Horror Stories In Marathi – आजची हि Marathi Bhaykatha no. 14 – शौर्यकथा – वाडा. एक नवीन सिरीज ज्यात भयचकित,विस्मयकारक आणि सहसाच्या एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जाणाऱ्या शौर्यकथा.

Marathi Bhaykatha no. 14 – शौर्यकथा – वाडा – (Horror Stories In Marathi)

“नमस्कार, welcome, तुमच्या सगळ्यांच स्वागत आहे, आपल्या नेहमीच्याच Show मध्ये, 
मी, तुमचा होस्ट RJ ऋषी, आणि आज आपल्या Show मध्ये आलेले आहेत मिस्टर. शौर्य, 
तुम्ही विचार करत असाल, की हे शौर्य कोण, तर ह्यांची ओळख करून देतो, आजपासून आपल्या Show मध्ये नवीन कथांचा उगम होणार आहे, एक नवीन Series आपण चालू करणार आहोत,,, आणि ह्या Series च नाव असेल, “तो एक आवाज”.

हो, हे शौर्य त्यांच्या बाबतीत घडलेले एका पेक्षा एक असे रहस्यमयी, भयचकित, विस्मयकारक किस्से आपल्याला सांगणार आहेत,
तर आता जास्त वेळ न दवडता आपण त्यांचे किस्से ऐकायला सुरुवात करू थेट त्यांच्याच आवाजात”

अरे वाह, 
नेहमी प्रमाणे मला रेडिओ वर गाणी ऐकायचा छंद होता, त्या साठीच की काय, मी हा नवा कोरा रेडिओच घरी आणलेला.
मला आधीपासूनच भयकथा, रहस्यकथा ह्यांबाबत अमर्याद कुतूहल होतं, मग ते कुठे इंटरनेट वर असो, वा कोणत्या चॅनेल वर, मी अश्या कथा ऐकण्याचा किंवा बघण्याचा एकही चान्स सोडला नव्हता, हा तरी कसा सोडणार.

आणि आजपासून तर ह्यांची नवीन series च निघाली “तो एक आवाज”.
आता मस्त करमणूक होईल, 
मी हातातलं काम बाजूला ठेवून त्याचे किस्से ऐकण्यात गुंग झालो.

Horror Stories In Marathi – हौंटेड हायवे | Storyteller Rushi

वय साधारण तिशीच्या आसपास, अंगकाठीने सडपातळ पण बुद्धीने मात्र तीक्ष्ण..
त्याच्या भूत जीवनाविषयी त्याने काहीच सांगितले नव्हते.
असा हा शौर्य, एकदा त्याच्या अपार्टमेंटच्या मागच्या बाजूला सहज फेरफटका मारायला गेलेला.
त्यांची सोसायटी तशी मनुष्याने गजबजलेली, पण मागच्या बाजूचे कुंपण सोडले, की दूरवर दिसून येणारं ते वाडा वजा घर.
वाडा का? तर मागाहून विस्तार करण्यात आलेल्या त्याच्या वरच्या मजल्यांमुळे, बघून तरी तसंच वाटत होतं.
वाड्याच्या समोर मोठं अंगण, त्याच अंगणामधले लांबूनही उठून येणारे मोठं मोठाले वृक्ष, ज्यांना वाळून खूप वर्ष झाली असतील, त्यांचे आता फक्त खोड च तेवढे शिल्लक होते, 
त्यांवरून ते कोणते झाड असेल हे सुद्धा ठरवणे कठीण होते.
त्याच्या भोवताली गोलाकार मोठे कंपाउंड.

तसेही तो वाडा त्याच्या स्वयंपाकघराच्या खिडकीतून अनेकवेळा दृष्टिआड गेलाच होता, पण नेहमीची गोष्ट मनुष्य मन अनपेक्षित पणे दुर्लक्ष करतो, ह्याचे सुद्धा असेच होते.
आपल्या घरापासून दिसणाऱ्या ह्या वाड्याला इतके वर्ष दुर्लक्षच तर केलेलं.
किंवा बघून त्याबद्दल काहीच कुतूहल नसल्यासारखं?

पण आज काय होतं, की नेमकं आजच ह्या वाड्या बद्दल इतकं कुतूहल वाटावं?
तसं तर रोजच रात्रीच्या जेवणा नंतर एक शतपावली म्हणून पूर्ण सोसायटीचा एक राऊंड मारायची सवयच लागली होती किंवा लावली होती.
आजही असंच चालत एक राऊंड मारता मारता हा वाडा दृष्टीस पडलेला. पण नेहमीसारखा नाही, काहीतरी वेगळं, मनातल्या खोलवरच्या नकारात्मक जाणिवा उकरून काढणारं.
रोज आपण इकडूनच जातो, रोजच हा वाडा आपल्याला दिसतो, मात्र तेव्हा असं कधीच जाणवत नाही.

पण आज आपणहूनच ह्या वाड्याकडे लागलेली ओढ मनातून काही जात नव्हती.
शौर्यने नेहमी सारखं या गोष्टीकडेही दुर्लक्ष केलं, आणि परत आपल्या घराकडे जायला निघाला.

घरी आल्यावर शौर्यने सगळ्यात आधी स्वयंपाकघरातुन त्या वाड्याकडे पाहिले.
चारही बाजूने वेढलेल्या मोडकळीस आलेल्या लाकडी कंपाउंड च्या आतमधला तो वाडा.
रात्रीच्या चंद्रप्रकाशामध्ये जणू काही त्याच्यात नवीन जीव ओतलेलं भासत होतं.

शौर्यने लगेच आपल्या जवळच्या Telescope ने त्या वाड्याचं नीट निरीक्षण केलं.
अंधाराच्या गुहेमध्ये भक्ष्यासाठी टपून बसलेल्या एखाद्या राक्षसी जनावरासारखा तो वाडा आ वासून उभा होता.
सगळ्यात आधी तो कंपाउंड, मध्यभागी जुने आणि पुर्णपणे गंजून गेलेलं लोखंडी गेट, त्याच्या आतमध्ये गेटपासून साधारण ४ ते ५ मीटर अंतरावर वाड्याचा मुख्य दरवाजा.
शौर्य ची नजर वाड्याच्या अवती भवती फिरत फिरत वाड्याच्या वरच्या मजल्यावर जाताच स्थिरावली.
सगळ्यात वरच्या मजल्याच्या खिडकीतून अंधुकसा प्रकाश येत होता, एखादा मेणबत्तीचा?.
शौर्यने अजून Zoom करून बघितले, पण त्या मजल्यावर खिडकी आणि त्या अनोळखी उजेडा व्यतिरिक्त दुसरे काहीच दिसले नाही.
डोळ्याचं भ्रम समजावं, की मनाचे खेळ?

सर्व Light वैगेरे बंद करून तो झोपायला गेला.
दर वेळी दिवसभर काम करून पडल्या पडल्या एका घटकाभरामध्ये झोप लागते,
पण ती झोप आज कुठे तरी गुडूप झालेली.
कूस वर कूस बदलून देखील त्याच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता, येऊन जाऊन फक्त आणि फक्त वाड्याचेच विचार.

इकडे शिफ्ट होऊन एवढे वर्ष होऊन देखील आपल्याला ह्या वाड्या बद्दल एवढं कुतूहल वाटलं नव्हतं, जे आज वाटत आहे.
माणसाच्या मनाची एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे आपण एका गोष्टीला कितीही दुर्लक्ष करायचं प्रयत्न केला, तर आपल्या मनात इतर गोष्टी सोडून सगळ्यात जास्त त्याच गोष्टीचा विचार येतो जिला आपण दुर्लक्ष करत असतो.
आता ह्याला Psychic Condition म्हणावी, कि मनाचा दुबळेपणा?.

राहवेसे न झाल्यावर शेवटी शौर्य उठलाच आणि तिकडे जाऊन तिकडच्या वास्तूचा प्रत्यक्ष उलगडा करायचे ठरवले.
सोबतीला Torch, Mobile, एक चाकू (स्वरक्षणासाठी?) आणि त्याच्या गुरूंनी दिलेली रुद्राक्षची माळ.

इमारतीच्या मागच्या बाजूला प्रकाशाचा नामोनिशाण नव्हता, त्याची इमारत ते वाडा ह्यामधील अंतर इतके जास्त नव्हते, तरी त्या भयाण अंधारात एक नी एक सेकंद सुद्धा मुश्किल ने जात होते.

पूर्ण रस्ता अंधारात न्हाहून निघाला होता.
भरभर पाऊलं टाकत शौर्य वाड्याकडे निघाला. रस्त्यावर रातकिड्यांचा आवाज आणि कुत्र्याचे भुंकने चालूच होते.

काही वेळाने शौर्य वाड्याच्या गेट पाशी पोहोचला.
गेट पूर्णपणे गंजून त्याचे अवशेष तेवढे राहिलेले. गेट ला हलकेच बाजूला सारून त्याने जसे आतमध्ये पाऊल टाकले, तसं त्याचं पूर्ण अंग शहारून गेलं, कारण गेट च्या बाहेरच्या हवेत आणि आतमधल्या हवेमध्ये फरक जाणवत होता.
शौर्य हलकेच पाऊलं टाकत वाड्याच्या दरवाज्यापाशी पोहोचला, लाकडाचा दोन फळीचा दरवाजा, त्यावर कुलूप नव्हते, नुसतंच लावून ठेवलेलं होतं.

Horror Stories In Marathi – झपाटलेलं रेल्वे स्टेशन | Storyteller Rushi

आतमध्ये कोणी राहत असेल तर?
आपले इकडे येणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे, जर इकडे कोणी राहत असले आणि त्यांनी आपल्या विरुध्द तक्रार केली तर?
पण मागच्या एवढ्या वर्षांपासून इकडे कोणाचा मागमूसही दिसला नव्हता, आणि अश्या भयाण वास्तूत राहण्याचे धाडस उगाच कोण करेल?

मनात प्रश्नोत्तरांची सरबत्ती चालू असतानाच आतमधून कसल्यातरी विव्हळण्याचा आवाज आला.

आता आतमध्ये जाण्यावाचून पर्याय नव्हता.
शौर्यने दरवाजा अजिबात आवाज न करता हलकेच ढकलला आणि आतमध्ये पाऊल टाकले.
बाहेर चंद्राच्या प्रकाशामध्ये पायाखालची जमीन तरी दिसत होती, वाड्याच्या आतमध्ये तर ते सुद्धा दिसत नव्हतं.
सगळीकडे फक्त अंधार.
शौर्यने टॉर्च लावली आणि लाईट चा बोर्ड भेटतोय का बघायला लागला.
खूप शोधून पण त्याला कुठेच बोर्ड सापडला नाही, तेव्हा त्याने हातातल्या टॉर्च नेच शोधा शोध करायचे ठरवले.

वाड्याला मोठा हॉल होता, त्याच्या डाव्या बाजूला किचन आणि किचनला लागूनच वरती जाण्यासाठी लाकडी जिना.
हॉल च्या उजव्या बाजूला एक खोली सोडली तर बाकी काहीच नव्हत.
घरातल्या सर्व सामानांवर कोळीष्ट्कांची भरदार आवरणे होती.

दरवाजाबाहेर असताना आतमधून विव्हळण्याचा आवाज आलेला, पण कुठून?
तितक्यात त्याच्या लक्षात आले की घरातून Telescope ने त्याला वरच्या मजल्यावर उजेड दिसलेला.
तो वरच्या मजल्यावर जायला निघाला.

त्याने डाव्या कडच्या जिन्याने वरती जाण्याचे ठरवले.
जसं जसं वरती जाऊ लागला, तसा एक संमिश्र असा कुबट वास यायला लागला, त्याने त्वरित खिशातून रुमाल काढून नाकावर धरला.
वरचा मजला जसा जवळ यायला लागला तसा तो वास अजूनच गडद होत गेला, ह्याची जाणीव त्याला त्याच्या रुमलामधून सुद्धा येत होती.
वरती पोहोचल्यावर तो थेट ज्या खोलीमधून तो कुबट वास येत होता त्या खोलीजवळ गेला आणि दरवाजा हलकेच आतमध्ये ढकलून आतमध्ये टॉर्च मारला.
जशी आतमध्ये टॉर्च मारली, तसा शौर्य दोन पाऊले मागे गेला, त्याच्या हातातली टॉर्च तशीच गळून पडली.

आतमध्ये एका मागोमाग एक मानवी हाडांचे सापळे रचून ठेवलेले, सगळीकडे एकच दुर्गंधी पसरलेली.
शौर्य ने पटकन खाली पडलेली टॉर्च उचलली आणि परत सावकाश सगळ्या सापळ्यांकडे नीट लक्षपूर्वक पाहू लागला.
काही काही सापळे तर जुने होऊन कुजून तुटायला आलेले, तर काही सापळ्यांमध्ये अजूनही कुजका मांस लोंबत होता, साधा सुधा माणूस तर तिकडेच ओकारी काढेल, पण शौर्य त्यामधला नव्हता.
त्याने नीट निरखून सगळ्यांवरून टॉर्च फिरवली आणि सगळ्यात शेवटचा सापळा झाल्यानंतर त्याची नजर त्या सापळ्याच्या उजव्या बाजूला गेली.

मगाशीच ह्या सापळ्यांच्या धक्क्यातून शौर्य सावरला नव्हता, की तेच त्याला परत एक धक्का बसला.
शेवटच्या सापळ्याच्या उजव्या बाजूला काहीतरी होतं, एक मानवी आकृती, व्यक्ती नाही म्हणता येणार, व्यक्तीला अवयव, रंग, रूप असतं,
पण ती आकृती पूर्ण निश्चल, पारदर्शक होती, ती आकृती तिकडेच एका जागी उभी होती,
शौर्य तिच्या आरपार सहज बघू शकत होता.
त्याने तिच्यावर टॉर्च मारली. त्यांची नजरा नजर झाली,
तिचे डोळे शौर्य वर खिळलेले, त्या नजरेमध्ये राग, क्रोध तिरस्कार जणू ओथंडून वाहत होता.

विजेचा करंट लागावा तसा एक करंट शौर्य च्या रोमा-रोमात भिनला,
शौर्य काही हालचाल करणार, तितक्यात त्या आकृतीने त्याच्यावर झडप घेतली, एका पाऊलामध्येच तिने त्या खोलीचे अंतर कापले,
शौर्यचं डोकं पूर्ण सुन्न झालेलं, पण त्याने त्याच्या मनाला दुबळा नाही होऊन दिला.
त्याचे नशीब बलवत्तर, तो दरवाज्याच्या बाहेरच उभा होता,
त्या आकृतीला आपल्याकडे येताना पाहून त्याने एक सेकंदाच्या आत त्या आकृतीच्या तोंडावर खोलीचा दरवाजा धाडदिशी बंद केला,

तितक्यात खालून मगासचा विव्हळण्याचा आवाज पुन्हा एकदा आला.
शौर्यने दाराला कडी लावून आवाजाच्या दिशेने धाव घेतली.
आवाज किचन मधून येत होता, किचनला दरवाजा नव्हता, 
किचनच्या आत पाऊल टाकले, पूर्णपणे मिट्ट काळोख, शौर्यने टॉर्च मारून पुन्हा सगळ्या खोलीत एकवार नजर फिरवली, 
पूर्ण किचन धूळ आणि कोळीष्ट्कांनी वेढलेला, टॉर्च मारत मारत त्याची नजर एकवार पुन्हा एकदा खिळली,
किचन च्या एका कोपऱ्यात एक दरवाजा होता,
कदाचित चोर-दरवाजा असेल.
त्याने पुढे जाऊन दरवाजा हलकेच ढकलला, 
तो आवाज ह्याच खोलीमधून येत असेल, पुढे होऊन त्याने आतमध्ये बघितलं, आणि आतमधलं दृश्य पाहून त्याचं त्याच्या डोळ्यावरच विश्वास बसेनासा झाला.

आतमध्ये ४ माणसे एकमेकांच्या समोर अशी बसलेली, त्यांच्या मध्यभागी ४ विटा रचून त्यामध्ये अग्नी, आणि ते जे कोणी लोकं होते, त्या अग्नी मध्ये आळीपाळीने कसलेतरी द्रव्य टाकत होते,
द्रव्य टाकताना एक विशिष्ट मंत्र म्हणत होते.
ते काय बोलत होते, ते कशाचे मंत्र होते, ह्याबद्दल शौर्यला काडीमात्र कल्पना नव्हती.

हं. रं.. सप्.. ह्या शिवाय बाकीचे काहीच उच्चार कळत नव्हते.

पण ते मंत्र काही खासच नव्हते, प्रत्येक मंत्रामागे त्यांचे त्या अग्नी मध्ये ते द्रव्य टाकणे चालू होते, आणि त्यातुन निघणाऱ्या धुरातुन एक विशिष्ट आकृती बनत चाललेली.

पूर्ण खोलीमध्ये धुराचा कल्लोळ उठलेला.
त्या सगळ्या प्रकारामध्ये शौर्यला क्षणाक्षणाला अस्वस्थ वाटायला लागले.
त्यांचे ते जे काही कार्य चाललेले, ते सत्कर्म तर नक्कीच नव्हते.
कोणालातरी पाशवी, पापी जगातून अनाहूतपणे, अनैसर्गिकपणे ह्या जगात आणण्याचा तो प्रयत्न वाटत होता.
ते जे काही होते, ते कीती वर्ष जुने असेल, कोणत्या जगाचे असेल,
त्याचे परिणाम काय आणि किती भिषण असणार, ह्याची पूर्व कल्पनाच मनाचा थरकाप उडवत होती.

Horror Stories In Marathi – फोटो स्टुडिओ | Storyteller Rushi

ह्या बंद वाड्याच्या आतमध्ये इतके वर्ष हा भयानक प्रकार चालत होता, मानवी अस्मितेला काळिमा फासणारा.
प्रत्येक मंत्रामागे ती आकृती अजूनच विशाल होत चाललेली. हे लवकर थांबवायला हवं, नाहीतर काहीतरी अनर्थ नक्किच घडणार.

तो आतमध्ये पाय टाकणारच, की तितक्यात त्याला आठवले, त्याच्या गुरूंनी एकदा अश्याच अमानवी शक्तीचा सामना त्याच्या सोबतीमध्ये केलेला.
कारखाणीसांच्या वाड्यामधला हाच प्रकार त्याच्या गुरूंनी उलथून लावलेला.

माणसांना मारून त्यांचे शव त्या अमानवी आकृतीला पुरवून तिला ह्या जगात आणली जाते आणि त्यांच्या सापळ्यांची विल्हेवाट ती आकृती स्वतः लावते.
पण ती आकृती पूर्ण प्रकट व्हायच्या आत जर त्या सापळ्यांची विल्हेवाट लावली गेली, तर तिचा ह्या जगात येण्याच्या रस्त्यामध्येच अडथळा निर्माण होतो. म्हणून ते सापळे तसेच ठेवून त्यांच्यासोबत एक पहारेकरी ठेवला जातो, एक रक्षक म्हणून.. तो रक्षक सुद्धा अमानवीयच.

शौर्यच्या डोळ्यासमोर अदृश्य असा त्याच्या गुरूंचा पराक्रम आठवला.
तो तिकडून बाहेर आला.

ते सापळे, वरच्या मजल्यावर. पण.पण तिकडे तर तो पहारेकरी आहे.

शौर्यला बघून तो आधीच संतापलेला होता. आणि आता जर तो परत गेला तर तो त्याच्या शक्तीचा वापर किती हद्दीपर्यंत करू शकतो हे शौर्यला ज्ञात नव्हतं.

नेहमी अश्या ठिकाणी जाताना कधीही शौर्य त्याच्या संपूर्ण तयारीनिशी जातो, पण आज काय झालेलं,
आजच तो असा बेसावध आलेला.
इकडून परत जाऊन पूर्ण तयारी करून येण्याइतपत कालावधी त्याच्याकडे अजिबात नव्हता.

ती अकृती अजूनच गडद होताना बघितलेली, त्याला जे काही करायचे होते, आताच करायचे होते.
त्याच्याकडे सध्याच्या घटकेला त्याच्या गुरूंनी दिलेली रुद्राक्षाची माळ होतीच.
तेच त्याचं सगळ्यात मोठं शस्त्र होतं.
त्याने गुरूंचं स्मरण केलं, तसं त्याच्या अंगामध्ये अनामिक शक्ती संचारली.

त्याने एका क्षणामध्ये वरचा मजला धरला आणि दरवाज्यावर जोरात लाथ मारून तो उघडला.

आतमध्ये तो पहारेकरी त्याला पुन्हा एकदा पाहून आणखीच भडकला.
आता त्याच्या संतापला पारावर उरला नव्हता, पुन्हा एकदा त्याने शौर्य वर तशीच झडप घेतली,
शौर्य तयारीतच होता, त्याच्या झडपेला चुकवून तो दुसरीकडे गेला,
त्याला आत आलेला पाहून त्या पहारेकऱ्यानी खोलीचा दरवाजा बंद करून टाकला.

“मला माहित आहे तू ह्या सापळ्याचं रक्षण का करत आहेस, मला गप्पपणे माझं काम करुदे, ह्या सापळ्यांची विल्हेवाट लावल्यानंतर माझ्यात दया याचना राहिली, तर तुला सोडायचं विचार करेन”

तो पहारेकरी काही ऐकायच्या मनस्थितीतच नव्हता.
तो पुन्हा एकदा शौर्यवर धावून गेला, ह्यावेळी शौर्य सुद्धा मागे हटला नाही, तो ही तोडीस तोड उत्तर द्यायच्या प्रयत्नात होता.
हा संघर्ष फक्त शौर्य आणि त्या पहारेकऱ्यामध्ये नव्हता,
तर पुण्याशी पापाचा होता,
सुष्ट-दुष्ट शक्तींचा होता.

दोघेही एकमेकांवर चालून गेले, दोघांचे हात एकमेकांवर उठले, शौर्य ची चपळाई इतकी जलद होती की त्या पहारेकऱ्याच्या हाताच्या आधी शौर्यचा हात त्याच्या पर्यंत पोहोचला, पण ज्या वेगात त्याने हात उचलला होता, त्याच वेगात तो त्या पहेरकार्याच्या शरीराच्या आरपार गेला.
शौर्य गोंधळला, हीच संधी साधून त्या पहारेकऱ्याने शौर्यला जोरात मारून मागे ढकलले.

शौर्य त्याच्याकडे एकटक बघतच बसला, त्याच्या धक्क्याने तो जोराय भिंतीवर आपटला,  त्याच्या पाठीवर मार बसलेला. 
त्याचे शरीर तर पारदर्शक होते, पण त्याला मानवी जाणिवा सुद्धा होत नसाव्या?

शौर्य खाली पडला हे बघून त्या पहारेकऱ्यानी एक विशिष्ट मंत्र म्हणायला सुरुवात केली. त्याचे डोळे मिटले गेले.
शौर्यने देखील आपल्या रुद्राक्ष माळेला पकडून त्याच्या गुरूंचा मंत्र म्हणायला सुरुवात केली.

पहारेकऱ्याचा मंत्र पूर्ण होताच त्याने एक रागाच्या कटाक्षाने शौर्यकडे पाहिले.
त्याच्या मंत्रामध्ये शक्ती होती, तीच अमानवी शक्ती,
एखादा सामान्य माणूस ज्याला दैविक किंवा पाशवी शक्तींबद्दल काहीच ज्ञान नाही, त्याचा ह्यापुढे टिकावच लागला नसता, अश्या व्यक्तीचा त्या पहारेकऱ्याच्या त्या रागाच्या कटाक्षाने भस्म झाला असता, 
पण शौर्यच्या त्या मंत्रांची शक्ती त्या रुद्राक्षमध्ये मध्ये जणू दैवी शक्ती बनून अवतरली होती.

त्या पहारेकऱ्याच्या शक्तीचा काहीच टिकाव शौर्य पुढे लागला नाही.

“काय रे लुक्ख्या, त्या माळेला सगळी शक्ती दिलीस व्हय रं! पण इकडून मागला जाशील कसा”

‘त्याची चिंता तू नको करुस, सध्या तू तुझी चिंता कर’ शौर्यचा आवाज चढलेला, अधिकारी झालेला.

त्या पहारेकऱ्यानी पुन्हा एकदा त्याच्या शक्तीचा प्रयोग केला, पण शौर्यच्या सुरक्षा कवचा पुढे ते निथल झालेलं.
जसं अग्नीला पाणी शांत करत, तश्या त्या पहारेकऱ्याच्या सर्व शक्ति त्याच्या पुढे व्यर्थ जात होत्या.

शौर्य जसा एक एक पाऊल पूढे टाकत होता, तसा त्याच्या शक्तीचा जोर कमी होत गेला.
शौर्यने गळ्यातली माळ काढून हाताला बांधली, पुन्हा एकदा मंत्रोच्चार करून आपल्या सर्व शक्तीनिशी त्या पहारेकऱ्याला पकडले,
ह्या वेळी त्याचा हात आरपार नाही गेला, त्याने पहारेकऱ्याचा गळा पकडून त्याला खाली पाडले.

त्याची पारदर्शकता निघून गेलेली, आणि त्या सोबत त्याची शक्ती सुद्धा.
तो जिवाच्या आकांताने ओरडत होता,
शौर्यने सामान्य माणसा सारखे त्याच्या तोंडावर जोरदार बुक्के मारून त्याला घायाळ केले.

तो पूर्णपणे बेशुद्ध झालाय हे पाहून त्याने सर्व सापळे एकावर एक रचले.
खिशातून रुमाल काढला, त्याला लाईटरने पेट दिला आणि त्या लाईटर मधला Flammable Liquid त्या पहारेकऱ्यावर आणि त्या सापळ्यांवर ओतला. आणि रुमालाच्या अग्नीने त्या सर्वांना जाळून खाक केले.

पूर्ण वाड्याला एक जोरात हादरा बसला, त्या हादर्याचा झटका इतका तीव्र होता, की थोड्या वेळ पुरत शौर्यला सुद्धा सावरायला वेळ लागला.
जणू काही वाईट शक्तींचे काळे ढग त्या वाड्यापासून नाहीसे झालेले.
नकारात्मक शक्ती ऱ्हास झालेली.

आता बारी होती किचन मधल्या त्या चार व्यक्तींची.
त्या सापळ्यांना तसच जळत ठेवत तो किचन मध्ये त्या खोलीत गेला.
दरवाज्यातून आतमध्ये बघितले तर मागासचे दृश्यच नाहीसे झाले.
तिकडे त्या ४ व्यक्तींपैकी कोणीच नव्हते,
त्यांच्या मध्यभागी आग विझून तिकडे राख जमलेली.

शौर्यला त्याच्या आधीचे दिवस आठवले.
जेव्हा दृष्ट शक्ती मनुष्य जगात येऊ पहाते तेव्हा तिला कोणत्या ना कोणत्या रुपात यायला निमंत्रण दिले जाते, पण त्या मध्ये जर कोणत्या प्रकारचे अडथळे आले, तर ती वाईट शक्ती त्या बोलावणाऱ्यांवरच उलटी पडते.

ह्या चौघांचे सुद्धा तेच झाले,
ती जी कोणती शक्ती होती, शौर्यच्या हस्तक्षेपामुळे तिचे ह्या जगात यायचे सर्व रस्ते बंद झाले आणि ति त्या चौघांवरच उलटली.
त्या वाईट शक्तीने त्या चौघांचेच बळी घेतले आणि आपल्या जगात त्या त्यांना घेऊन गेली, त्यांना नरकयातना देण्यासाठी, जोपर्यंत त्यांची भूत योनी मधून सुटका होत नाही तोपर्यंत.

Horror Stories In Marathi – तो..| Storyteller Rushi

तुम्हाला ही Marathi bhaykatha no. 14 – Horror Stories In Marathi – शौर्यकथा – वाडा

कशी वाटली हे comments करून आम्हाला सांगा. आशा आहे की तुम्हाला Horror Stories In Marathi- शौर्यकथा – वाडा ही भयकथा आवडली असेल.

जर तुम्हाला हि भयकथा Horror Stories In Marathi – शौर्यकथा – वाडा आवडली असेल तर तुम्ही तुमच्या friends सोबत social networks जसे की Facebook, google, twitter इत्यादी वर share करा.

तसेच Like करा आणि Horror Stories In Marathi – शौर्यकथा – वाडा आणि अश्या बऱ्याच कथा Audible स्वरूपात ऐकायच्या असतील तर आपल्या Storyteller Rushi च्या YouTube Channel ला भेट द्या.

तुम्हाला सुद्धा तुमच्या Horror Stories किंवा तुमचे horror experience आमच्या पर्यंत पोहचवायचे असतील तर Email : Storytellerrushi@gmail.com यावर mail करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply