काळिमा लागला असता… पूर्ण गावामध्ये अब्रू गेली असती आमची…

तिला तिच्या या कृती नंतर सर्वांनी मिळून समजावले तेव्हा समजलं की तीचं आधी पासून कोणावर तरी प्रेम होतं… आणि ह्या प्रेमामुळे ती अशी वागत होती

कोणाचंच ऐकत नव्हती…

पण शेवटी एक दिवस तीने आम्ही सर्व बाहेर गेलो असताना इकडून पळ काढलाच…

पण हे इतक्यात थांबलं नाही…

इकडून गेल्यावर माझ्या सोबत परत नको यायला म्हणुन त्यांच्या गावामध्ये अफवा पसरवली की माझा नवरा षंढ आहे…

अरे, मी तर संगीताला साधा हात सुद्धा नव्हता लावला आणि बाकी गोष्टी तर दूरच्याच…

पण तिने तिच्या आधीच्या प्रेमामुळे मला षंढ घोषित केले,

तेव्हा पासून त्यांच्या गावात आणि आमच्या गावात हीच चर्चा चालू झाली की मी षंढ आहे… पोतदार कुटुंबांचा वारीस षंढ आहे…

आणि त्या मुळे आमचे घरातून बाहेर निघणे सुद्धा जीवावर येऊन बसले…

माझ्या घरच्यांची माझ्या घराण्याची इज्जत धुळीला मिळालेली

आमची ह्या गावामध्ये जी काही मान मर्यादा होती ती एका क्षणात धुळीस मिळाली…

वडिलोपार्जित घराण्याला मान भेटलेला तो माझ्यामुळे नाहीसा झाला..

सांगिता सोबत लग्न करायचा माझा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला…

माझ्या मुळे घरच्यांची अब्रू नष्ट झाली,,

हा अपमान मला सहन नाही झाला आणि माझ्या राहत्या घरी मी गळफास घेऊन आत्महत्या केली…

संगीताने तिच्या प्रेमा साठी माझ्या जीवनाची बरबादी केली,

आणि आता मी तिच्या जीवनाची बरबादी करणार…

तीचं जिच्यावर प्रेम होतं तो आता माझ्या समोर आहे…

हे सर्व ऐकल्या नंतर माझे शब्द तर माझ्या तोंडातच गिळून गेले…

घाबरण्याची सीमा ही तर कधीच पार होऊन गेलेली,

जोरात किंचाळी मारण्या इतकी सुदधा ताकत अंगात शिल्लक नव्हती…

 इतके बोलून त्या राक्षस रूपी आशिष ने त्याचे दोन्ही हात माझ्या गळ्याजवळ आणून माझा गळा आवळायला सुरुवात केली… माझा श्वास बंद पडायला लागला… डोकं सुन्न पडलं… छाती एकदम फुलायला लागली… हात हालचाल करणे बंद करत होते… तोंडातून शब्द फुटत नव्हते… मनात फक्त आई बाबांचा विचार येत होता…

असेच काही क्षण गेले… आणि मी जागीच बेशुद्ध झालो…

“बाळा ऊठ आज उशीर झाला उठायला तुला”

डोळे उघडले, समोर काकी हाक मारून उठवत होती…

सूर्य डोक्यावर आलेला…

 मी डोळे चोळत उठलो… डोकं खूपच जड झालेलं आणि काही काम करायच्या मनस्थिती मध्ये नव्हतं…

जबरदस्तीच अंघोळ करून परतीच्या प्रवासाला लागलो…

खूप दिवासांसाठी राहायला आलेलो मज्जा करायला आलेलो

पण आता परत जायला हवं…

आशिष बद्दल जे काही झालं ते खूपच वाईट होतं…

काका काकूंनी जाता जाता लवकर जाण्याचं कारण सुद्धा विचारलं…

पण ते सांगायच्या मानसिकते मध्ये मी नव्हतो

आणि तसंही तिकडे आता जास्त वेळ राहून काही फायदा नव्हता…

कारण काल रात्री आशिष ने त्याचा हेतू साध्य करायचं होतं ते केलेलंच…

मला षंढ बनवून.

Horror Stories In Marathi – पिंपळावरची हडळ | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – हायवे वरील थरार | Storyteller Rushi

तुम्हाला ही Marathi Bhaykatha no. 6 – षंढ 

कशी वाटली हे comments करून आम्हाला सांगा. आशा आहे की तुम्हाला Horror Stories In Marathi – षंढ ही भयकथा आवडली असेल.

जर तुम्हाला हि भयकथा – षंढ आवडली असेल तर तुम्ही तुमच्या friends सोबत social networks जसे की Facebook, google, twitter इत्यादी वर share करा.

तसेच Like करा आणि ह्या आणि अश्या बऱ्याच कथा Audible स्वरूपात ऐकायच्या असतील तर आपल्या Storyteller Rushi च्या YouTube Channel ला भेट द्या.

तुम्हाला सुद्धा तुमच्या Horror Stories किंवा तुमचे horror experience आमच्या पर्यंत पोहचवायचे असतील तर Email : Storytellerrushi@gmail.com यावर mail करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply