Horror Stories In Marathi – आजची हि Marathi Bhaykatha no 18 – द क्रिटिकल केस. कधी कधी नकळत आपल्या हातून अश्या काही घटना घडतात, ज्यांचे परिणाम किंवा शिक्षा आपल्याला ह्याच जन्मात फेडवी लागते.

Marathi Bhaykatha no. 18 – द क्रिटिकल केस (Horror Stories In Marathi)

“ही घ्या चावी, आणि उद्या सकाळी बरोबर ७ वाजता मी येईन, जर कोणती एकदमच सिरीयस केस असली तर लगेच मला फोन करा, चला येतो”

वॉचमन काकांकडे गेटची चावी देत प्रकाश घरी जायला निघाला.

आज जरा उशीरच झालेला, रात्रीचे १ वाजून गेलेले, पण गाडी असल्यामुळे कोणतीही काळजी करण्यासारखी गोष्ट नव्हती.

डॉ. प्रकाश आपटे. एक नामवंत डॉक्टर.

आपटेनच नाव माहीत नसलेले शहरामध्ये खूप कमीच जण असतील, कदाचित नसतीलही.

आजचे शेवटचे ऑपरेशन खूप दिवसांनी प्रकाश एवढ्या उशिरापर्यंत थांबलेला, नाहीतर रोज जास्तीत जास्त १० पर्यंतच.

बाकीच्या ज्या छोट्या मोठ्या केसेस असायच्या ते सगळं त्याचे असिस्टंट डॉक्टरच पाहत होते.

घरापासून दवाखाना बराच लांब होता. आजच्या सक्सेसफुल ऑपरेशन मुळे प्रकाश प्रसन्न मनाने गाडी चालवत होता.

रस्ता तसा कच्चा होता, एक दोन वाहने सोडली, तर पूर्ण रस्ता काळोखाच्या छत्रछायेत बुडून गेलेला.

Horror Stories In Marathi – अखेरचा प्रवास | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – द लास्ट शिफ्ट | Storyteller Rushi

आता गाडी कच्चा रस्ता सोडून मुख्य रस्त्याला लागली, इकडे वाहनांची थोडीफार वर्दळ होती, पण जरा कमीच आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला कर्दनकाळ पिशाच्चा सारखी वाटणारी झाडे. 

प्रकाश थोडं पूढे जाताच रस्त्याच्या कडेला थोड्या अंतरावर गाडीच्या हेडलाईट मध्ये काहीतरी हलताना दिसले.

जशी गाडी त्याच्या आणखी जवळ गेली, तसं त्याला समजलं की कोणीतरी व्यक्ती गाडी कडे बघून लिफ्ट मागत उभी आहे.

प्रकाशने एकदा घड्याळाकडे बघितले, रात्रीचे दिड वाजलेले, इतक्या रात्री हा माणूस इकडे काय करतोय?

कदाचित कोणी मजुर असेल, पण आजू बाजूला कसले बांधकाम किंवा अन्य गोष्टच नाही.

प्रकाशने जास्त डोक्यावर ताण न देता गाडी त्याच्या बाजूला नेऊन थांबवली आणि गाडीची काच खाली केली.

समोर एक पन्नाशीतले गृहस्थ उभे होते, उंचीने मध्यम, केस पूर्णपणे विरळ झालेली आणि डोळ्यांना भिंगाचा मोठा चष्मा.

“क्या भय्या किधर जाना है” प्रकाश त्याला विचारता झाला.

पण समोरून काहीच उत्तर नाही, तो एकटक प्रकाशच्या चेहऱ्याकडे बघत बसला.

प्रकाशने पुन्हा एकदा थोड्या मोठ्या आवाजात विचारले.

“अरे भय्या सुनाई देता है? मैने पूछा किधर जाना हैं?”

‘आगे चौराहे पर छोड दो, मै वहासे चला जाउंगा’

प्रकाश ने त्याला गाडी मध्ये घेतलं, पण तो पुढे, प्रकाशच्या बाजूच्या सीट वर न बसता बॅकसीट वर बसला.

अंधाराला चिरत गाडी पूढे निघाली.

गाडीमधल्या प्रकाशाला भंग करत प्रकाश बोलता झाला.

“वैसे आप इतने रात गए, यहां क्या कर रहे थे?”

‘गाँव से आया था, एक टेम्पोवाले ने यहाँ पर ही उतार दिया, और फिर किसी गाड़ी का इंतजार करते गए फिर आप आ गए, आपका शुक्रिया अदा करना तो भूल ही गया’

“अरे कोई बात नही, आपका स्टॉप आये तो बता देना”

गाडी जशी पुढे जात होती, तशी रस्त्यावरची वर्दळ सुद्धा कमी होत होती. क्वचितच एक गाडी मोठ्याने हॉर्न वाजवत ओव्हरटेक करून निघून जाई.

रात्र आणखीच गडद होत जात होती.

खूप वेळ झाला, बॅकसीट वरून काहीच हालचाल किंवा आवाज नव्हता आला, प्रकाशने सहजच गाडीच्या आराश्यामधून मागे पाहिले, आणि विजेचा करंट बसल्यासारखा तो स्तब्ध झाला, कारण मागे ती व्यक्ती नव्हती, पूर्ण बॅकसिट रिकामी होती.

प्रकाशने ताबडतोब गाडी बाजूला थांबवली व मागे वळून पाहू लागला.

हा अचानक कुठे गायब झाला, जमिनीने गिळलं, की आकाशाने खाऊन टाकलं?

तसं प्रकाशचं संपूर्ण शिक्षण विज्ञान क्षेत्रात झालेले, आणि आजच्या आधुनिक विज्ञानाच्या जगामध्ये हे असलं काही त्याचं मन मान्य करायला तयार नव्हता.

Horror Stories In Marathi – दिघाटी रोड | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – भानगड | Storyteller Rushi

तो लागलीच गाडीतून खाली उतरला आणि आसपास पाहू लागला, बाहेरचं वातावरण बर्फासारखं गोठवून टाकणारं होतं.

आजूबाजूला मिट्ट काळोख, प्रकाशने गाडी बंद नव्हती केली, त्यामुळे त्याच्या हेडलाईट तेवढा प्रकाश होता.

रातकिड्यांची किर्रर्र त्या स्मशान शांततेत भंग आणत होती 

प्रकाशने गाडीच्या चहूबाजूला जाणीवपूर्वक पाहिले, पण कोणीच सापडले नाही.

शेवटी कंटाळून तो परत गाडीमध्ये बसायला वळला.

पण जसं त्याने गाडीचा दरवाजा उघडला, तसा त्याला एक जोराचा हादरा बसला.

गाडीच्या ड्राइविंग सीट वर तोच मगासचाच माणूस बसला होता,  आता तो माणूस इतका भयंकर दिसत होता, की कोणी कमजोर हृदयाच्या माणसाला हा झटकाच सहन नसता झाला.

त्याच्या डोक्यावर जबर जखम होती, डोकं अर्ध्या बाजूने फूटलेलं त्यातून रक्ताचे पाट वाहत त्याच्या पूर्ण तोंडावर जमा होत होते.

एका छद्मी हास्याने तो प्रकाश कडे पाहत होता.

प्रकाशची किंचाळी तोंडातच दबली गेली, त्याने क्षणाचाही विलंब न करता तिकडून गाडीच्या मागच्या बाजूला धाव घेतली.

इतका भयंकर दृश्य प्रकाशने यापूर्वी कधीच पाहिले नव्हते, त्याने आजवर अनेक मोठमोठे ऑपरेशन केले, पण आज जे बघितलं, ते मानवी बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडे होतं.

आता तो धावत धावत गाडीपासून खूप दूर आला होता.

लांबूनच त्याला एक ट्रक येताना दिसला.

ह्याची मदत घेऊन गाडीपर्यंत जाऊ आणि ह्याच्या सोबतच इकडून बाहेर पडू. असं मनाशी ठरवून प्रकाशने लिफ्ट साठी हात केला आणि ट्रक थांबला सुद्धा.

आतमध्ये एक वयस्क गृहस्थ होते, आणि त्याच्या बाजूला कोणीतरी अंगावर घेऊन झोपलेलं कदाचित किनर असेल.

“काका, मला पुढपर्यंत सोडता का जरा”

त्या ट्रक वाल्याने मानेनेच बसायची खून केली.

‘काय साहेब, कपड्यांवरून तर तुम्ही चांगल्या घरचे दिसता, आणि इतक्या रात्री अश्या आड मार्गावर?’

“नाही काका, मी घरीच जात होतो, पण रस्त्यातच माझ्या सोबत दुर्घटना घडली म्हणून मी घाबरत पळत मागे आलो”

‘तुझ्या बाबतची ती दुर्घटना, आणि दुसऱ्यांच्या बाबतची ती दुर्घटना नाही का?’

काकांचा आवाज पुरता बदललेला, त्या आवाजामध्ये आता भलताच राग होता.

प्रकाशने घाबरत घाबरत काकांकडे पाहिले.

पण ते काका नव्हतेच.

तोच मगासचाच माणूस त्या काकांच्या शरीरातुन जन्म घेत होता.

Horror Stories In Marathi – अंधार | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – षंढ | Storyteller Rushi

आता तो माणूस नजरेतूनच आग ओकत होता, प्रकाशची तर बोबडीच वळली, त्याने ना आव बघितला ना ताव, तशीच ट्रक मधून लगेच बाहेर उडी मारली.

भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रकमधून उडी मारल्यामुळे प्रकाशला खूप ठिकाणी खरचटलं, रक्त आले, पण आता त्याला काहीही करून इकडून घरी जायचे होते.

स्वतःला किती लागलंय, किती खरचटलंय हे बघत बसण्यापेक्षा तो धावत राहिला, तसाच.

पण ह्यापेक्ष्या जीव वाचला हेच त्याला पुरेसं होतं.

धावत धावत प्रकाश गाडीपर्यंत आला. 

गाडीची पार्किंग लाईट चालू होती, गाडीमध्ये बसून गाडी तातडीने सुरू केली, तेव्हा कुठे जाऊन त्याच्या जीवात जीव आला.

थोडं पुढे जातो न जातो तेच गाडीमधल्या आरश्यामधून त्याला परत बॅकसीट वर हालचाल जाणवली.

त्याने मिरर मधून मागे बघितले,  तोच माणूस मागे बसून प्रकाशकडे बघून हसत होता.

डोळे खोबणीत गेलेले डोक्यावर पुन्हा तीच जखम त्यातून ओघळणारे रक्ताचे पाट.

प्रकाश कडे बघून हसताना ते रक्त त्याच्या ओठातून दातावर येत होते.

डोक्यावर सडत असलेल्या जखमेचा दुर्गंध पूर्ण गाडी भर पसरलेला.

प्रकाश आधीच्याच प्रसंगातून सावरला नव्हता तेच ते भयानक दृश्य,

किंबहुना त्याहून भयानक न राहवून प्रकाश ची जोरात किंचाळी आली. त्याने लागलीच ब्रेक मारला पण ब्रेक ने गाडी थांबण्या ऐवजी गाडीने अजूनच वेग धरला. गाडी चा ब्रेक फेल होता 

प्रकाश चे सर्व प्रयत्न अपयशी झाले, रडलेल्या आवाजात त्याने त्या माणसाला विनवणी केली.

जाऊ दे मला मी काय बिघडवल आहे तुझं.

अत्यंत क्रूर आवाजात तो माणूस बोलायला लागला,

“काय बिघडवलय? मागच्या आठवड्यात याच रस्त्यावरून जाताना माझा अपघात झालेला तू बघितलास आणि माझ्या जवळ सुद्धा आलेलास जरी तिकडून मला दवाखान्यात नेल असतस तरी मी वाचलो असतो रे घरी पोर बाळ अजूनही या आशेवर अजूनही असतील कि त्यांचे बाबा आज ना उद्या येतील.

तू स्वतः डॉक्टर आहेस तुझ्याकडे फर्स्ट एड (first aid) किट तर असेलच,तुला जरा सुद्धा दया आली नाही माझी.

मला बघून तसाच सोडून निघून गेलास मग आता भोग तुझ्या कर्माची फळ.”

अरे पण ह्यात माझी काय चूक मी सुद्धा घाबरलेलो तेंव्हा प्रकाश विनवणीच्या रुपात म्हणाला.

तुझी एवढीच चूक होती की ज्या गाडीमधून माझा अपघात झाला त्या गाडीचा ड्रायव्हर तू स्वतःच होतास.

प्रकाशच्या डोळ्यासमोरून एक फ्लॅशबॅक गेलं त्या रात्रीचं.

पोलिसांच्या भीतीनेच त्याने त्या माणसाला तसंच मरून दिलं आणि इतक्या रात्री एवढ्या सामसूम रस्त्यावर कोणाला काय समजतय.

प्रकाश मागच्या आठवणीतून बाहेर पडतो तो न पडतो तोच त्याच्या समोर एक मोठा झाड आला आणि कर्णकर्कश आवाजात त्याच्या गाडीचा भयानक अपघात झाला.

पोलिसांनी दुसऱ्या दिवशी त्याची मृत बॉडी काढली गाडीमधून तेव्हा त्याच्या डोक्यावर जखम होती डोकं अर्ध फुटून त्याच्या डोक्यातून रक्ताचे पाट वाहत होते.

पोस्टमोर्टम मधेही काही सापडले नाही.

अजूनही त्या रस्त्यावर रात्री कोणतीतरी व्यक्ती लिफ्ट मागताना दिसते आणि जो कोणी त्याला लिफ्ट देतो त्याचा अपघात झाल्यावाचून राहत नाही.

Horror Stories In Marathi – हा सागरी किनारा | Storyteller Rushi

Horror Stories In Marathi – नदीच्या पलीकडे 1| Storyteller Rushi

तुम्हाला ही Marathi Bhaykatha no. 18 – द क्रिटिकल केस

कशी वाटली हे comments करून आम्हाला सांगा. आशा आहे की तुम्हाला Horror Stories In Marathi – द क्रिटिकल केस ही भयकथा आवडली असेल.

जर तुम्हाला हि भयकथा – द क्रिटिकल केस आवडली असेल तर तुम्ही तुमच्या friends सोबत social networks जसे की Facebook, google, twitter इत्यादी वर share करा.

तसेच Like करा आणि ह्या आणि अश्या बऱ्याच कथा Audible स्वरूपात ऐकायच्या असतील तर आपल्या Storyteller Rushi च्या YouTube Channel ला भेट द्या.

तुम्हाला सुद्धा तुमच्या Horror Stories किंवा तुमचे horror experience आमच्या पर्यंत पोहचवायचे असतील तर Email : Storytellerrushi@gmail.com यावर mail करून आम्हाला नक्की कळवा.

Leave a Reply